Where is the 2,100-Year-Old Temple Found in Egypt?: पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, त्यांनी आधुनिक सोहागजवळील प्राचीन इजिप्शियन शहर अत्रिबिसमध्ये २,१०० वर्षे जुन्या मंदिराचं प्रवेशद्वार शोधलं आहे, जे जमिनीत गाडलं गेलं होतं. “या मंदिराचे प्रवेशद्वार दगडाचे असून हे मंदिर अद्याप स्पर्श न केलेल्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे,” असे तुबिंगेन विद्यापीठाचे प्राध्यापक ख्रिश्चन लाइट्झ आणि डॉ. मार्कस मुलर यांनी स्पष्ट केले. ते २०२२ पासून इजिप्शियन पुरातत्त्व प्राधिकरणाचे मोहम्मद अब्देलबादिया यांच्यासमवेत या स्थळावर काम करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अत्रिबिस या प्राचीन शहराचे महत्त्व The importance of the ancient city of Athribis
अत्रिबिस (Athribis) हे प्राचीन इजिप्शियन शहर असून, ते नाइल नदीच्या त्रिभूज प्रदेशाच्या पश्चिमेस होते. हे शहर प्राचीन इजिप्तमधील धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते. अत्रिबिस हे सूर्यदेव अट्रिबिस देवता आणि अन्य देवतांच्या पूजेसाठी प्रसिद्ध होते. आधुनिक काळात, हे स्थळ इजिप्तमधील सोहाग जवळ आहे आणि येथे अनेक पुरातत्त्वीय उत्खनने झाली आहेत, ज्यामुळे प्राचीन काळातील मंदिरांचे अवशेष, शिलालेख आणि नाणी आढळली आहेत. विशेषतः हे स्थळ टॉलेमिक काळातील आणि रोमन साम्राज्याच्या काळातील इजिप्तवर असलेल्या प्रभावांचे महत्त्वाचे पुरावे देते. अत्रिबिस हे पुरातत्त्व शास्त्रज्ञांसाठी महत्त्वाचे संशोधन स्थळ आहे. इथे सापडलेली वास्तुशिल्पे आणि अवशेष प्राचीन इजिप्शियन समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक आयुष्याची झलक दाखवतात.
अधिक वाचा: Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?
नव्याने सापडलेल्या मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत? Features of the Egyptian temple
संशोधन पथकाने इ.स.पू. १४४ ते इ.स. १३८ या कालखंडादरम्यान बांधलेल्या प्राचीन मंदिर संकुलाचा शोध लावला आहे. मूलतः ५१ मीटर रुंद आणि १८ मीटर उंच बुरुज असलेल्या या रचनेचा मोठा भाग उत्खननासाठी झालेल्या खणकामामुळे नष्ट झाला आहे, आणि आता फक्त ५ मीटर उंच भाग उभा आहे. या स्थळावर सापडलेल्या एका नाण्याने सूचित केले की, हे मंदिर इ.स. ७५२ च्या सुमारास नामशेष झाले असावे. साय न्यूजच्या माहितीनुसार, संशोधनात एक राजा, सिंह-मुखी देवी रेपीट आणि तिचा मुलगा कोलांथे यांना बळी अर्पण करत असल्याचे कोरीव शिल्प सापडले आहे. चित्रलिपीतील लेखांवरून असे समजते की, इ.स.पू. २ ऱ्या शतकातील शासक टॉलेमी आठवा याने मंदिराच्या भव्य प्रवेशद्वाराच्या (पायलॉन) बांधकामाचे आणि सजावटीचे काम पाहिले.
रोचक शोध
संशोधन पथकाने पायलॉनच्या उत्तर बुरुजामध्ये एक महत्त्वाचा शोध लावला. त्यांना तिथे एक खोली सापडली. २० टन वजनाचा छताचा दगड काळजीपूर्वक काढल्यानंतर सुमारे ६ मीटर लांब आणि ३ मीटर रुंद खोली उघडली. प्रारंभी ही खोली मंदिरातील उपकरणांसाठी वापरली जात होती, तर नंतर ती वाईन साठविण्यासाठी (अॅम्फोरा -प्राचीन मातीचे भांडे) वापरण्यात आली. पायलॉनमध्ये आणखी एक लपलेला दुसरा दरवाजा आढळला, जो एका जिन्याकडे जातो. हा जिना चार मजले उंचीपर्यंत जात होता, पण आता तो नष्ट झाला आहे. या अद्वितीय स्थापत्य वैशिष्ट्यामुळे वरच्या मजल्यावर साठवणूक कक्ष असल्याचे सूचित होते. प्राध्यापक लाइट्झ यांनी नमूद केले की, अत्यंत गुळगुळीत चुनखडीचे दगड आणि कोब्रा आकाराचे सजावटीचे बांधकाम यामुळे असे सुचित होते की, ढिगाऱ्यामागे आणखी एखादे खडकात कोरलेले मंदिर सापडण्याची शक्यता आहे.
शोधाचे श्रेय
प्रवेशद्वार आणि खोली टुबिंगेन विद्यापीठातील संशोधकांनी इजिप्शियन पर्यटन आणि पुरातन वस्तू मंत्रालयाच्या सहकार्याने शोधून काढले आहे. अशरक अल-अवसतच्या वृत्तांतानुसार सुप्रीम कौन्सिल ऑफ अँटीक्विटीजचे महासचिव डॉ. मोहम्मद इस्माईल खालेद यांनी या शोधाला “या स्थळावरील नव्या मंदिराच्या उर्वरित घटकांचे अनावरण करण्याचे पहिले पाऊल” असे म्हटले आहे. इजिप्शियन पर्यटन आणि पुरातन वस्तू मंत्रालयाने फेसबुक पोस्टद्वारे म्हटले की, “हा शोध विशेष महत्त्वाचा आहे, कारण तो मंदिराच्या उर्वरित घटकांना उघड करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे.” सुमारे २० फूट (६ मीटर) लांब आणि ९ फूट (३ मीटर) रुंद असलेल्या या खोलीच्या प्रवेशद्वारावर नव्याने सापडलेली नक्षीकामे आणि चित्रलिपीतील लेख आहेत. या लेखांमध्ये प्रजनन देवता मिन, त्यांची पत्नी रेपीट (जी सिंहिण म्हणून प्रकट केली जाते), आणि त्यांचा पुत्र कोलांथे या बाल-देवतेचे चित्रण आहे. एका लेखामध्ये, या इजिप्शियन देवतांना राजा बलिदान देतो आहे, असे दाखवले आहे, आणि संशोधकांच्या मते तो राजा इ.स.पू. दुसऱ्या शतकातील टॉलेमी आठवा आहे. यामुळे संशोधकांचा असा अंदाज आहे की, अत्रिबिस मंदिर टॉलेमी आठव्या (ज्यांचा मृत्यू इ.स.पू. ११६ मध्ये झाला) याच्या कारकिर्दीत बांधले गेले, जे या कुटुंबासाठी उपासनेचे केंद्र होते.