मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत पावसाने मुक्काम ठोकला असून, गेल्या २४ तासांत पावसाने कोकणात रौद्ररुप घेतलं आहे. बुधवारी रात्रीपासून कोकणात मुसळधार पाऊस होत असून, अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूनमध्ये दाणादाण उडाली आहे. पावसाचा कहर सुरू असून, तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. शहराच्या अनेक भागात पाणी शिरलं असून, अंतर्गत मार्गही बंद झाले आहेत. यामुळे चिपळूनमध्ये २००५ ची पुनरावृत्ती होते की काय या धास्तीने नागरिकांची झोपच उडाली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे. मात्र मुसळधार कोसणाऱ्या या पावसामुळे ढगफुटीच्या चर्चांना तोंड फुटलं आहे. अनेक ठिकाणी तर ढगफुटी झाल्याच्या बातम्या व्हायरल केल्या जात आहे. मात्र किनारपट्टी भागात ढगफुटी होत नाही. विशेषतः उंच प्रदेशात ढगफुटीची शक्यता अधिक असते. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये ढगफुटी होण्यासंदर्भातील बातम्या या शास्त्रीय दृष्ट्याच अयोग्य ठरतात. पण ढगफुटी म्हणजे नेमकं काय ती कशी होते? याच साऱ्या प्रश्नांवर टाकलेली नजर…

ढगफुटीच्या प्रक्रियेची सुरुवात कशी होते?

ifs officer parveen kaswan shares video of forester extinguishing terrible forest fire goes viral
जंगलात लागली भयानक आग, झाडे झाली जळून खाक! आग शमविताना झाली वनकर्मचाऱ्यांची दमछाक, पाहा थरारक Video
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
India is the third most polluted country in the world What are the potential dangers of this
विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?

विज्ञानाने अर्थातच याचा शोध घेतला आहे. गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यामध्ये असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा लॅटिन शब्द आहे. क्युम्युलस म्हणजे एकत्र होत जाणारे व निम्बस म्हणजे ढग. थोडक्यात झपाटय़ाने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग ही सुरुवात असते.

नक्की वाचा >> समजून घ्या : ६० मिमी पाऊस पडला म्हणजे नेमका किती? पाऊस कसा मोजतात?

गरम हवा व आद्र्रता यामुळे ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढत जाते. पाण्याचे अब्जावधी थेंब या ढगांमध्ये विखुरले जातात. यातूनच पुढे जोरदार पाऊस पडतो. पण कधीकधी या ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो. याला अपड्राफ्टस् असे म्हणतात. पाण्याच्या थेंबाना घेऊन तो वरवर चढत निघतो. हा निसर्गाचा विलक्षण खेळ असतो. या स्तंभाबरोबर वेगाने वर चढताना पाण्याचे थेंब चांगले गरगरीत होऊ लागतात. कधीकधी ३.५ मिमीहून मोठे आकारमान होते. काहीवेळा या वर चढणाऱ््या हवेच्या स्तंभात अतिशय गतिमान असे वारे निर्माण होतात. ढगातच छोटी छोटी वादळे उठतात. या वादळात पाण्याचे थेंब सापडतात. वादळात वेगाने गिरक्या घेत असताना एकमेकांवर आदळतात आणि या मस्तीत एकमेकांमध्ये मिसळून आणखी मोठे होत जातात. हवेचा स्तंभ आता पाण्याच्या मोठमोठय़ा थेंबाना घेऊन वरवर चढू लागतो.

हवेच्या स्तंभाची जितकी ताकद असेल तितका तो वर चढतो आणि मग जत्रेतील चक्राचा पाळणा जसा झपकन खाली येऊ लागतो तसेच या स्तंभाचे होते. या स्तंभाने तोलून धरलेले पाण्याचे मोठे थेंब त्या पाळण्याप्रमाणेच अतिशय वेगाने खाली झेपावतात. यावेळी त्यांना स्तंभातील ऊर्जाही मिळालेली असते. सुसाट वेगाने ते जमिनीकडे येतात. हवेचा स्तंभ आता जमिनीच्या दिशेने तयार होतो. याला डाऊनड्राफ्ट असे म्हणतात. थेंबाचा वेग प्रथम साधारणपणे ताशी १२ किमी असतो. तो बघता बघता ताशी ८० ते ९० किमीपर्यंत पोहोचतो.

नक्की वाचा >> समजून घ्या : रेड अलर्ट म्हणजे काय?; तो कधी जारी करण्यात येतो?

ढग मोठा असला तरी त्याचा विस्तार जास्त नसतो. यामुळे जमिनीवरील लहानशा भागात पाण्याचा जणू स्तंभ कोसळतो. मोठाले थेंब व प्रचंड वेग यामुळे जमीन व त्यावरील सर्व काही अक्षरश झोडपून निघते. झाडे, लहान प्राणी, कच्च्या इमारती यांच्यासाठी पाण्याचा हा मारा धोकादायक असतो. जमिनीची पाणी शोषून घेण्याची वेगवेगळ्या ठिकाणची क्षमता वेगवेगळी असते व पाणी शोषून घेण्यासाठी वेळही लागतो. येथे काही मिनिटातच प्रचंड पाणी ओतले गेल्यामुळे पाणी शोषून घेण्याचे जमिनीचे कामच थांबते आणि जिकडे-तिकडे पुरासारखी स्थिती निर्माण होते. ढगफुटी डोंगरावर झाली तर पाण्याचे लोंढे डोंगरावरून निघतात. त्यांच्याबरोबर मोठय़ा प्रमाणात माती पायथ्याकडे ढकलली जाते.

वरती चढणारा स्तंभ व खाली येणारा स्तंभ यांच्यामुळे हे सर्व घडते. यापैकी डाऊनड्राफ्ट हे जास्त धोकादायक असतात. हवेचा हा स्तंभ जेव्हा वेगाने जमिनीवर आदळतो तेव्हा ती ऊर्जा तितक्याच वेगाने आजूबाजूला फेकली जाते. यामुळे पाण्याबरोबर चारी दिशेने वाऱ्याची वावटळ उठते. हे वारे कधी ताशीदीडशे ते दोनशे किमी इतका वेग घेतात. या वावटळीमुळे लहान झाडे एका रेषेत झोपल्यासारखी मोडून पडतात. विमानांसाठी हवेचे हे स्तंभ सर्वात धोकादायक असतात. विमान अशा स्तंभात सापडले तर हमखास कोसळते. जगातील अनेक विमान अपघातांना हवेचे हे स्तंभ कारणीभूत ठरले आहेत. किंबहुना या अपघातांमुळेच या स्तंभांचा अभ्यास सुरू झाला.

ढगफुटीच्या वेळी आणखी एक अनोखी घटना घडते

ढगफुटीच्या वेळी आणखी एक अनोखी घटना घडते. मात्र त्याची मौज घेण्याचे भान कुणालाही नसते. ढगफुटीच्या आधीच हवामान अर्थातच पावसाळी असते. काळोखी दाटत जाते. मात्र प्रत्यक्षात पाऊस पडताना काळोखाचे प्रमाण एकदम कमी होते. कधीकधी जणू सूर्यप्रकाशात पाऊस पडल्यासारखा भासतो. पावसाचे भलेमोठे थेंब हे याचे कारण आहे. हे थेंब आरशाप्रमाणे काम करतात व प्रकाश परावर्तित करीत राहतात. यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रकाश दिसतो. थेंबाचा पृष्ठभाग वाढल्यामुळे नेहमीच्या थेंबापेक्षा चारपट अधिक प्रकाश ढगफुटीच्या थेंबातून परावर्तित होतो.

समजून घ्या >> समजून घ्या : लस घेतल्यानंतर नक्की किती दिवसांनी करोना संसर्गाचा धोका कमी होतो

मुंबईत २६ जुलै २००५ रोजी पडलेला पाऊस हा ढगफुटीचाच प्रकार होता

ढगफुटी ही हिमालयासाठी नवीन गोष्ट नाही. दरवर्षी मान्सून पठारावरून हिमालयाच्या भेटीला जातो. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यातून घेतलेले पाणी तेथे नेऊन ओततो. हिमालयात असे ढग अनेकदा फुटतात. मात्र बहुदा ही ढगफुटी खूप डोंगराळ भागात होत असल्याने त्याची बातमी होत नाही. मनुष्यवस्तीत ती घडली की लगेच आपले लक्ष वेधून घेते. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी पडलेला पाऊस हा ढगफुटीचाच प्रकार होता. मात्र अशी परिस्थिती फारच कमी वेळा निर्माण होते जेव्हा किनारी भागांमध्ये ढगफुटी सदृष्य परिस्थिती होते. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी आठ तासात ९५० मिमी पाऊस पडला. वेग व थेंबांचा आकार आणि पाणी घेऊन येणारा हवेचा स्तंभ जमिनीवर आदळल्यावर होणारे परिणाम यामुळे ढगफुटीतून अपरिमित नुकसान होते. यावर उपायही काही नसतो. निसर्ग मस्तीत येऊन धुमाकूळ घालतो. हे त्याचे तांडवनृत्य असते. ते समजून घेताना छान वाटते, पण अनुभवताना जीवघेणे ठरते. लेहवासीय सध्या तोच अनुभव घेत आहेत.

सर्वात मोठी ढगफुटी…

लेहमध्ये ६ ऑगस्ट २०१० रोजी झालेली ढगफुटी ही जगाला आजपर्यंत माहित असलेल्या ढगफुटींच्या घटनांतील सर्वात मोठी ढगफुटी मानली जाते. अगदी थोडय़ा काळात इतक्या मोठय़ा प्रमाणात जगात आजपर्यंत कुठेही पाऊस पडलेला नाही. अवघ्या एका मिनिटात दोन इंच पाऊस.. ढगफुटी या शब्दातच या घटनेचा अर्थ स्पष्टपणे कळतो. टाकीचा संपूर्ण तळच निघाला तर टाकीतील पाणी जसे वेगाने खाली पडेल तसेच येथे होते. फक्त येथे कित्येक मैल पसरलेला पाण्याचा ढग असतो आणि त्यामध्ये अब्जावधी गॅलन पाणी भरलेले असते. आकाशातील पाण्याचा ढग अक्षरश फुटतो आणि अगदी कमी वेळात पाण्याचा जणू स्तंभच जमिनीवर झेप घेतो.

अभिनेता फरहान अख्तरने काही वर्षी सोशल मीडियावर ढगफुटीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो पाहून क्षणभरासाठी तुमचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

ढगफुटीच्या प्रमुख घटना

* लेह (६ ऑगस्ट २०१०) फक्त एका मिनिटात ४८.२६ मिमी पाऊस

* बरोट, हिमाचल प्रदेश, (२६ नोव्हेंबर १९७०) एका मिनिटात ३८.१० मिमी पाऊस

* पोर्ट बेल, पनामा (२९ नोव्हेंबर १९११) पाच मिनिटांत ६१.७२ मिमी पाऊस

* प्लंब पॉईंट, जमेका (१२ मे १९१६) पंधरा मिनिटात १९८.१२ मिमी पाऊस

* कर्टिआ, रुमानिया (७ जुलै १९४७) वीस मिनिटांत २०५.७४ मिमी पाऊस

* व्हर्जिनिया, अमेरिका (२४ ऑगस्ट १९०६) चाळीस मिनिटांत २३४ मिमी पाऊस