लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा आज संपत आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाला निवडणुकांच्या निकालाचे वेध लागले आहेत. तत्पूर्वी आज सायंकाळी मतदानोत्तर जनमत चाचण्या म्हणजेच एक्झिट पोल दाखविण्यास सुरुवात होईल. एक्झिट पोल येण्याआधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा निकालावर भाष्य केले आहे. भाजपाला यावेळी ३०३ हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. असे झाले तर २०१९ पेक्षाही हा आकडा अधिक असेल. लोकांनी निवडणुकीत कसे मतदान केले यावर एक्झिट पोल आपले अंदाज वर्तवित असतात.
Exit Poll Results 2024: एक्झिट पोल्सची उत्सुकता; गेल्या तीन निवडणुकीत काय होते अंदाज, किती ठरले खरे?
१ जून रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान सायंकाळी ६ वाजता संपल्यानंतरच काही वेळाने एक्झिट पोल दाखविण्यात यावेत, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सायंकाळी ६.३० वाजल्यापासून विविध वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोलचे आकडे येण्यास सुरुवात होईल. ४ जून रोजी पारडे कुणाच्या बाजूला झुकलेले असेल, याचा एक अंदाज यानिमित्ताने बांधला जातो. मतदार मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या मुलाखतींच्या आधारे, तसेच मतदार डेटाशी संबंधित इतर आकड्यांच्या आधारावर एक्झिट पोलची आकडेवारी ठरवली जाते. भारतात प्रत्यक्ष निकालाइतकेच एक्झिट पोललाही महत्त्व दिले जाते.
प्रशांत किशोर यांनी कोणता अंदाज वर्तविला?
२०१९ पेक्षाही भाजपा यंदा अधिक चांगल्या पद्धतीने बहुमत मिळवेल, असा अंदाज प्रशांत किशोर यांनी वर्तविला आहे. २०१९ पेक्षाही थोड्या फरकाने भाजपाच्या जागा वाढलेल्या असतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले आहे. “माझ्या विश्लेषणानुसार भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करू शकते. पश्चिम आणि उत्तर भारतात जागांच्या आकडेवारीत फार मोठे बदल दिसण्याची शक्यता कमी वाटते. मात्र पूर्व आणि दक्षिण भारतात भाजपाला चांगला पाठिंबा मिळत असून याठिकाणी त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे”, अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत दिली.
Maharashtra Exit Poll 2024 Live : ठाकरे वि. शिंदे, पवार वि. पवार, ‘अब की बार’ कोण बाजी मारणार?
भाजपाने गतकाळात तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूमध्ये पक्षाचा विस्तार करण्यात चांगली मेहनत घेतली. याठिकाणच्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलचे अंदाज कसे ठरविले जातात?
निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याचे सर्वांत विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिले जाते. मतदानानंतर मतदारांचा कौल विचारुन गोळा केलेली माहिती एक्झिट पोलसाठी वापरली जाते. मतदान करुन येणार्या ठराविक क्रमाकांचा (दहावा, विसावा, पंचविसावा) मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो. एक्झिट पोलसाठी विशिष्ट प्रश्नावली तयार करून मतदारांना प्रश्न विचारले जातात, मतदारांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि त्यातून मिळालेल्या माहितीचा आढावा घेतला जातो. ही पद्धत नवीन नाही. याची सुरुवात १९५७ मध्ये दुसऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी झाली जेव्हा ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन’ने एक सर्वेक्षण केले.