20 years after Indian Ocean tsunami: नवीन वर्षाच्या आगमनाची तयारी जोमाने सुरु झाली आहे. परंतु भूतकाळात डोकावून पाहताना २० वर्षांपूर्वी याच कालखंडात या आनंदाला लागलेल्या ग्रहणाची आठवणही तितकीच भीषण आहे. २००४ साली ९.१ तीव्रतेच्या भूकंपामुळे आलेल्या त्सुनामीने तब्बल १४ देशांमध्ये विध्वंस घडवून आणला. २,२७,००० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले. जे वाचले त्यांचेही आयुष्य सुकर नव्हते. मानसिक धक्का आणि आर्थिक अडचणींनी त्यांचे आयुष्य व्यापून टाकले. त्यानंतर आता दोन दशकानंतर अमलात आणण्यात आलेली ‘त्सुनामी इशारा प्रणाली’ ही इतिहासातील सर्वात प्राणघातक नैसर्गिक आपत्तीतून शिकलेल्या कठोर धड्यांचे प्रतिबिंब आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवीन वर्षाच्या आगमनापूर्वीच शेवट
२६ डिसेंबर २००४ ची सकाळ होती. ख्रिसमस नंतरचा शांत रविवार. नवीन वर्षाच्या आगमनाची वाट पाहणारी ही शांतता वादळापूर्वीची होती, याची जाणीव खचितच कोणाला झाली असेल. दिवस जसा चढत गेला तसतसे निसर्गाने रौद्ररूप धारण केले. पाण्याची एक प्रचंड भिंत भारतीय महासागराच्या किनाऱ्यांवर येऊन आदळली आणि एकच हाहाकार झाला. आजवर नोंदवण्यात आलेल्या सर्वांत मोठ्या भूकंपांपैकी हा एक होता. त्यामुळे महासागराच्या तळाशी ८०० मैल (१,३०० किलोमीटर) अंतरापर्यंत तडे गेले. सुनदा ट्रेंचमधील खोलवरच्या हादऱ्यांनी इंडोनेशिया, श्रीलंका, भारत आणि थायलंडसह १४ देशांपर्यंत धक्के पोहोचवले. काही तासांतच २००४ साली झालेला भूकंप आणि आलेली त्सुनामी इतिहासातील सर्वांत प्राणघातक नैसर्गिक आपत्तींपैकी एक ठरली. या त्सुनामीने २,२७,००० हून अधिक लोकांचे प्राण घेतले तर वाचलेले लोक सुन्न आणि हादरलेल्या अवस्थेत ढिगारे चाचपत आपल्या प्रियजनांचा शोध घेत संघर्ष करत राहिले.
अधिक वाचा: Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील सत्य नेमके काय?
एक भीतीदायक अनुभव
कन्याकुमारी जिल्ह्यातील पल्लमथुराई येथील ६५ वर्षीय पर्यावरणतज्ज्ञ आणि प्राणिशास्त्र या विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. वारीथियाह कॉन्स्टंटाईन आपल्या कुटुंबाबरोबर घरी असतानाच त्यांना ही बातमी समजली. दिवस संपत असतानाच बातमी वाऱ्यासारखी पसरली. तिचं स्वरूप समजण्याच्या पलिकडचं होतं. कीळ मनक्कुडी, कोट्टील्पाडू आणि कोलाचेलसारख्या ठिकाणांहून विध्वंसाच्या बातम्या येत होत्या. कॉन्स्टंटाईन कुटुंबाची चिंता वाढत होती कारण डॉ. वारीथियाह यांचे आई- वडील कोलाचेलजवळच्या वणियाकुडी या किनारपट्टीवरील गावात एका कौटुंबिक कार्यक्रमाला गेले होते. डॉ. वारीथियाह सांगतात, भीतीच वातावरण वाढत होतं, दुसऱ्या दिवशी मी माझ्या दुचाकीवर वणियाकुडीला गेलो. माझी ८२ वर्षांची आई थोडक्यात वाचली होती. पाणी उसळल्यावर तिला भिंतीचा आश्रय मिळाला आणि तिचे प्राण वाचले तर एका नातेवाईकाने जिल्हा रुग्णालयातील शवागृहात जाऊन वडील मृतांमध्ये नसल्याची खात्री केली. सुदैवाने, तेही सुरक्षित होते.
समुद्राचा प्रचंड धक्का
कोळ्यांसाठी समुद्र हा मुख्य आधार, त्यांचा पोषणकर्ता. परंतु त्याच समुद्राने रौद्ररूप धारण केले. कीळ मनक्कुडी येथील मच्छीमार बेशी अँटनी रायन सांगतात, पाण्याची भिंत जणू किनाऱ्याच्या दिशेने सरकत होती. त्या लाटेने महामार्गाच्या भल्या मोठ्या पुलाचे मोठे तुकडे केले. पाच मिनिटांच्या कालावधीतच आपल्या बरोबर पुरुष, महिला, मुले आणि ढिगारा सर्वकाही घेऊन ती लाट परतली. परिणाम अत्यंत वेदनादायी होते. अनेक दिवस उलटल्यानंतरच मृतदेह सापडले आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. बहुतेक मृतदेह पझयार खाडी आणि अनंता व्हिक्टोरिया मार्तंड वर्मा कालव्याजवळील चिखल आणि मीठाच्या तलावांमध्ये आढळले.
आर्थिक व भावनिक फटका
वाचलेले लोक आपली घरं सोडून जवळच्या गावांमध्ये जिथे मदत छावण्या उभारण्यात आल्या होत्या तिथे गेले. त्सुनामीचा प्रभाव भावनिक जितका होता तितकाच आर्थिकदृष्ट्याही विनाशकारी होता. संपूर्ण खेडी उद्ध्वस्त झाली, घरं वाहून गेली आणि मासेमारीसाठी लागणारी साधनसामग्री समुद्रात गडप झाली. “जो समुद्र नेहमी मच्छीमार समुदायासाठी उपजीविकेचा स्रोत होता, तोच विनाशकारी शक्तीत रूपांतरित झाला,” असं कॉन्स्टंटाईन सांगतात. ते पुढे म्हणतात, “पारंपरिक लाकडी कॅटमरॅन्सऐवजी आलेल्या यांत्रिक बोटींना समुद्राच्या आणखी खोल भागात ढकललं गेलं आणि या बोटींना सांभाळण्यासाठी लागणाऱ्या खर्चात प्रचंड वाढ झाली.”
जीवन पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न
एका लाटेने नुकसान केले तरी दुसऱ्या लाटेने मात्र हात देऊ केला. दुसरी लाट जगभरातून आलेल्या मदतीची होती. सरकारे, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांनी बाधित भागांमध्ये संसाधनं ओतली. तरीही, अनेक वेळा ही मदत गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरली. “ते दुसऱ्या त्सुनामीसारखंच होतं. मदत सतत येत राहिली पण गरजा पुरविण्यापेक्षा त्यात गुंतागुंतच अधिक होती,” असं कॉन्स्टंटाईन म्हणतात. कॉन्स्टंटाईन यांनी आपल्या ‘थुरैयाडल’ (Dialogue with the Sea Coast) या पुस्तकात किनारपट्टीतील बदल आणि मच्छीमार समुदायाच्या जीवनाचा २० वर्षांचा दस्तऐवज मांडला आहे. मदत संस्थांनी अन्न, कपडे आणि औषधं पुरवण्यावर भर दिला. पण, मच्छीमार समुदायाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष केलं. बचावलेल्यांना दूरच्या भागांमध्ये हलवण्यात आलं आणि किनारपट्टी क्षेत्र नियमन (Coastal Zone Regulation) व मत्स्य कायद्यातील बदलांमुळे अनेकांनी आपले किनारपट्टीवरील पारंपरिक हक्क आणि उपजीविका गमावली. “जीवन पुन्हा उभं करण्यापेक्षा आम्हाला आमचे हक्क जपण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागला” असं थूथुकुडी येथील थेरस्पुरममधील मच्छीमार रॉबर्ट सांगतात.
मानसिक आघात
त्सुनामीने मानसिक जखमा खोलवर केल्या होत्या. २०१३ साली ‘डिझास्टर हेल्थ’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या कर, कृष्णराज आणि रमेशराज यांच्या ‘लाँग-टर्म मेंटल हेल्थ आऊटकम्स फॉलोइंग द २००४ एशियन त्सुनामी डिझास्टर’ या शोधनिबंधात म्हटले आहे की, आपत्ती झाल्यानंतर सहा ते नऊ महिन्यांनी तामिळनाडूमधील २७.२ टक्के प्रौढांमध्ये मानसिक आजार दिसून आले, तर ७९.७ टक्के लोकांमध्ये मानसिक आजारांच्या लक्षणांची नोंद करण्यात आली. यामध्ये नैराश्य सर्वाधिक होतं. लिंगानुसार वेगवेगळे नमुने दिसून आले. पुरुषांमध्ये मद्यपानात वाढ झाली, तर महिलांमध्ये चिंता अधिक जाणवली. कन्याकुमारीमध्ये ४३ टक्के पुरुषांनी मानसिक ताण अनुभवला, तर अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये ५-८ टक्के लोकसंख्येमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या दिसल्या. हा आघात भारतापुरता मर्यादित नव्हता. थायलंडमधील खाओ लक येथे स्विस पर्यटक आणि बचावलेल्यांमध्ये घटनेच्या अनेक वर्षांनंतर पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरचा (PTSD) दर ३६.५ टक्के इतका उच्च नोंदवला गेला.
पर्यावरणावर परिणाम
त्सुनामीने पर्यावरणावर प्रचंड परिणाम केला. इंडोनेशियामध्ये ९० टक्के कांदळवनं (मॅन्ग्रोव्हच्या) जंगलांचं नुकसान झालं. त्यामुळे किनारी भागातील संरक्षणाला तडा गेला. इंडोनेशिया, थायलंड आणि श्रीलंकेतील प्रवाळभित्तींवर गाळ आणि ढिगाऱ्याचा प्रचंड भार पडला. गोड्या पाण्याचे स्रोतही दूषित झाले. २०१५ साली हरी श्रीनिवास यांच्या ‘द इंडियन ओशन त्सुनामी अँड इट्स एन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट्स’ या शोधनिबंधात म्हटले आहे की, श्रीलंकेत ६२,००० विहिरी समुद्राच्या पाण्याच्या अतिक्रमणामुळे वापरायोग्य राहिल्या नाहीत. अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाच्या हालचालींमुळे किनारी भाग उंचावले गेले आणि काही भाग खाली बसले. इंडोनेशियाच्या आचे प्रांतातील कृषी जमिनींना क्षारता (salinity) वाढल्यामुळे मोठं नुकसान झालं. बाधित शेतजमिनींपैकी २० टक्के जमिनी कायमस्वरूपी शेतीसाठी अयोग्य ठरल्या.
२० वर्षांनंतर काय बदलले आहे?
या विध्वंसक आपत्तीला पूर्वीचा इतिहास आहे. हिंदी महासागराने याआधीही त्सुनामीचा अनुभव घेतला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच नाही. २००४ च्या आपत्तीपूर्वी कोणतीही यंत्रबद्ध नोंदणी किंवा आपत्तीसाठी तयारीच्या योजना नसल्याने किनारपट्टीवरील समुदाय या संकटापुढे असुरक्षित राहिले. हा विध्वंस अतिशय भीषण होता त्यामुळे आपत्ती तयारीबाबत तातडीने पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राचे (INCOIS) गट संचालक व वैज्ञानिक डॉ. टीएम बालकृष्णन नायर सांगतात की, या घटनेमुळे भारत आणि भारतीय महासागर क्षेत्रात त्सुनामीसाठी तयारी करण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला.
त्सुनामी अर्ली वॉर्निंग सिस्टम
“भारत सरकारने निर्णायक पावलं उचलली आणि त्सुनामी अर्ली वॉर्निंग सिस्टम विकसित करण्याची जबाबदारी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाला (MoES) सोपवली,” डॉ. नायर सांगतात. “INCOIS ने या प्रणालीच्या स्थापनेत नेतृत्व केलं. INCOIS ही अंदमान-निकोबार-सुमात्रा आर्क आणि मक्रान सबडक्शन झोनसारख्या भागांमध्ये भूकंपामुळे उद्भवणाऱ्या त्सुनामीचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आली.” UNESCO च्या इंडियन ओशन त्सुनामी माहिती केंद्राचे प्रमुख अर्डिटो कोडिजात यांनी २००४ नंतर जागतिक त्सुनामी तयारीत झालेला प्रचंड बदल पाहिला आहे. त्या वेळी फक्त हवाई येथील पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सिस्टम ही एकच इशारा प्रणाली होती. “२००४ साली जेव्हा हिंदी महासागरात त्सुनामी आली, तेव्हा पॅसिफिक प्रणालीने तिला शोधलं आणि इशारा देण्याचा प्रयत्न केला. पण त्सुनामी हिंदी महासागरात असल्याने तो इशारा प्रभावीपणे पोहोचवता आला नाही,” कोडिजात सांगतात. २००५ पर्यंत, UNESCO च्या इंटरगव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशनला जागतिक त्सुनामी कमी करण्याच्या धोरणाचे समन्वय साधण्याचं काम सोपवण्यात आलं.
इंडियन ओशन त्सुनामी वॉर्निंग अँड मिटिगेशन सिस्टम
यामध्ये इंडियन ओशन त्सुनामी वॉर्निंग अँड मिटिगेशन सिस्टमने (IOTWMS) महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही प्रणाली धोका असलेल्या देशांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सतर्कतेचे इशारे देण्यासाठी तयार केलेल्या संस्थांच्या जाळ्याने सुसज्ज आहे. सध्या भारत, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया हे २६ देशांतील त्सुनामी इशाऱ्यांसाठी मुख्य केंद्र म्हणून काम करतात. “आता आपण एका इशारा प्रणालीवरून चार प्रादेशिक प्रणालींपर्यंत पोहोचलो आहोत. १४ त्सुनामी सेवा पुरवठादारांच्या मदतीने, या प्रणाली फक्त सहा ते दहा मिनिटांत इशारे जारी करू शकतात,” असे कोडिजात यांनी सांगितले.
१० मिनिटांत भूकंपाचा शोध
भारतीय त्सुनामी अर्ली वॉर्निंग सिस्टम (ITEWS) २००७ साली सुरू करण्यात आली. यामध्ये भूकंपीय स्थानके, ज्वारीय मापक (Tidal Gauge) आणि त्सुनामी बुईज यांचे जाळे आहे. हे जाळे भारतीय महासागरातील त्सुनामीसाठी आवश्यक चिन्हांची तपासणी करते. डॉ. नायर म्हणतात, “आमची प्रणाली भूकंपाचा शोध १० मिनिटांत घेऊ शकते आणि SMS, ईमेल, फॅक्स तसेच वेबसाइटद्वारे अधिकाऱ्यांना त्सुनामीचा इशारे देऊ शकते.” “आपत्ती थांबवता येत नाहीत, पण वेळेवर इशारे आणि जनजागृतीने त्यांचा परिणाम कमी करता येतो,” असेही डॉ. नायर म्हणाले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून INCOIS ने स्थानिक सरकारे आणि समुदायांबरोबर काम करून गावांना ‘त्सुनामी रेडी’ होण्याकरिता मदत केली आहे.”२०२० साली ओडिशातील वेंकट्रैपूर आणि नोलियासाही ही गावं भारतीय महासागर क्षेत्रातील UNESCO-IOC कडून ‘त्सुनामी रेडी’ (त्सुनामीसाठी सज्ज) म्हणून मान्यता मिळवणारी पहिली गावं ठरली आहेत.” असे डॉ. नायर यांनी सांगितले.
२४ गावे त्सुनामी रेडी
हा उपक्रम आता विस्तारला असून अलीकडेच ओडिशातील २४ नवीन किनारपट्टीवरील गावांनी ‘त्सुनामी रेडी’ मानांकन मिळवले आहे. “एकदा समुदाय त्सुनामीसाठी तयार झाला की, तो कोणत्याही किनारपट्टीच्या आपत्तीला अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. आता आम्ही हा कार्यक्रम भारतातील सर्व किनारपट्टीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवण्याचे काम करत आहोत,” असेही डॉ. नायर म्हणाले. त्सुनामीचा शोध घेणे आणि प्रतिसाद देण्यामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. ITEWS भू-स्थानिक आणि आयटी साधनांचा वापर करते. त्यातत भूकंपीय स्थानके, ज्वारीय मापक आणि त्सुनामी बुईज यांचा समावेश आहे. “आमची प्रणाली संख्यात्मक मॉडेलिंगद्वारे त्सुनामीच्या परिस्थितीचे अनुकरण करते आणि प्रवासाचा वेळ व लाटांची उंची याचा अंदाज देते,” असे डॉ. नायर म्हणाले.
अधिक वाचा: Nazca Lines AI discovery: अत्याधुनिक AIने उलगडली प्राचीन कातळशिल्पं!
भविष्यासाठी दृष्टिकोन
२००४ च्या त्सुनामीला २० वर्षे पूर्ण होत असताना डॉ. नायर म्हणतात, “त्सुनामीने आम्हाला किनारी समुदायांच्या संवेदनशीलते बद्दल आणि कोणत्या प्रकारची तयारी हवी यासाठी कठोर धडे दिले आहेत. तेव्हापासून आपण महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे, परंतु अजून खूप काही करायचे आहे.”
त्सुनामीने आयुष्यच बदलले
कॉन्स्टंटाईन यांच्या कुटुंबासारखाच अनेक कुटुंबांनी विनाश आणि जीवितहानीचा अनुभव घेतला त्यांच्यासाठी पुनर्बांधणीचा प्रवास अद्याप सुरूच आहे. “त्सुनामीने सर्वकाही बदलून टाकले,” असं ते म्हणतात. “पण आम्ही फक्त आमची घरं नव्हे, तर आमचे समुदाय, आमची उपजीविका आणि आमचे भविष्य पुन्हा उभे करण्याचे धडे घेत आहोत.”