Lok Sabha Elections Results 2024: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने यावेळी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून उभे राहून तिने आपले नशीब आजमावले ज्यामध्ये ती यशस्वी झाली आहे. राजकारणात यशस्वी झाल्यानंतर कंगना आता अभिनयाला निरोप देण्याच्या तयारीत आहे.

कंगना राणौतने स्वत: खुलासा केला होता की ती निवडणूक जिंकली तर ती बॉलिवूड सोडेल. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौत म्हणाली होती, ‘फिल्मी जग खोटे आहे, हे नकली बुडबुड्यासारखे चमकदार जग आहे जे प्रेक्षकांना आकर्षित करते.’

हेही वाचा – “हा पंतप्रधान मोदींचा नैतिक आणि राजकीय पराभव”: जयराम रमेश

कंगना राजकारणावर लक्ष केंद्रित करणार आहे

अभिनय आणि राजकारणाचा समतोल कसा साधेल? असे विचारले असता कंगना म्हणाली होती की,”ती फक्त एका कामावर लक्ष केंद्रित करेल. जर ती निवडणूक जिंकली तर ती हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर जाईल आणि फक्त राजकारणावर लक्ष केंद्रित करेल”, असे कंगनाने सांगितले होते. तिने असेही सांगितले की,”ती तिच्या काही प्रकल्पांसाठी वचनबद्ध आहे आणि ती पूर्ण केल्यानंतरच बॉलिवूडला निरोप देईल.”

कंगना राणौत इतक्या मतांनी विजयी झाली

आता कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडीमधून ५२४०७९ मते मिळवून विजयी झाली आहे. कंगनाने काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला आहे. विजयानंतर अभिनेत्रीने एक पोस्ट करून जनतेचे आभारही मानले आहेत. अभिनेत्रीने लिहिले- ‘हे समर्थन, प्रेम आणि विश्वासासाठी मंडीतील सर्व लोकांचे मनापासून आभार. हा तुम्हा सर्वांचा विजय आहे, हा पंतप्रधान मोदीजी आणि भाजपवरील विश्वासाचा विजय आहे, हा सनातनचा विजय आहे, हा मंडीच्या सन्मानाचा विजय आहे.

हेही वाचा – नितीश कुमार होणार पंतप्रधान? बिहारचे मुख्यमंत्री पलटणार का लोकसभा निकालाची बाजी? नेटकऱ्यांनी मीम्स शेअर करत उडवली खिल्ली

या चित्रपटांमध्ये ही अभिनेत्री दिसणार आहे

अभिनेत्री आता राजकारणावर लक्ष केंद्रित करणार असून अभिनयाला निरोप देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण कंगनाकडे आधीपासून काही प्रोजेक्ट्स आहेत आणि ते पूर्ण करण्याबाबतही अभिनेत्री सांगितले होते, त्यामुळे खासदार झाल्यानंतरही ती काही चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कंगना सध्या ‘इमर्जन्सी’, ‘सीता: द इनकार्नेशन हे चित्रपट आहेत. त्याचबरोबर ती आर. माधवनसह एक चित्रपटात दिसणार आहेत.