लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यात सुरु आहे. प्रचारसभा, रॅली, भाषणं या सगळ्यांतून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यात आहे तर इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असा सामना देशात आहे. ४ जूनला निकालाच्या दिवशी जनता कुणाच्या बाजूने आहे? ते स्पष्ट होणार आहे. लोकसभेचं वातावरण तापलेलं असतानाच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाही याच वर्षी होणार आहेत. महाराष्ट्रातल्या निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. तसंच लोकसभा निवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

लोकसभा निवडणुकीत देश पातळीवर मोदींचा विजय होईल, महाराष्ट्रात महायुतीचे आमदार निवडून येतील हे राजकीय सत्य आहे. जे कुणीही नाकारु शकत नाही. अजित पवारांनी अत्यंत ताकदीने शरद पवारांच्या विरोधात जाऊन लढले आहेत. त्यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार जिंकल्या तर आश्चर्य वाटून घेण्याचं मुळीच कारण नाही. लोकसभा निवडणूकच नाही तर विधानसभा निवडणूक होईपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील. विधानसभा निवडणूकही आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच लढवणार आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर काय करायचं याचा निर्णय आमचा पक्ष करेल. वापरा आणि फेका हे आमचं धोरण नाही. आमची महायुती आहे आणि महायुतीत विधानसभा निवडणूक पार पडेपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. ती निवडणूकही आम्ही त्यांच्याच नेतृत्वात लढू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- ‘मोदी ४०० पार’चा उल्लेख आता टाळत आहेत’ देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले यामागचे खरे कारण

विधानसभेनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील का?

“कुणीही मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा ठेवणं, स्वप्न पाहणं चूक नाही. राजकारणात अजित पवार हे काही भजन करायला किंवा आमची पालखी उचलायला राजकारणात आलेले नाहीत. त्यांना मनात वाटतं आहे की मुख्यमंत्री व्हायचं आहे तर त्यात काही गैर नाही. मात्र राजकीय वास्तव ही बाबही लक्षात घ्यायला हवी. भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष आजही आहे आणि उद्याही असणार आहे. सर्वात मोठा पक्ष आज आम्ही आहोत आणि विधासभेच्या नंतरही असू. जो निर्णय होईल तो आमचे पक्ष श्रेष्ठी घेतील. त्याआधी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली जाईल.” असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. अजित पवारांनी माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे हे वक्तव्य केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे. जे चांगलंच चर्चेत आलं आहे.