आपण मतदानाचा विश्वविक्रम केला आहे असं निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयागाने पत्रकार परिषद घेतली, त्यात राजीव कुमार यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच निकालाआधी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. यावेळी महिला मतदारांची संख्या महत्त्वाची होती असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं. येत्या काळात तरुण या मतदानातून प्रेरणा घेतील असं राजीव कुमार म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदतेले महत्त्वाचे मुद्दे
मतदानाचा देशाने विश्वविक्रम केला
महिला मतदारांची संख्या यावेळी खूप जास्त होती
६४ कोटींहून अधिक लोकांनी मतदान केलं.
३१ कोटींहून अधिक महिला मतदारांनी मतदान केलं.
उभं राहून सगळ्या मतदारांचे मानले आभार, महिला मतदारांचे आभार
स्त्रियांचा सन्मान राखण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले. एकाही राजकीय नेत्याकडून प्रचारात स्त्रियांविषयी अपशब्द निघणार नाहीत याची काळजी आम्ही घेतली. अशी प्रकरणं समोर आली तेव्हा आम्ही त्यांना सक्त ताकीद दिली. तसंच महिलांच्या विरोधात कुठलाही चुकीचा शब्द जाऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतली. आमच्या मनात स्त्रियांविषयी आदर आहे.
हे पण वाचा- Lok Sabha Exit Poll : एक्झिट पोल्सचे अंदाज नेहमी खरे ठरतात का; २००४ साली काय घडलेलं?
तसंच होम व्होटिंग ज्यांनी ज्यांनी केलं त्या मतदारांचेही मी अगदी मनापासून आभार मानतो. आमचा अनुभव हे सांगतो की अनेकांनी आम्हाला मतदानासाठी बूथवर यायची तयारी दाखवली. ही बाब कौतुकास्पद आहे. तरुणांना यातून प्रेरणा मिळेल असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.
मतमोजणीची बळकट प्रक्रिया कशी असणार?
मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत बळकट आहे.
१० लाख ५० बूथ आहेत, एका हॉलमध्ये चौदा टेबल असतील
८ हजारांहून अधिक उमेदवार आहेत, त्यांचे पोलिंग एजंटही असतील
निरीक्षक, सूक्ष्म निरीक्षकही त्या ठिकाणी असणार आहेत
७० ते ८० लाख लोक यासाठी काम करत आहेत
आमच्याकडून कुठल्याही प्रकारची तांत्रिक चूक होणार नाही
मानवी चूक झाली तर आम्ही ती तातडीने सुधारू, कारण ती कोणाकडूनही होऊ शकते
६ वाजता काय होणार? त्यानंतर १५ मिनिटांनी काय होणार हे सगळं ठरलं आहे
सगळी प्रक्रिया आणि मतमोजणी कशी करायची हे सगळं ठरलं आहे
१७ सी क्रमांकाचा फॉर्म आहे त्याची चर्चा होते कारण तो प्रसिद्धही झाला आहे, त्यानुसारच ही प्रक्रिया आम्ही राबवत आहोत
सीसीटीव्ही कॅमेराच्या अंतर्गत, मतमोजणी केली जाणार आहे.
निवडणूक उत्साहात पार पडली आहे, आता आम्ही पारदर्शीपणे मतमोजणीला आणि निकालाच्या दिवसाला सामोरे जात आहोत. कुणाकडून काहीही चुकीचं करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही कुणाचीही गय करणार नाही. लोकशाहीची मूळं बळकट करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे सगळ्यांचे आम्ही आभार मानतो असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.