राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशोक गेहलोत यांची ‘जादूगिरी’ राजस्थानात चालली नाही. राज्यातील जनतेनं काँग्रेस ‘हात’ सोडून भाजपाच्या ‘कमळा’ला पसंती दिली आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा रंगली आहे. यातच ‘राजस्थानचे योगी’ अशी ओळख असलेल्या बाबा बालकनाथ यांचं नाव चर्चेत आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३९ वर्षीय बाबा बालकनाथ अलवर लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये खासदार झाले होते. या विधानसभा निवडणुकीत बालकनाथ यांना तिजारा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार इम्रान खान यांच्याविरोधात लढत होते. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बालकनाथ यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, असं म्हटलं जातंय.

हेही वाचा : पाच राज्यांत नरेंद्र मोदी भाजपाचे स्टार प्रचारक; काँग्रेसकडून स्थानिक नेत्यांना महत्त्व; काय होती दोन्ही पक्षांची प्रचारनीती?

कोण आहेत बाबा बालक नाथ?

रोहतकमधील बाबा मस्तनाथ मठाचे प्रमुख म्हणून बालकनाथ हे प्रसिद्ध आहेत. बालकनाथ यांचा जन्म १६ एप्रिल १९८४ रोजी अलवरच्या कोहराना गावात झाला होता. वयाच्या ६ व्या वर्षी बालकनाथ यांनी घर सोडलं होतं. हिंदुत्वाच्या प्रश्नांवरून बालकनाथ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे बालकनाथ सतत चर्चेत असतात.

हेही वाचा : उत्तरेत भाजपचे वर्चस्व कायम तर दक्षिणेत काँग्रेसची ताकद वाढली

राजस्थान निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले होते, तेव्हा मुख्यमंत्री कोणाला पसंती? असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला होता. त्यावेळी अशोक गेहलोत यांच्यानंतर बालकनाथ यांना पसंती मिळाल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, बालकनाथ यांच्याबरोबर वसुंधरा राजे यांचंही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. वसंधुरा राजे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is baba balak nath bjps probable candidate for cm post in rajasthan ssa