Everest explorer remains discovered: १९२४ मध्ये जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याच्या प्रयत्नात नाहीसा झालेल्या अँड्र्यू कॉमिन ‘सँडी अर्विन’ यांचे अवशेष सापडल्याचे वृत्त आले आहे. जॉर्ज मॅलरी यांच्याबरोबर हरवलेल्या अर्विन यांच्या या अवशेषांचा शोध नॅशनल जिओग्राफिकच्या टीमला एका माहितीपटाच्या चित्रीकरणादरम्यान लागला. या शोधामुळे त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी शिखर गाठले होते का, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अँड्र्यू अर्विन कोण आहे?

२२ वर्षांचे अँड्र्यू अर्विनआणि ३७ वर्षांचे जॉर्ज मॅलरी हे ८ जून १९२४ रोजी शेवटचे दिसले होते. त्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा पहिला प्रयत्न केला होता. परंतु, उतरण्यापूर्वी त्यांनी शिखर गाठले होते का, हे त्यांच्या दुर्दैवाने अद्याप अस्पष्टच आहे. १९९९ साली अमेरिकन गिर्यारोहक कॉनराड अँकर यांनी मॅलरीचे शरीर शोधून काढले, परंतु अर्विनचे शरीर आजपर्यंत अज्ञात होते. अँड्र्यू कॉमिन “सँडी अर्विन” (८ एप्रिल १९०२ – ८ किंवा ९ जून १९२४) हे ब्रिटिश गिर्यारोहक होते, त्यांनी १९२४ च्या ब्रिटिश माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत भाग घेतला होता. ही जगातील सर्वात उंच (८,८४८ मीटर) शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठीची ब्रिटनची तिसरी मोहीम होती.

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
loksatta kutuhal interesting facts about the first dinosaur of india
कुतूहल : भारतातील पहिलावहिला डायनोसॉर
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
dinasorus highway
१६ कोटी वर्ष जुना ‘डायनासोर हायवे’ काय आहे? शास्त्रज्ञांना याचा शोध कसा लागला?
Loksatta kutuhal How minerals got their names
कुतूहल: खनिजांना नावे कशी मिळाली?
Tipper hit Talathi Buldhana district, Deulgaon Mahi,
बुलढाणा : वाळू तस्करांचा हैदोस, तलाठ्यावर चक्क टिप्पर घालून…
View northward of Mount Everest
एव्हरेस्ट (विकिपीडिया)

अधिक वाचा: Operation Polo: भारतासाठी महत्त्वाचे ठरलेले ‘ऑपरेशन पोलो’ काय होते?

अँड्र्यू अर्विनचे अवशेष सापडल्याचा विश्वास

सेंट्रल रोंगबुक हिमनदीवर, एव्हरेस्टच्या उत्तर भागाखाली अर्विनचा बूट आणि सॉक्ससह त्याचा पाय सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. सॉक्सवर अर्विनचे नाव A.C. IRVINE लिहिलेले होते. जिथे मॅलरीचे अवशेष सापडले होते त्याच भागात हा शोध लागला. परंतु बूट तुलनेने कमी उंचीवर आढळला. यामुळे असे सूचित होते की, अर्विन मॅलरीच्या तुलनेत जास्त खाली पडला असावा. जिमी चिन, व्यावसायिक गिर्यारोहक आणि दिग्दर्शक, यांनी एरिक रोपके आणि मार्क फिशर या फिल्ममेकर टीमच्या सहकार्याने या शोधाचे नेतृत्व केले. चिन यांनी शोधाच्या क्षणाचे वर्णन करताना सांगितले,”मी सॉक्स उचलला आणि त्यावर लाल लेबल दिसले ज्यावर A.C. IRVINE असे लिहिलेले होते.”हा शोध १९२४ च्या ऐतिहासिक मोहिमेवर अधिक प्रकाश टाकतो. अर्विन आणि मॅलरीने त्यांच्या मृत्यूपूर्वी एव्हरेस्टचे शिखर गाठले होते का?, यावरील चर्चेला त्यामुळे नव्याने वाचा फुटली आहे.

Memorial to Andrew Irvine, by Eric Gill, at Merton College, Oxford
अँड्र्यू इर्विन यांचे स्मारक, मेर्टन कॉलेज

इतिहासकार, गिर्यारोहक, आणि अर्विनचे कुटुंबीय या तरुण गिर्यारोहकाच्या भवितव्याविषयी तर्क लावत आहेत. त्यांची पुतणी आणि चरित्रकार जुली समर्स यांनी या शोधाविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “जिमीने मला सांगितले की, बुटाच्या आत असलेल्या सॉक्सवर A.C. Irvine नाव होते, तेव्हा माझे डोळे अश्रूंनी भरून आले. हा एक विलक्षण आणि हृदयस्पर्शी क्षण होता आणि तो कायम तसाच राहील,” असे त्या द गार्डियनला म्हणाल्या.

… इतिहास पुन्हा लिहिला जाऊ शकतो!

अर्विन आणि मॅलरीने एव्हरेस्टचे शिखर गाठले होते का, हा गूढ प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मात्र, या शोधामुळे अर्विनकडे असलेला कोडक कॅमेरा सापडण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. जर तो कॅमेरा सापडला, तर त्यांच्या संभाव्य शिखर सर करण्याचे छायाचित्रीय पुरावे उघड होऊ शकतात, ज्यामुळे गिर्यारोहणाचा इतिहास पुन्हा नव्याने लिहिला जाऊ शकतो. अर्विन आणि मॅलरीच्या मोहिमेच्या २९ वर्षांनंतर एव्हरेस्टचे शिखर अधिकृतपणे प्रथमच १९५३ साली एडमंड हिलरी आणि तेनसिंग नॉर्गे यांनी सर केले होते.

अधिक वाचा: Indian culture Cambodia: ९०० वर्षे जुनी द्वारपालांची शिल्पं सापडली; कंबोडियात उलगडला भारतीय शिल्पकलेचा वारसा!

डीएनए तपासणी

या शोधाची माहिती चायना तिबेट माउंटेनियरिंग असोसिएशनला देण्यात आली आहे. चायना तिबेट माउंटेनियरिंग असोसिएशन एव्हरेस्टच्या उत्तरेकडील भागाची देखरेख करते, तसेच रॉयल जिओग्राफिकल सोसायटीलाही कळवण्यात आले आहे, जी १९२४ च्या मोहिमेचे सह-आयोजक होती. इर्विन यांच्या कुटुंबीयांनी अवशेषांच्या ओळखीसाठी डीएनए नमुने देण्याची तयारी दर्शवली आहे. रॉयल जिओग्राफिकल सोसायटीचे संचालक प्रोफेसर जो स्मिथ यांनी म्हटले की, “सँडी एक अद्वितीय व्यक्ती होती, त्याने एव्हरेस्ट आणि हिमालयाच्या अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.” पायाचा शोध हा एक महत्त्वपूर्ण नवा पुरावा सादर करतो, परंतु इर्विनचा कॅमेरा आणि इतर पुराव्यांचा शोध अद्याप सुरू आहे. चिन यांनी टिप्पणी केली की, “एव्हरेस्टवरील कोणतीही मोहीम इर्विन आणि मॅलरी यांच्या वारशाच्या छायेतूनच पुढे जाते. आमचीही तशीच गेली.” या शोधामुळे इर्विनच्या कुटुंबाला आणि व्यापक गिर्यारोहण समुदायाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अनुत्तरित गूढ प्रश्नांपैकी एक

इर्विन आणि मॅलरी यांच्या चढाईच्या शेवटच्या क्षणांबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत, परंतु हा अलीकडचा शोध साहसाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अनुत्तरित गूढ प्रश्नांपैकी एक सोडवण्यासाठी नवी आशा निर्माण करतो.

Story img Loader