संपूर्ण जगभरातील समुद्रावर जवळपास १७० लाख कोटी प्लास्टिकचे तुकडे पसरले असून, त्यांचे वजन अंदाजे दोन दशलक्ष मेट्रिक टन असल्याची माहिती नव्या संशोधनामुळे समोर आली आहे. समुद्रात वाहून जाणाऱ्या प्लास्टिकवर वेळीच रोख लावला नाही, तर २०४० पर्यंत ही संख्या तिपटीने वाढू शकते, अशीही भीती वर्तविण्यात येत आहे. PLoS ONE या जर्नलमध्ये अनेक लोकांच्या अभ्यासाअंती याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. कॅलिफोर्नियाची फाइव्ह गेयर्स संस्थेच्या (5 Gyres Institute) लिसा एम एर्डले (Lisa M Erdle) आणि मार्कस एरिक्सन (Marcus Eriksen), प्लास्टिक प्रदूषण संशोधन मूर संस्थेचे (Moore Institute for Plastic Pollution Research) विन काऊगर (Win Cowger), स्टॉकहोम रेसिलियन्स केंद्राच्या (स्वीडन) पॅट्रिका व्हिलारुबिया गोम्झ (Patricia Villarrubia-Gómez) आणि इतर सहा संशोधकांनी एकत्र येऊन अभ्यास करून हा अहवाल प्रकाशित केला आहे.

या संशोधनाबाबत माहिती देताना व्हिलारुबिया गोम्झ म्हणाल्या की, ज्या प्रमाणात अपेक्षा केली होती, त्यापेक्षाही अनेक पटींनी गंभीर ही समस्या आहे. २०१४ मधील पाहणीनुसार जगभरातील समुद्रात पाच लाख कोटी प्लास्टिक कण असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर आता दहा वर्षांच्या आतच ही संख्या १७० लाख कोटींवर पोहोचली आहे.

Smart insulin
Diabetes ‘Smart’ Insulin:मधुमेहाच्या रुग्णांसाठी आता ‘स्मार्ट’ इन्सुलिन; काय सांगते नवीन संशोधन?
Raigad district abandoned Dead bodies, Raigad district dumping ground, Raigad district police, Raigad district latest news, abandoned Dead bodies, Raigad district marathi news,
विश्लेषण : रायगड जिल्हा बनलाय बेवारस मृतदेहांचे ‘डम्पिंग…
Harappan cooking techniques
Indus Valley Civilization: उलगडली हडप्पाकालीन खाद्यसंस्कृती; भांड्यांच्या अवशेषांमध्ये नेमके सापडले काय?
Cinderella Complex
‘तो येईल आणि मला वाचवेल’ हे सांगणारा ‘Cinderella Complex’ म्हणजे नक्की काय?
Bigg Boss 18_ donkey Gadhraj gets evicted
Bigg Boss 18: गाढव पाळणे हा भारतात गुन्हा आहे का?
male breast cancer
पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? कारण काय? त्यांच्यावर करण्यात येणारे उपचार स्त्रियांपेक्षा वेगळे असतात का?
after yahya sinwar who will lead hamas
Yahya Sinwar Death: याह्या सिनवारच्या हत्येनंतर हमासचे नेतृत्व कोण करणार?
vaccination campaign launched reduce obesity among obese unemployed youth In Britain
लठ्ठ बेरोजगारांचा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर ‘बोजा’! सडपातळ आणि रोजगारक्षम बनवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवणार?
Why political conflict in Navi Mumbai is becoming troublesome for BJP
नवी मुंबईतील राजकीय संघर्ष भाजपसाठी तापदायक का ठरतोय? गणेश नाईकांची शिंदेसेनेकडून कोंडी होतेय?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ दैनिकाशी बोलत असताना विन काऊगर म्हणाले की, समुद्रातील एकूण प्लास्टिकचे प्रमाण जोखणे हे अवघड काम आहे. समुद्रावर तरंगणाऱ्या प्लास्टिकपैकी बरेचसे प्लास्टिक हे मायक्रोप्लास्टिक आहे. या प्लास्टिकचा व्यास ५ मिमीहून कमी आहे. मायक्रो प्लास्टिकमधील निरुपद्रवी घटक वेगळे होतात, समुद्री जीवांसाठी ते खूप हानीकारक ठरत आहेत. समुद्री जीवांना असे प्लास्टिक अन्न असल्याचे वाटून ते खाल्ले जाऊ शकते. ज्यामुळे सागरी जैवविविधता आणि परिसंस्थेच्या संतुलनाला धोका उत्पन्न झाला आहे.

हे वाचा >> विश्लेषण: सर्व प्रकारच्या प्लास्टिकची पुर्नप्रक्रिया का होऊ शकत नाही?

या संशोधनातून कोणत्या नव्या गोष्टी समोर आल्या?

या अहवालासाठी, जगभरातील सहा मोठ्या समुद्र क्षेत्रात असलेल्या १२ हजार समुद्री केंद्रांमधील १९७९ ते २०१९ पर्यंतचा समुद्राच्या पृष्ठभागावरील प्लास्टिक प्रदूषणाशी निगडित असलेला डेटा गोळा करण्यात आला. संशोधकांनी स्वतः राबविलेल्या या मोहिमेत जे अनुमान काढण्यात आले होते, त्याच्याशी या डेटाची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीच्या विश्लेषणानंतर संगणकीय प्रणालीच्या मदतीने संशोधकांनी वरील आकडेवारी काढली आहे. यामध्ये सध्या समुद्रात असलेल्या मायक्रो प्लास्टिकच्या अंदाजासोबतच गेल्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढलेली प्लास्टिकची संख्या आणि नजीकच्या काळात समुद्रात निर्माण होणार् प्लास्टिकचा भस्मासुर याबाबत भाकीत वर्तविले आहे.

१९९० ते २००५ या काळात समुद्रातील प्लास्टिक तुकड्यांची किंवा कणांची संख्या ही वर-खाली होत असल्याचे संशोधकांनी या अहवालात म्हटले आहे. त्याचे मोठे कारण म्हणजे, या काळात प्लास्टिकप्रदूषण रोखण्यासाठी धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. १९८० आणि ९० च्या दशकात मार्पोल ॲनेक्स फाइव्ह (MARPOL Annex 5) हे आंतरराष्ट्रीय धोरण अवलंबले गेले होते. या धोरणानुसार समुद्राची कचराकुंडी करण्यावर बंधने घालण्यात आली होती. या चांगल्या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे समुद्रात सोडल्या जाणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यावर आवर घातला गेला, अशी माहिती लिसा एम एर्डले यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.

एर्डले पुढे म्हणाल्या, “२००५ नंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. या काळात जगभरात प्लास्टिकचे उत्पादन वाढीस लागले. २००५ पासून जगभरात ५० लाख टन प्लास्टिकची निर्मिती झाली आहे. प्लास्टिकचे उत्पादन जसे वाढत जाईल त्या प्रमाणात प्रदूषणदेखील वाढणार. प्लास्टिकप्रदूषण रोखण्यासाठी आता जुनी धोरणे आणि कायदे पुरेसे नाहीत.”

संशोधकांनी संपूर्ण जगाला इशारा देतान म्हटले आहे की, समुद्राती वाढत्या प्लास्टिकचे प्रमाण रोखण्यासाठी आताच काही कठोर पावले उचलली नाहीत, तर २०४० पर्यंत समुद्रातील प्लास्टिक कचऱ्याची संख्या तिपटीने वाढेल. एर्डले यांनी सांगितले की, २१ व्या शतकाच्या सुरुवातीलाच प्लास्टिकप्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी योजना तयार करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. यासाठीच आम्ही आमच्या अहवालात संयुक्त राष्ट्रांनी प्लास्टिकप्रदूषण रोखण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना राबविण्याची सूचना केली आहे. ही उपाययोजना स्वयंसेवा तत्त्वावर किंवा प्रतिबंधक उपाययोजनांपुरती न ठेवता ती सर्व देशांना बंधनकारक केली पाहिजे. या पर्यायांमध्ये समुद्रातील कचरा साफ करणे आणि त्याचा पुनर्वापर करणे याही पुढे जाऊन काहीतरी ठोस उपाय असले पाहिजेत.

हे ही वाचा >> विश्लेषण: सागरी जैवविविधता संवर्धनाची गरज का जाणवते? यासाठी मासेमारीवर नियंत्रण आणले जाईल का?

सागरी जीवनावर मायक्रो प्लास्टिकचा काय परिणाम होतो?

एका अभ्यासानुसार मायक्रो प्लास्टिक हे समुद्री जीवांसाठी हानीकारक ठरत असून समुद्री वनस्पतींपासून ते व्हेल आणि डॉल्फिन माशांवर त्याचे घातक परिणाम दिसू लागले आहेत. एरिक्सन यांनी सांगितले की, मायक्रो प्लास्टिकचे कण समुद्री जीवांच्या शरिरात जाऊन हृदयाला छेद किंवा ब्लाकेजेस वाढवत आहे. ज्यामुळे माशांच्या अंतर्गत शारीरिक रचनेला मोठा धोका संभवत आहे. समुद्री जीवांच्या शरीरात मायक्रो प्लास्टिकचे कण गेल्यानंतर होणारे रासायनिक बदल जीवांसाठी घातक आहेत. मायक्रो प्लास्टिक डीडीटी, पीसीबी अशा हायड्रोफोबिक संयुगांना शोषून घेण्याचे काम करते. (DDT, PCBs ही सजीवांसाठी घातक रसायने असून ती ३० वर्षांपूर्वीच बंद करण्यात आली आहेत.)

मायक्रो प्लास्टिकचा फटका फक्त समुद्री जीवांनाच नाही तर समुद्राच्या कार्बन सायकललाही बसत आहे. ग्रिस्ट नियतकालिकाने याबाबत अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली आहे. समुद्रातील वनस्पती (phytoplankton) कार्बन शोषून घेण्याचे काम करतात. या वनस्पती झूप्लँक्टन (zooplankton) या समुद्री जीवाचे भक्ष्य आहेत. कार्बनयुक्त वनस्पती खाल्ल्यानंतर झूप्लँक्टन या जीवाकडून त्याचे रूपांतर विष्ठेत (faecal pellets) होते. ही विष्ठा समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत तरंगत किनाऱ्यावर आदळते आणि त्यातून कैक वर्षांनंतर खडकाची निर्मिती होते. खडकाची निर्मिती झाल्यामुळे कार्बन पुन्हा वातावरणात जाण्यापासून रोखला जातो. ही प्रक्रिया समुद्राचे कार्बन सायकल म्हणून ओळखली जाते.

पण प्लास्टिकप्रदूषण वाढल्यापासून झूप्लँक्टन (zooplanktons) यांच्या पोटात मायक्रो प्लास्टिक जात आहे. यामुळे झूप्लँक्टन यांना इतर समुद्री प्राणी भक्ष्य करत नाहीत. परिणामी समुद्रसपाटीवर कार्बन faecal pellets स्वरूपात पोहोचत नाही. त्यामुळे खडकाच्या स्वरूपात त्याचे कायमचे रूपांतर होण्याची प्रक्रिया मंदावण्याची शक्यता आहे.

समुद्रातील प्लास्टिकप्रदूषण रोखण्यासाठी काय करायला हवे?

संशोधकांनी सुचविलेल्या पर्यायानुसार, जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन ‘एकदाच वापरा आणि फेका’ (single use) या प्रकारातील प्लास्टिक उत्पादन करणे तात्काळ थांबविण्याचा ठराव केला पाहिजे. प्लास्टिक कचरा निर्माण होण्यास शहरे अधिक जबाबदार आहेत, त्यामुळे शहरातील लोकांनी प्लास्टिकचा कचरा अधिक होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच प्लास्टिक उत्पादन करताना त्यातील रासायनिक Additives (प्लास्टिक दीर्घकाळ टिकण्यासाठी करण्यात येणारी प्रक्रिया) कमी केले पाहिजे.

प्लास्टिक पुनर्वापराच्या तंत्रज्ञानात आणखी प्रगती होणे गरजेचे आहे. प्लास्टिकनिर्मात्यांनी ते कसे पुन्हा वापरता येईल, याचा विचार करूनच उत्पादन केले पाहिजे. पुनर्प्रक्रिया केलेले प्लास्टिक तुलनेने महाग असल्यामुळे अनेक कंपन्या पुन्हा कच्चे प्लास्टिक विकत घेण्यावरच भर देतात. त्यामुळे प्लास्टिकची पुनर्प्रक्रिया हा एक अपयशी प्रकल्प ठरला आहे. एर्डले यांनी सांगितले की, प्लास्टिकनिर्मात्या कंपन्यांनी त्यांच्या नव्या उत्पादनात कमीत कमी ७५ टक्के पुनर्प्रक्रिया केलेले प्लास्टिक वापरण्याचे कायदेशीर बंधन घातले पाहिजे. तरच वाढत्या प्लास्टिकवर नियंत्रण मिळवता येईल.