Premium

यवतमाळ : मतदानासाठी जिल्हाधिकारीही रांगेत; अनेक नवरदेवांची वरात पहिले मतदान केंद्रांवर…

मतदानानंतर आशिया दांपत्याने मतदान केल्याचे शाई लावलेले बोट दाखवत, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले.

yavatmal collector and district electoral officer stood in a queue and cast vote
यवतमाळचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्वसामान्य मतदरांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले.

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ नंतर मतदानासाठी गर्दी होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान यवतमाळचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्वसामान्य मतदरांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या साधेपणाचे मतदरांमध्ये कौतुक होत आहे.

हेही वाचा >>> वाशीम जिल्ह्यात सकाळी मतदान संथगतीने

Efforts in Thane district, voter turnout
मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा ! व्यापाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mumbai This election polling stations increased and started in housing societies to avoid evening crowding
साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदान, मुंबईत प्रथमच मोठ्या स्तरावर प्रयोग, मतदान वाढण्याची अपेक्षा
65 percent voter turnout recorded in first phase of jharkhand assembly polls
पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
Pune Voting Free Petrol, Pune Voting, Petrol,
पुणेकरांनो मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पाऊल
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई

यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आज येथील शिवाजी विद्यालयात रांगेत उभे राहून मतदान केले. ते काळी १० वाजातच्या सुमारास पत्नीसह मतदानासाठी मतदान केंद्रावर आले. त्यानंतर सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनी मतदान करण्यासाठी नागरिक उभे असलेल्या रांगेत उभे राहून प्रतीक्षा केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणतीही विशेष सुविधा घेण्याचे त्यांनी नम्रपणे नाकारले. आपण सर्वसामान्य मतदार आहे आणि सर्वसामान्यप्रमाणेच मतदान करेल, अशा सूचना उपस्थितांना केल्या.

मतदानानंतर आशिया दांपत्याने मतदान केल्याचे शाई लावलेले बोट दाखवत, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत साडेसात टक्क्याच्या जवळपास मतदान झाले होते. ज्येष्ठ आणि दिव्यांगांनी मतदानास उत्साहात सहभाग घेतला. नव मतदारांचीही संख्या लक्षणीय होती. ९ वाजता नंतर मतदानासाठी नागरिक बाहेर पडत असल्याचे चित्र होते. आज विवाह मुहूर्त मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी वधू-वरांनी ‘आधी लगीन लोकशाहीचे…’ या उक्तीप्रमाणे मतदान करून ते नंतर विवाहासाठी रवाना झाले.

हेही वाचा >>> Akola Lok Sabha Election 2024 : अकोल्यात पहिल्या दोन तासात ७.१७ टक्के मतदान; उमेदवार प्रकाश आंबेडकर, अनुप धोत्रे, डॉ. अभय पाटील यांनी बजावला हक्क

दिग्रस येथील संदेश अस्वार या नवरदेवाने वरात निघण्यापूर्वी वऱ्हादड्यासह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर अस्वार यांची वरात अमरावतीकडे रवाना झाली. दारव्हा तालुक्यातील पिंपळखुटा येथील नवरदेव रामेश्वर प्रेमसींग राठोड यांनी मतदान करून नंतर ते विवाहासाठी भोपापूरकडे रवाना झाले. ॲड. समीर गावंडे या वराने राळेगाव तालुक्यातील परसोडी येथील मतदान केंद्रावर पहिले मतदानाचचा हक्क बजावला आणि नंतर ते हक्काने विवाह करण्यासाठी रवाना झाले.  नव तरुणांनी स्वतःच्या विवाहापूर्वी मतदान करून आधी लोकशाहीचे लगीन लावण्यासाठी घेतलेला हा पुढाकार व दाखविलेले जबाबदारीचे भान लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yavatmal collector and district electoral officer stood in a queue and cast vote nrp 78 zws

First published on: 26-04-2024 at 12:35 IST

संबंधित बातम्या