गेल्या काही दिवसांपासून देशात मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांतील विधानसभा निवडणुकीची चर्चा होती. आज (३ डिसेंबर) यातील मिझोराम वगळता अन्य चार राज्यांत मतमोजणी होत असून, निकाल जवळवळ स्पष्ट झाले आहेत. या चारपैकी तीन राज्यांत भाजपाने बाजी मारली आहे. तर काँग्रेस एका राज्यात आघाडीवर आहे. दरम्यान, मिझोराम या राज्याची निवडणूक उर्वरित चार राज्यांसोबत घेण्यात आली होती. इतर चार राज्यांसह मिझोरामचाही निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र भारतीय निवडणूक आयोगाने ऐनवेळी मिझोराम राज्यातील मतमोजणी एका दिवसाने पुढे ढकलली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

…म्हणून मिझोराम राज्याची मतमोजणी एक दिवस पुढे ढकलली

छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान या राज्यांसोबतच मिझोराम या राज्यातील निकाल जाहीर केला जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मिझोराम एनजीओ कोऑर्डिनेशन कमिटीने (एनजीओसीसी) नाराजी व्यक्त केली होती. ३ डिसेंबर हा ख्रिश्चन धर्मीयांसाठी पवित्र दिवस आहे. त्यामुळे या दिवशी मतमोजणी करू नये, अशी मागणी एनजीओसीसीने केली होती. याच विनंतीमुळे निवडणूक आयोगाने मिझोराम राज्यातील मतमोजणी एका दिवसाने पुढे ढकलली.

मिझोराममध्ये कोण जिंकणार?

या राज्यात मिझो नॅशनल फ्रन्ट (एमएनएफ) आणि झोराम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) या दोन आघाड्यांत अटीतटीची लढत होणार आहे. असे असले तरी दोन्ही आघाड्यांकडून आमचेच सरकार बहुमतात येणार, असा दावा केला जात आहे.

उर्वरित चार राज्यांत काय स्थिती?

दरम्यान, सध्या भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला फक्त तेलंगणात आघाडी मिळवता आली आहे. तेलंगणात सध्या भारत राष्ट्र समिती या पक्षाचे सरकार आहे.