लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी महाठग संजय राय शेरपुरिया याला यूपीच्या एसटीएफने अटक केली आहे. दिल्लीचे बडे उद्योगपती गौरव दालमिया यांच्याबरोबर ६ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात शेरपुरियांचा सहभाग आहे. बडे नेते आणि अधिकारी यांच्याशी संबंध असल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. संजय राय शेरपुरिया हे दिल्लीत राहत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते गाझीपूरमध्ये वास्तव्याला होते. ते गुजरातमधील मोठे उद्योगपती आहेत. शेरपुरिया हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे डिफॉल्टर आहेत. संजय आणि त्यांची पत्नी कांचन प्रकाश राय यांच्यावर त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून SBI ची ३५० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने संजय प्रकाश राय शेरपुरियाद्वारे चालवल्या जाणार्‍या युवा ग्रामीण उद्योजक फाऊंडेशन (YREF) ला राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) मार्फत २ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले. परंतु ते पैसे राय यांनी लाटल्याचा आता आरोप केला जात आहे. राय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांसोबतचे स्वत:चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे आणि या पोस्ट्सचा वापर करून लोकांची फसवणूक करायचे, असा दावा त्याच्याविरुद्धच्या पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे. खरं तर शेरपुरिया यांना काही दिवसांपूर्वीच तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली होती. तसेच सरकारमध्ये संशयास्पद “कनेक्शन” असल्याचे दाखवून पैसे गोळा केल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare (1)
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले? लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होणार? आदिती तटकरेंनी थेट पत्रकच काढलं
fake power of attorney marathi news
सोलापूर : नामसाधर्म्याचा फायदा घेऊन बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे फसवणूक
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Today is death anniversary of Nani Palkhiwala who secured fundamental rights in Kesavanand Bharti case
स्मरण एका महान विधिज्ञाचे…
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या नोंदीनुसार, YREF ची स्थापना ३० ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आली. या कंपनीचे वाराणसी येथे कार्यालय असून, ती गाझीपूर येथून चालवली जाते, जे राय यांचे मूळ गावही आहे. राय यांच्याकडे YREF मध्ये कोणतेही पद नाही, परंतु ही कंपनी राय यांच्या मार्फत चालवली जाते, असा त्यांच्याविरुद्धच्या एफआयआरमध्ये दावा करण्यात आला आहे.

मर्यादित हमीद्वारे कंपनी (company limited by guarantee) म्हणजे काय?

गॅरंटीद्वारे मर्यादित असलेली कंपनी अशी आहे, ज्यामध्ये कंपनी दिवाळखोर झाल्यास ती चालवणाऱ्यांना फक्त हमीची रक्कम परत द्यावी लागेल, ज्याची त्यांनी कंपनी स्थापन करतेवेळी हमी दिली होती. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास अशा कंपनीचे कोणतेही भागधारक नसतात, परंतु सदस्य किंवा जामीनदार नावाच्या लोकांच्या गटाकडून ही कंपनी चालवली जाते. कंपनी स्थापन करण्यासाठी एकत्र येत असताना हे सदस्य काही रक्कम देण्याचे वचन देतात, सामान्यतः मोठी रक्कम नाही. जर कंपनी दिवाळखोरीत निघाली तर त्यांचे दायित्व या रकमेपर्यंत मर्यादित असते. सहसा ही रचना सेवाभावी संस्था आणि ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थांसाठी ठेवली जाते, जिथे कंपनीने कमावलेला नफा पुन्हा व्यवसायात गुंतवला जातो. सभासद किंवा जामीनदार कंपनीच्या नावाने देणग्या आणि निधी मागू शकतात, परंतु ते जर अडचणीत सापडले तर त्यांनी जमा केलेल्या कर्जापासूनही बचाव करू शकतात.

शेरपुरियांची कंपनी काय करत होती?

शेरपुरिया सोशल मीडियावर YREF चा प्रचार करून लोकांची फसवणूक करीत होते. कंपनीला ५ कोटी रुपये (२१ जानेवारी २०२३) आणि १ कोटी रुपये (२३ जानेवारी २०२३) दालमिया फॅमिली ट्रस्ट ऑफिस, उद्योगपती गौरव दालमिया यांच्या कौटुंबिक कार्यालयातून बँक खात्यात मिळाल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान पोलिसांना समजले. ट्रस्ट कार्यालयाच्या जवळच्या सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, समूहाने गेल्या ६-७ वर्षांत धर्मादाय संस्थांना १०० कोटी रुपयांहून अधिक देणग्या दिल्या आहेत. राय यांनी त्यांची ओळख युवा ग्रामीण उद्योजक फाऊंडेशनशी संबंधित असल्याचे केली होती, परंतु त्यांनी दावा केला होता की, ते औपचारिकपणे कंपनीती कुठेही सहभागी नव्हते. १ डिसेंबर २०२२ रोजी YREF ला दिलेल्या पत्रानुसार, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ५.८५ कोटी रुपये ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्म (BMF) स्थापन करण्याच्या कंपनीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यामध्ये विभागाने NDDB मार्फत अर्थसहाय्य म्हणून २ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली.

NDDB सूत्रांनी सांगितले की, मंत्रालयाने प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर NDDB ने प्रत्यक्ष पडताळणीसाठी YREF शी संपर्क साधला आणि बँकेने कर्जाचा पहिला टप्पा जारी केला आहे का ते विचारले, परंतु फाउंडेशनने आजपर्यंत प्रतिसाद दिलेला नाही. BMF उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना उच्च अनुवांशिक गुणवत्तेची गायी आणि म्हशींच्या प्रजाती उपलब्ध करून देणे हा आहे. राय यांच्याविरुद्ध लखनऊच्या विभूती खांड पोलीस ठाण्यात मंगळवारी (२५ एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आला आणि पंतप्रधानांशी खोटे संबंध असल्याचे दाखवून खोटी कागदपत्रे बनवून लोक आणि संस्थांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम गोळा केल्याच्या आरोपावरून बुधवारी एसटीएफने त्यांना अटक केली. इन्स्पेक्टर सचिन कुमार यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राय यांच्यावर IPC कलम ४२०, ४६७, ४६८, ४६९ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader