Karad South Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभेत काँग्रेसशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा आजवर विजय झालेला नाही. मात्र यंदा काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भाजपाचे कडवे आव्हान निर्माण झाले आहे. काँग्रेसकडून मागच्या दोन निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उमेदवार आहेत. तर काँग्रेसमधील माजी मंत्री विलासराव (काका) पाटील उंडाळकर यांचा गट पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. तसेच भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसले हेदेखील चांगले मतदान घेत आहेत. त्यामुळे यंदा पृथ्वीराज चव्हाण हॅटट्रिक साधणार की भाजपा या मतदारसंघात आपला झेंडा रोवणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दक्षिण कराड विधानसभेचा राजकीय इतिहास

भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर १९५१ आणि १९५७ च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाकडून यशवंतराव मोहिते यांनी याठिकाणी विजय मिळवला होता. त्यानंतर यशवंतराव मोहिते हे काँग्रेस पक्षात आले. १९६२ ते १९७८ पर्यंतच्या चार निवडणुकीत यशवंतराव मोहिते यांनी काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला. त्यानंतर १९८० ते २००९ अशा लागोपाठ सात निवडणुकांमध्ये विलासराव पाटील उंडाळकर यांनी विजय प्राप्त केला. २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमध्ये उमेदवारी दिली गेली. तेव्हापासून सलग दोनवेळा पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व करत आहेत.

What Ajit Pawar Said About Sharad Pawar?
Ajit Pawar : “शरद पवारांचं राजकारण मलाच नाही तर महाराष्ट्रात कुणालाच…”, अजित पवार काय म्हणाले?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Sunil Shelke, Ajit Pawar NCP, Maval candidate MLA Sunil Shelke,
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्यावर गुन्हा; ‘हे’ आहे कारण
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 news in marathi
निवडणुकीच्या प्रशिक्षणाला नकार दिल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध थेट गुन्हा; वाचा कुठे घडला हा प्रकार?
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण

२०१४ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच आघाडी तोडून स्वबळावर निवडणूक लढविली होती. त्यामुळे विलासराव पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढविली. ज्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. भाजपानेही २०१४ रोजी डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी देऊन त्यांच्यापाठी ताकद उभी केली. दक्षिण कराडमध्ये भाजपाला पहिल्यांदाच भोसले यांच्यामुळे तब्बल ५८,६२१ एवढे प्रचंड मतदान झाले. तर विलासराव पाटील उंडाळकर दुसऱ्या स्थानावर राहिले, त्यांना ६०,४१३ एवढी मते मिळाली. १६ हजारांच्या मताधिक्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्याच विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला.

२०१९ च्या विधानसभा निकालांमुळे यंदाची लढत रंगतदार

२०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे डबल इंजिन सरकार असतानाही पृथ्वीराज चव्हाण यांचा निसटता विजय झाला. यावेळी भाजपाच्या डॉ. अतुल भोसले यांनी तब्बल ८३,१६६ मते घेतली. तर पृथ्वीराज चव्हाण यांना ९२,२९६ मते मिळाली. चव्हाण यांच्याकडे ९०५० मतांचे मताधिक्य होते. तर माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह विलासराव पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत २९,४०१ मते घेतली.

पृथ्वीराज चव्हाण हॅटट्रिक साधणार?

काँग्रेसने यावेळी जर पुन्हा पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास ते हॅटट्रिक साधणार का? याकडे लक्ष असणार आहे. २०१९ साली महाविकास आघाडीची सत्ता असूनही पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मंत्रिपद नव्हते. विधानसभा अध्यक्षपदासाठीही त्यांचे नाव समोर आले नाही. पक्षांतर्गत कोणतीही जबाबदारी नसलेल्या ७८ वर्षीय पृथ्वीराज चव्हाण यांना यावेळीस उमेदवारी मिळणार की काँग्रेस नव्या चेहऱ्याला संधी देणार, हे पाहावे लागेल. माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे २०२१ साली वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण हे स्थानिक राजकारणात एकत्र आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत उदयसिंह पाटील उंडाळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

कराड दक्षिणसाठी दोन भोसले मैदानात

कराड दक्षिणमध्ये विजय मिळविण्यासाठी डॉ. अतुल भोसले जोरदार तयारी करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोट्यवधीची विकासकामे मंजूर करून घेण्यात त्यांनी यश मिळवले आहे. तर सातार लोकसभेवर यंदा उदयनराजे भोसले यांच्यामुळे पहिल्यांदाच भाजपाचा खासदार झाला आहे. त्यामुळे साताऱ्यातील भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात विजय प्राप्त करण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्याकडे दिली असल्याचे समजते. नुकतीच मुंबईत भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला गेला. खासदार उदयनराजे भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांची जोडगोळी कराड दक्षिणमध्ये भाजपाला झेंडा रोवणार का? हे निवडणुकीनंतर कळू शकेल.

ताजी अपडेट

कराड दक्षिणमध्ये २८ जणांनी अर्ज दाखल केले असून २४ जणांचे अर्ज पात्र ठरले आहेत. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, भाजपाकडून अतुल भोसले, वंचित बहुजन आघाडीकडून संजय गाडे यांनी अर्ज भरला आहे.

l