दक्षिण आफ्रिकेतील दोन वैद्यकीय चाचण्यांमधील प्राथमिक निष्कर्षातून लक्षणे नसलेल्यांमधून ओमायक्रॉनचा पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा वेगाने प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. ओमायक्रॉनचा प्रसार झालेल्या ठिकाणांहून या चाचण्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही अभ्यासांमध्ये मागील व्हेरिएंटच्या तुलनेत संसर्गाचा उच्च दर आणि लक्षणे नसलेल्या बाधितांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले.
दोन्ही अभ्यासामध्ये मोठ्या समूहाचा सहभाग करण्यात आला आहे. आफ्रिकेतील एचआयव्ही ग्रस्त लोकांमध्ये मॉडर्नाच्या लसीच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्याचा उद्देश होता. दुसरा अभ्यास जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करणारा होता.
उबंटूच्या अभ्यासामध्ये, डिसेंबरमध्ये सुरुवातीला २३० सहभागींची चाचणी घेण्यात आली आणि ३१ टक्के चाचण्या सकारात्मक आल्या. तसेच त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
सिसोनकेच्या अभ्यासात, बीटा आणि डेल्टा उद्रेक दरम्यान २.६ टक्क्यांच्या तुलनेत, ओमायक्रॉनच्या कालावधीत ५७७ सहभागींमध्ये सरासरी लक्षणे नसणाऱ्यांचा दर हा १६ टक्के होता. परिणामी लसीकरण केलेल्यांमध्येही विषाणू वाहून नेण्याची क्षमता असते असे, दक्षिण आफ्रिकन वैद्यकीय संशोधन परिषदेने एका प्रकाशनात म्हटले आहे.
“अनेक लोक लक्षणे नसलेले असू शकतात, त्यामुळे हा विषाणू कोणामधून वाहतो आहे हे आम्हाला नेहमीच माहीत नसते. पण आपल्यासा माहित आहे की आपण स्वतःचे संरक्षण करू शकतो आणि पुढील प्रसार रोखू शकतो. त्यामुळे मास्क घाला, हात धुवा आणि पूर्ण लसीकरण करा,” असे ज्येष्ठ लेखक डॉ. लॉरेन्स कोरी यांनी म्हटले आहे.