Roman egg found in Aylesbury still has contents after 1,700 years: इंग्लंडमधील एका रोम संस्कृतीच्या स्थळावर आश्चर्यकारक शोध लागला आहे, तिथे १,७०० वर्षे जुने कोंबडीचे अंड ‘योक आणि पांढऱ्या’ भागासह उल्लेखनीयरीत्या सुरक्षित स्थितीत सापडले आहे. हा दुर्मिळ शोध आयल्सबरी शहरात उघडकीस आला असून हजारो शतकांपूर्वीचे कोंबडीचे अंडे अद्याप त्याच्या अंतर्गत भागासह सापडण्याचा हा एकमेव प्रसंग मानला जात आहे. ऑक्सफोर्ड आर्किऑलॉजीचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक एडवर्ड बिडल्फ यांनी या शोधाबद्दल आश्चर्य व्यक्त करताना म्हटले आहे की, “जेव्हा आम्ही त्यामध्ये योक आणि पांढरा भाग पाहिला, तेव्हा आम्ही अगदी थक्क झालो, कारण आम्हाला अपेक्षा होती की हे घटक गळून गेले असतील.”

अंड का टिकून राहिले? Why This Egg Survived for 1,700 Years

लाइव्ह सायन्सने दिलेल्या माहितीनुसार रोमन काळातील स्थळावर झालेल्या उत्खननात सापडलेल्या चार अंड्यांपैकी हे एक अंडे होते. त्यापैकी तीन अंडी फुटून तीव्र दुर्गंधी पसरली, तर एक अंडे अखंड राहिले. हे अखंड अंडे युनिव्हर्सिटी ऑफ केंट येथे मायक्रोस्कोपिक कम्प्युटेड टोमोग्राफी (मायक्रो-सीटी) स्कॅनला पाठवण्यात आले आहे. ही चारही अंडी पाणथळ खड्ड्यात सापडली, हा खड्डा पूर्वी धान्य मॉल्टिंग आणि बिअर तयार करण्यासाठी वापरण्यात येत होता, परंतु नंतर देवतांना अर्पण ठिकाणासाठी पुनर्वापर केला गेला. या ठिकाणी अनायरोबिक (Anaerobic) परिस्थितीमुळे सेंद्रिय साहित्य चांगल्या स्थितीत संरक्षित राहिले, ज्यामुळे रोमन जीवनाची झलक मिळाली. अंड्यांव्यतिरिक्त येथे लाकडी टोपली, चामड्याचे बूट, तसेच विविध लाकडी भांडी आणि उपकरणेही सापडली आहेत.

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
**Why does the Earth appear flat despite being round?**
Why Earth Looks Flat:पृथ्वी गोल असूनही ती सपाट कशामुळे दिसते?
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती

अधिक वाचा: 2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते?

अंड कुठे ठेवण्यात आले आहे?

या अंड्याचे झालेले जतन अभूतपूर्व मानले जात आहे. यापूर्वी केवळ एक रोमन काळातील अंडे आढळले होते, जे व्हॅटिकनजवळ दफन केलेल्या एका लहान मुलाच्या हातात होते आणि त्यामध्ये कोणताही द्रव नव्हता. रोमन काळात अंडी प्रजननक्षमता आणि पुनर्जन्म यांच्याशी जोडलेली असत आणि ती प्रामुख्याने मित्ह्रास आणि मर्क्युरी यांसारख्या देवतांचे प्रतीक मानली जात. आता हे अंडे आयल्सबरीतील एका संग्रहालयात ठेवण्यात आले आहे, तिथे त्याच्या कवचाला हानी न पोहोचवता त्यातील भाग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे अंडे ऐतिहासिक आणि वैज्ञानिक अभ्यासासाठी केंद्रबिंदू ठरले आहे.

रोमन कालीन धर्म आणि पौराणिक कथांमध्ये अंड्यांचे प्रतिकात्मक महत्त्व / The Symbolism of Eggs in Roman Religion and Culture

१. प्रजननक्षमता आणि पुनर्जन्म: अंडी प्रजननक्षमता, पुर्नविकरण आणि जीवनाच्या चक्रात्मक स्वरूपाचे वैश्विक प्रतीक मानली जात. ती वसंत ऋतू आणि कृषी पुनरुज्जीवनाशी जोडली गेली होती, ज्यामुळे हिवाळ्यानंतर निसर्गाचा पुनर्जन्म सूचित होत असे.

२. देवतांना अर्पण: रोमन धार्मिक विधींमध्ये अंडी देवतांना अर्पण करण्यासाठी नियमितपणे वापरली जात. अशी श्रद्धा होती की अंड्यांमध्ये गूढ शक्ती आहेत, त्या शक्ती प्रजननक्षमता, सौभाग्य आणि संरक्षणासाठी आशीर्वाद मिळवून देऊ शकतात.

३. देवतांशी संबंध: मित्ह्रास: मित्ह्रास या प्रकाश आणि ब्रह्मांडाच्या देवतेशी अंडी जोडली गेली होती. त्यांच्या पौराणिक कथांमध्ये अंड्यातून निर्माण होणाऱ्या सृष्टी आणि जीवनाचे विषय अनेकदा दिसून येतात. मर्क्युरी: आत्म्यांचा मार्गदर्शक आणि संदेशवाहक मर्क्युरी कधी कधी अंड्याशी प्रतिकात्मकदृष्ट्या जोडला जाई, विशेषतः सुरुवात आणि संक्रमण यांच्याशी असलेल्या अंड्याच्या संबंधामुळे या संबंध जोडला गेला. अशा प्रकारे, अंड्यांनी रोमन धर्म आणि पौराणिक कथांमध्ये जीवन, पुनर्जन्म आणि चमत्कारी शक्तींचे प्रतीक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

अधिक वाचा: Viral Black Cat-Golden Retriever: ‘ब्लॅक कॅट’ गर्लफ्रेंड म्हणजे काय? हा व्यक्तिमत्त्वाचा प्रकार नातेसंबंधांवर कसा परिणाम करू शकतो?

४. अंत्यसंस्कार विधींमध्ये अंड्यांची भूमिका: मृत्यूनंतरच्या जीवनाचे प्रतीक: अंडी अंत्यसंस्कार विधींमध्ये पुनर्जन्म आणि मृत्यूनंतर जीवनाच्या निरंतरतेचे प्रतीक म्हणून समाविष्ट केली जात. मृत व्यक्तीच्या नव्या अस्तित्वाच्या प्रवासाचे प्रतीक म्हणून ती कधी कधी थडग्यात किंवा कबरीत ठेवली जात. अंडी, इतर प्रतीकात्मक अन्नासह, मृत व्यक्तींसोबत दफन केली जात किंवा बलिदानासाठी खड्ड्यात ठेवली जात. यामुळे देवता प्रसन्न होतील आणि आत्म्याचा प्रवास निर्विघ्न होईल, अशी श्रद्धा होती. या प्रथांमधून अंड्यांनी रोमन संस्कृतीत जीवन, पुनर्जन्म आणि आध्यात्मिक प्रवासाचे प्रतीक म्हणून महत्त्वपूर्ण स्थान मिळवले.

(freepik)

या अंड्याच्या कथेचा परिणाम:

१,७०० वर्षे जुने अंडे रोमन काळातील जीवनशैली, धार्मिक आस्था वा श्रद्धा आणि संरक्षण तंत्रांची गोष्ट सांगते. अशा दुर्मिळ शोधांमुळे प्राचीन समाजाचे वेगळे पैलू उजेडात येतात आणि आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल अधिक समज विकसित होते. ह शोध इतिहासप्रेमी आणि वैज्ञानिक अभ्यासकांसाठी एक महत्त्वपूर्ण खजिना ठरले आहे.