तेलंगणात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ३० नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते दारोदारी प्रचार करताना दिसत आहेत. अशातच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी प्रचार करण्यासाठी एक घरी गेले होते. यावेळी एका महिलेने थेट भाजपा आमदाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं प्रकरण काय?

असदुद्दीन ओवैसी गोशामहल विधानसभा मतदारसंघात प्रचार करत होते. तेव्हा, एका घरी गेले असताना महिलेनं भाजपा आमदार टी राजा सिंह यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

महिलेने व्हिडीओत काय म्हटलं?

असदुद्दीन ओवैसींना उद्देशून महिल्या म्हणाल्या, “हा वाघिणीची मुलगा आहे. विरोधकांना संपवून टाका. सगळं जग तुमच्या पाठीमागे उभं आहे. राजा सिंह याच्याविरोधात कुणाला तरी उभे करा… मला त्याच्याविरोधात उभे करा… मी त्याचा खून करते.”

भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी गोशामहल मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच, असदुद्दीन ओवैसी यांनी जुना हैदराबाद शहरातील येथील मुस्लीम समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

टी राजा सिंह यांनी म्हटलं, “एमआयएमचा प्रभाव फक्त सात जागांपर्यंतच मर्यादित आहे. असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरूद्दीन ओवैसी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. पण, जुना हैदराबाद शहरातील मुस्लीम समाज मागास राहिला आहे.” ‘फ्री प्रेस जर्नल’ने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will muder raja singh hydrabad woman urges owaisi to let her cotest poll telangana assembly elections
Show comments