Mulund Assembly Constituency : गुजराती-मराठी वादात कोण मारणार बाजी? भाजपाच्या गडाला मविआ लावणार का सुरुंग?

Mulund Assembly Election 2024 : गेल्या २८ वर्षांपासून या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार जिंकून येतोय. परंतु, गेल्या काही वर्षांत बदललेल्या राजकीय समीकरणामुळे यंदाही हा गड भाजपा राखणार की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Mulund Vidhan Sabha Election 2024 Mihir Kotecha
मिहिर कोटेचा मुलुंड विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

Mihir Kotecha in Mulund Vidhan Sabha Election 2024 : गेल्या दोन दशकांहून अधिक काळ भाजपाकडे राहिलेल्या मुलुंड विधानसभा मतदारसंघात महिर कोटेचा आमदार आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीतही नशीब आजमावून पाहिलं होतं. परंतु, त्यांच्या पदरी निराशा आली. आता मुलुंड विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा गड राहिला आहे. गेल्या २८ वर्षांपासून या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार जिंकून येतोय. परंतु, गेल्या काही वर्षांत बदललेल्या राजकीय समीकरणामुळे यंदाही हा गड भाजपा राखणार की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

१९९० सालापासून भाजपाने मुलुंड विधानसभा मतदारसंघात पक्षाची छाप पाडली आहे. १९९९ पासून २०१९ पर्यंत सरदार तारांसिह आमदार होते. परंतु, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे ही जागा मिहिर कोटेचा यांना देण्यात आली. मिहिर कोटेचा यांनीही ही जागा काबिज केली. दरम्यान, २०२० साली सरदार तारासिंह यांचं निधन झालं. परंतु, मुलुंड परिसरात सरदार तारासिंग यांचं मोठं नाव होतं. लहान मोठ्या कामात तारासिंह सहभागी असायचे. अरुंद रस्ते, सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा, उद्यानांची विकासकामांमध्ये तारासिंह यांनी मोलाचं योगदान दिलंय. त्याचाच फायदा मिहिर कोटेचा यांना झाल्याचं येथील राजकीय तज्ज्ञ सांगतात. मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या या मतदारसंघात उच्चभ्रू, मध्यम आणि गरीब कुटुंबाची संमिश्र वस्ती आहे. गुजराती, मराठी आणि उत्तर भारतीय अशी बहुभाषिक लोक येथे सर्वाधिक राहतात.

हेही वाचा >> Thane City Vidhan Sabha Constituency : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा आमदार; नवं राजकीय समीकरण कोणाच्या पथ्यावर?

गुजराती-मराठी वादात कोण जिंकणार?

मुलुंडमध्ये गुजरात आणि मराठी असा भाषिक वाद गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे भाजपाच्या मिहिर कोटेचा यांना उमेदवारी मिळाली तर विरोधकांना मराठी चेहरा उभा करण्याची गरज आहे. परंतु, या जागेवरून काँग्रेसने दावा केला असून चरणसिंंग सप्रा आणि राकेश शेट्टी यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे गुजराती-मराठी वादात इतर भाषिक उमेदवारांना संधी दिल्यास येथे अधिक कडवी लढत होण्याची शक्यता आहे. तसंच, मराठी मतांसाठी शिवसेनेला (उद्धव ठाकरे) ही जागा मिळाल्यास त्यांना उमेदवार आयात करावा लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही या मतदारसंघासाठी चाचपणी सुरू आहे. समजा, महाविकास आघाडीने मराठी चेहरा उभा केला तर भाजपाकडेही दोन मराठी चेहरे रांगेत. प्रभाकर शिंदे आणि प्रकाश गंगाधरे यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे.

२०१९ च्या निवडणुकीत मिहिर कोटेचा यांना ८७ हजार २५३ मते, मनसेच्या हर्षला चव्हाण यांना २९ हजार ९०५ आणि काँग्रेसच्या गोविंद सिंग यांना २३ हजार ८५४ मते मिळाली होती.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who will beat in gujarati marathi debate will mva win in bjps stronghold sgk

First published on: 12-10-2024 at 16:12 IST

संबंधित बातम्या