१६ वर्षांपूर्वी, २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई दहशतवादी हल्ल्याने हादरली होती. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) गटाच्या १० दहशतवाद्यांच्या एका गटाने मुंबई शहरात बोटीच्या सहाय्याने प्रवेश केला आणि संपूर्ण शहरभर भयंकर हल्ले घडवून आणले. चार दिवसांत १६६ लोक मारले गेले आणि ३०० हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्यानी केवळ मुंबईच नाही, तर भारतासह संपूर्ण जग हादरले होते. या घटनेनंतर भारताच्या दहशतवादविरोधी उपायांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले. हा हल्ला इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला म्हणून आजही लोकांच्या स्मरणात आहे. परंतु, अजूनही या हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पापांना न्याय मिळू शकलेला नाही. हल्ल्यात सामील असलेल्या १० पैकी नऊ दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार मारले होते, तर अजमल कसाब याला जिवंत पकडले होते. परंतु, हा हल्ला केवळ या १० जणांचे काम नव्हते. या हल्ल्यामागे अनेक मास्टर माइंड होते. हे दहशतवादी अजूनही जिवंत आहेत. या हल्ल्यातील आरोपी आहेत कुठे? जाणून घेऊ.

अजमल कसाब

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मोहम्मद अजमल अमीर कसाबची बंदूक हातात धरलेली प्रतिमा प्रत्येक मुंबईकराच्या मनात कोरलेली आहे. त्याच्या अटकेनंतर काही महिन्यांनंतर अधिकाऱ्यांना महत्त्वाची माहिती हाती लागली. कसाब हा पाकिस्तानस्थित होता आणि एलईटीकडून अनेक प्रशिक्षण शिबिरांपैकी एका शिबिरात त्याने प्रशिक्षण घेतले होते. मार्च २००९ मध्ये त्याच्यावर खटला सुरू झाला, ज्यामध्ये त्याच्यावर खून आणि भारताविरुद्ध युद्ध छेडणे यासह ८६ गुन्ह्यांचा आरोप होता. जवळजवळ एक वर्षानंतर, मे २०१० मध्ये त्याला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. कसाबने शिक्षेच्या विरोधात अपील केले आणि मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१० मध्ये या खटल्याची सुनावणी सुरू केली. मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०११ मध्ये त्याचे अपील फेटाळले आणि त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात हे अपील केले. २९ ऑगस्ट २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याचे अपील फेटाळून लावले आणि त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर त्याने राष्ट्रपतींकडे क्षमायाचना केली, त्याला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी पुणे शहरातील तुरुंगात फाशी देण्यात आली.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
youth attacked police Mumbai, youth obstructed traffic ,
मुंबई : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाचा पोलिसावर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मोहम्मद अजमल अमीर कसाबची बंदूक हातात धरलेली प्रतिमा प्रत्येक मुंबईकराच्या मनात कोरलेली आहे. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : देवदर्शनावरुन महाराणा प्रतापांच्या वारसदारांमध्ये वाद; वादंगाचं कारण काय?

अबू जुंदाल

१० दहशतवाद्यांना पाकिस्तानातून मुंबईत प्रवेश करण्यासाठी मदत आणि पाठबळ हवे होते. त्यासाठी सैयद जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याने त्यांची मदत केली. अबू जुंदाल एलईटीचा संशयित कार्यकर्ता आहे; ज्याने २६/११ च्या हल्ल्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तपास करणाऱ्यांच्या मते, अन्सारी हा कराचीमध्ये २४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २००८ पर्यंत स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षातून काम करणाऱ्या किमान चार हँडलरपैकी एक होता. हँडलरने इंटरनेट फोन कॉलद्वारे दहशतवाद्यांना सूचना पाठवल्या आणि मीडिया कव्हरेजवर नजर ठेवली होती. २६/११ च्या हल्ल्यानंतर चार वर्षांनी अन्सारीला दिल्लीत अटक करण्यात आली, त्यानंतर कसाबने त्याला त्याच्या हँडलरपैकी एक म्हणून ओळखले. अन्सारी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात बंद आहे, पण त्याची सुनावणी अद्याप रखडलेली आहे.

अबू जुंदाल एलईटीचा संशयित कार्यकर्ता आहे. (छायाचित्र-पीटीआय)

डेव्हिड कोलमन हेडली

२६/११ च्या हल्ल्याच्या तपासात असे दिसून आले की, डेव्हिड कोलमन हेडली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी-अमेरिकन व्यक्तीने दहशतवाद्यांना महत्त्वपूर्ण माहिती पुरवली होती. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, हेडलीने मुंबईतील टार्गेट ठिकाणे शोधून काढली, लष्कर-ए-तैयबा (एलईटी)च्या कार्यकर्त्यांना ठिकाणांची माहिती दिली. लष्करच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मुंबई हल्ल्याची योजना आणि अंमलबजावणी करण्यात मदत केली आणि ताज महाल हॉटेल, ओबेरॉय हॉटेल आणि इतर लक्ष्यित ठिकाणांवर पाळत ठेवली. २०१३ मध्ये अमेरिकेतील न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मुंबईतील नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या नियोजनात त्याच्या भूमिकेशी संबंधित दहशतवादाच्या गुन्ह्यांसाठी ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर डेन्मार्कमधील एका वृत्तपत्र कार्यालयावर प्रस्तावित हल्ला केल्याबद्दलही त्याला दोषी ठरवण्यात आले. परंतु, अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाची भारताची विनंती अनेक वेळा फेटाळण्यात आली आहे. याचे कारण असे की, अमेरिकेचा असा विश्वास आहे की यामुळे दुहेरी धोका निर्माण होईल आणि त्याला एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा दिली जाईल.

डेव्हिड कोलमन हेडली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी-अमेरिकन व्यक्तीने दहशतवाद्यांना महत्त्वपूर्ण माहिती पुरवली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

तहव्वूर राणा

हेडलीचा मित्र तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी असून त्याने २६/११ च्या मुंबई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुंबई हल्ल्यात एलईटीला मदत करणारी ब्ल्यू प्रिंट राणाने दिल्याचा आरोप तपासकर्त्यांनी केला आहे. त्याच्यावर गुन्हेगारी कट रचणे, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे किंवा छेडण्याचा प्रयत्न करणे आणि भारतीय दंड संहिते अंतर्गत अनेक आरोप आहेत. राणाला नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि मुंबईतील ज्यू आउटरीच सेंटर चबड हाऊसवर हल्ल्याचा कट रचण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचाही आरोप आहे. डॅनिश वृत्तपत्रावर हल्ला करण्याची योजना आखण्यातही त्याने मदत केली होती, ज्यामध्ये हेडलीचा सहभाग होता.

हेडलीचा मित्र तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी असून त्याने २६/११ च्या मुंबई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. (छायाचित्र-पीटीआय)

राणाने हेडलीला मुंबईत रेकी करताना पैसे पुरवले होते, सप्टेंबर २००६ मध्ये त्याला २२,५०० रुपये, ऑक्टोबर २००६ मध्ये ६७,६०५ रुपये, नोव्हेंबरमध्ये १७,६३६ रुपये आणि डिसेंबरमध्ये ४५,२०० रुपये दिले होते. २०२० मध्ये राणाला अमेरिकेने अटक केली होती आणि भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. सप्टेंबरच्या उत्तरार्धात, कॅलिफोर्नियातील एका न्यायालयाने निर्णय देत सांगितले की, राणाचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते. या निर्णयानंतर त्याने आता अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत राणाने असा युक्तिवाद केला आहे की, त्याच घटनेशी संबंधित आरोपातून त्याला शिकागो येथील फेडरल कोर्टात निर्दोष मुक्त करण्यात आले आणि त्याच्या प्रत्यार्पणामुळे दुहेरी धोक्याच्या तत्त्वाचे उल्लंघन होईल असा दावा त्याने केला आहे. त्याच्या याचिकेत भारतात खटला चालवला गेला आणि दोषी ठरल्यास संभाव्य मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यताही त्याने आपल्या याचिकेतून वर्तवली आहे.

हाफिज सईद

एलईटीचा सहसंस्थापक हाफिज सईद हा २६/११ च्या मुंबई हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचा आरोप भारत आणि अमेरिकेने केला आहे. मात्र, त्याने हा आरोप फेटाळून लावला आहे. २०१९ मध्ये सईदला जानेवारीमध्ये संयुक्त राष्ट्रांबरोबर दहशतवादी वित्तपुरवठा केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने ताब्यात घेतले होते आणि सात दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यामुळे तो ७८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत असल्याचे विधान जारी केले होते. गेल्या डिसेंबरमध्ये भारताने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांच्यासमवेत सईदच्या प्रत्यार्पणासाठी पाकिस्तानला औपचारिक विनंतीदेखील केली होती. “आम्ही पाकिस्तान सरकारला संबंधित सहाय्यक कागदपत्रांसह विनंती केली आहे. भारताच्या विनंतीला पाकिस्तानने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही,” असे निवेदनात सांगण्यात आले होते.

एलईटीचा सहसंस्थापक हाफिज सईद हा २६/११ च्या मुंबई हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचा आरोप भारत आणि अमेरिकेने केला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : PAN 2.0: पॅन कार्डमध्ये होणार बदल; काय आहे पॅन २.० प्रकल्प? जुने कार्ड निरुपयोगी ठरणार?

साजिद मीर

एलईटीचा वरिष्ठ कमांडर साजिद मीर याच्यावरही २६/११ च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप आहे आणि तो भारतात वाँटेड आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मीरने हल्ल्यांसाठी पूर्वतयारी आणि टोपणनावांसाठी मदत केली होती. मुंबईतील दहशतवाद्यांच्या पाकिस्तानस्थित नियंत्रकांपैकी तो एक होता. हल्ल्यापूर्वी लक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी त्याने हेडलीला मुंबईत पाठवल्याचेही समजते.

एलईटीचा वरिष्ठ कमांडर साजिद मीर याच्यावरही २६/११ च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

जून २०२२ मध्ये मीरला पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात १५ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. डिसेंबर २०२३ मध्ये त्याला विषबाधा झाल्याची आणि तो व्हेंटिलेटर सपोर्टवर असल्याची बातमी आली होती, तेव्हा तो पुन्हा एकदा चर्चेत आला. परंतु, काहींचा असा विश्वास आहे की पाकिस्तानच्या लष्करी-गुप्तचरांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव टाळण्यासाठी ही माहिती जारी केली असावी.

Story img Loader