Which is Original Shivsena Eknath Shinde Clearification : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवला आहे. महायुतीने आतापर्यंत २२९ जागांवर आघाडी घेतली असून शिवसेना (एकनाथ शिंदे) ५६, आणि राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार) ४० उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, विजय जवळपास निश्चित झाला असून महायुतीची सत्ता स्थापन होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, यावरून मूळ शिवसेना आणि नकली शिवसेना कोणती अशी चर्चा सुरू आहे. याबाबत आत एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

विधानसभा निवडणुकीतील निकाल स्पष्ट होऊ लागल्यानंतर महायुतीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जनतेचे आभार मानले. तसंच, पत्रकारांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना प्रश्न विचारला. आजच्या निर्णयामुळे असली आणि नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी कोण हे स्पष्ट झालंय का? त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

हेही वाचा >> Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी

“जनतेने आज दाखवून दिलं. असली नकलीमध्ये मी जाणार नाही. परंतु, बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या विचारधारेची शिवसेनेला लोकांनी कौल दिला. बोलणाऱ्यांना आम्ही कसं रोखणार. पण जनतेच्या कोर्टात जाऊन आम्ही त्यांना दाखवून दिलंय”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

जनतेला साष्टांग दंडवत घातला पाहिजे

“लाडकी बहीण, लाडकी भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांनी एकंदरीत सर्वंच घटकातील लोकांनी महायुतीवर प्रेम दाखवलं आहे. त्यामुळे सर्व मतदारांचे आभार. एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी सांष्टांग दंडवत घातला पाहिजे, असं काम जनतेने केलेलं आहे”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानले.

अजित पवार काय म्हणाले?

“मी जेव्हापासून राजकारणात आलो आहे, तेव्हापासून इतकं प्रचंड बहुमत मी पाहिलेलं नाही. २२२ आणि २२५ असं महाराष्ट्रात मिळालेलं यश मी पाहिलेलं नाही असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. अलिकडच्या काळात जसं आम्हाला समजतंय ते यश पहिल्यांदाच मिळालं आहे. खूप काही काम करावं लागेल असं मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना फोन करुन सांगितलं. आम्हाला त्यात कुठलीही अडचण नाही. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. त्यांचा आम्हाला खूप मोठा आधार आहे”, असंही अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

Story img Loader