१८ व्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवला आहे. या अभूतपूर्व यशानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. परंतु, भाजपाने ३०० ची संख्याही गाठलेली नाही. त्यामुळे इंडिया आघाडी सत्ता स्थापन करू शकते, अशी चर्चा आहे. या चर्चेवर राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

“आम्ही एका पक्षाविरोधात लढलो नाही. आम्ही प्रशासकीय व्यवस्थेविरोधात लढलो. देशातील विविध संस्थांविरोधात लढलो. आम्ही ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग यांच्याविरोधात लढलो. कारण या संस्था नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ताब्यात घेतल्या आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले.

Manipur crisis PM Narendra Modi hits back in Rajya Sabha Opposition
“हिंसाचारावरुन राजकारण करणाऱ्यांना मणिपूरची जनता नाकारेल”; अखेर मणिपूरबाबत मोदींनी केले भाष्य
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
rohit pawar on paper leak issue
पेपरफुटीचा कायदा याच अधिवेशनात आणणार का? रोहित पवारांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांचे थेट उत्तर; म्हणाले…
Supriya Sule
“लोकसत्ताक देशात पोलिसराज प्रस्थापित करण्यासाठी…”, नव्या फौजदारी गुन्ह्यांवरून सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप; म्हणाल्या, “संसदेत…”
Sharad Pawar, Sharad Pawar latest news,
कोणत्याही खासदाराला पुन्हा निवडणुका नको वाटतात – शरद पवार
Uday samant and anil parab
“मुंबईभर मुख्यमंत्र्यांचेही अनधिकृत होर्डिंग्स, त्यांच्यावर कारवाई होणार का?” अनिल परबांच्या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले…
lokmanas
लोकमानस: म्हणूनच लोकशाहीचा जागर करावा लागतो…
mayawati with akash anad
परिपक्व नाही म्हणणार्‍या पुतण्यालाच मायावतींनी केले उत्तराधिकारी; यामागची नेमकी रणनीती काय?

हेही वाचा >> 2024 Lok Sabha Election Result Live pdates : “आमची बँक खाती गोठवली, पण तरीही…”, राहुल गांधींच्या जल्लोषानंतर खरगेंची प्रतिक्रिया

इंडिया आघाडी विरोधी बाकावर बसणार की सत्ता स्थापनेचा दावा करणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, याबाबत आम्ही इंडिया आघाडीच्या नेत्यांबरोबर चर्चा करणार आहोत. उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार असून या बैठकीत निर्णय घेतला जाईल.

जुन्या घटकपक्षांना पुन्हा सामील करून घेणार का?

तसंच, इंडिया आघाडीत असलेले अनेक पक्ष एनडीएत सामील झाले आहेत. सत्ता स्थापनेसाठी त्यांना पुन्हा आघाडीत घेणार का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीतच हा निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “इंडिया आघाडीतील नेत्यांबरोबर चर्चा केल्याशिवाय आम्ही माध्यमांना यासंदर्भातल कोणतंही स्टेटमेंट देणार नाही.”

“ही निवडणूक संविधान वाचवण्याकरता होती. नरेंद्र मोदी आणि अमित शाह देशाला नकोय हेच नागरिकांनी सांगितलं आहे. या देशातील गरिबांनी हे संविधान वाचवण्याचं काम केलं”, असंही ते पुढे म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे यापैकी कोणती जागा निवडायची हे अद्याप ठरवलं नसल्याचं राहुल गांधी म्हणाले.

सत्तास्थापनेबाबत मल्लिकार्जून खरगेंनाही विचारण्यात आलं होतं, त्यावर त्यांनीही राहुल गांधीप्रमाणेच उत्तर दिलं. तसंच, आम्ही आता आमची रणनीती सांगितली तर मोदींना आमची स्ट्रॅटेज समजेल, असंही ते पुढे उपरोधिकपणे म्हणाले.