लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून देशपातळीवरील हालचालींना वेग आला आहे. पडद्यामागे अनेक प्रयोग घडत आहेत. त्यातच, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला जोर धरला आहे. काल (५ जून) दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ते गैरहजर होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु, हे दावे ठाकरे गटातील नेत्यांकडून फेटाळले गेले आहेत.

महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ४८ पैकी ३० जागा मिळवल्या. देशभरात एनडीएने बहुमत मिळवले असले तरीही इंडिया आघाडीनेही अनेक राज्यातील बहुतेक मतदारसंघ ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी आणि एनडीए दोघांकडूनही प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणातून धक्कादायक बातमी समोर येतेय. येत्या काळात उद्धव ठाकरे एनडीएत सामील होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यासाठी एका केंद्रीय मंत्र्यावर जबाबदारी टाकण्यात आल्याचीही चर्चा आहे. यावर ठाकरे गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

pimpri chinchwad NCP is on the verge of a split
पिंपरी-चिंचवड ‘राष्ट्रवादी’ फुटीच्या उंबरठ्यावर?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Once again Dushkali Forum in Sanglis politics
सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘दुष्काळी फोरम’
Former MLA-activist abused each other in front of Congress National Secretary in Dhule
धुळ्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांसमोर माजी आमदार-कार्यकर्त्यांत शिवीगाळ
farmer leader raju shetty slam bjp over corruption issues in buldhana
राजू शेट्टी म्हणाले; महाराष्ट्र भाजपला आंदण दिलेला नाही; काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…या शेतकरी नेत्याने थेटच….
Ashok Chavan Bhaskarrao Khatgaonkar Patil
Ashok Chavan : “आमच्याबरोबर राहिले तर सुरक्षित राहतील”, अशोक चव्हाणांचा ‘या’ नेत्याला इशारा
sharad pawar
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी महायुतीच्या नेत्यांची रीघ
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण

हेही वाचा >> Lok Sabha Election Result 2024 Live Updates : देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, अमित शाहांची भेट घेणार

“भाजपच्या बीटवर काम करणाऱ्या पत्रकारांचा एकच स्रोत आहे – पीएमओमध्ये बसलेले त्यांचे मीडिया सल्लागार जे भाजपचा अजेंडा चालवत आहेत! मी त्यांना सांगू इच्छिते की, अजूनही वेळ आहे, स्वतःला थोडे सुधारा! तुम्ही मांडलेले सर्व मुद्दे जनतेने खोटे ठरवले आहेत. तुम्हाला बहुमतापासून दूर ठेवले आहे!” , असं ठाकरे गटाच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चर्तुर्वेदी म्हणाल्या.

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी भाजापवर ताशेरे ओढत म्हटलंय की, “गोदी ‘पत्रकार’ चे जीवन. सुरुवातीला २०१९ मध्ये त्यांनी म्हटलं की भाजपाला बहुमत मिळेल. नंतर ते म्हणाले की एक्झिट पोलने मोदी चश्म्यातून पाहण्याऱ्या गोदी पत्रकारितेला सिद्ध केलं. परंतु, आता बहुमत मिळालं नाही. त्यामुळे मग त्यांनी उद्धव ठाकरे एनडीएत परत येणार असल्याची अफवा पसरवली. मोये मोये. ये ना होए. यु कॅन रोये रोये.”

उद्धव ठाकरे एनडीएत सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून भाजपावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, देशाने आपली राज्यघटना बदलण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा भाजपचा प्रयत्न नाकारला. आपल्या देशात अहंकाराला थारा नाही, हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे. अहंकारी, हुकूमशाही, लोकशाहीविरोधी शक्ती आणि आपल्या राज्यघटनेऐवजी स्वतःच्या पक्षाची नियमावली लागू करू पाहणाऱ्यांना देश नाकारेल.

“महाराष्ट्रात भाजपाने आमच्या राज्याची लूट करून आपली आर्थिक ताकद आणि आपला स्वाभिमान गमावला आहे. महाराष्ट्रविरोधी भाजपाला महाराष्ट्रातील मतदारांनी नाकारले आहे आणि ते यंदा पुन्हा पाहायला मिळणार आहे”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “आतापर्यंत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही आधी सांगितले आहे की पीएम मोदींकडे बहुमत आहे, जवळपास २४० जागा त्यांच्याकडे आहेत. म्हणून त्यांनी शपथविधी करून घ्यावा. त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घ्यावी. मग चौथ्या शपथेबद्दल आम्ही विचार करू.”