अनेकदा प्राचीन स्थापत्यशास्त्र आपल्याला अवाक करते. भारतासारख्या देशाला गेल्या हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि त्यामुळेच या  भूमीत प्राचीन स्थापत्यशास्त्राचे असंख्य नमुने आहेत. असे असले तरी अनेकदा भारताला समृद्ध इतिहास होता का, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. याच प्रश्नाचे उत्तर देणारी एक रचना आजही आपण तामिळनाडूत पाहू शकतो. अनेक शतके उलटून गेल्यावरही या रचनेची  मजबुती आणि कार्यक्षमता पाहून आजही थक्क व्हायला होते. हा वास्तुशास्त्रीय चमत्कार म्हणजे आधुनिक भारतातील ‘कल्लानाई धरण’. हे धरण केवळ त्याच्या प्राचीन स्थापत्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर आजही इतक्या हजारो वर्षांनंतर ते स्थानिकांना सेवा पुरवत असल्याने त्याच्या कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध आहे.  

अधिक वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक उल्लेख केलेल्या ऐतिहासिक चोल साम्राज्याचा इतिहास काय?

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Shiv Pratap Din celebrated at Pratapgad Flowers showered from helicopter on Chhatrapati equestrian statue satara news
अलोट उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा; छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव

जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात जुने कार्यशील धरण

कल्लानाई धरण हे तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात असून इसवी सन १५० मध्ये बांधलेली ही एक अद्भुतपूर्व रचना आहे आणि ही रचना गेल्या हजारो वर्षांपासून काळाच्या कसोटीवर टिकून आहे. कावेरी नदीवर बांधलेले कल्लानाई धरण हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात जुने कार्यशील धरण आहे. हे धरण बांधण्याचे श्रेय चोल राजवंशातील राजा करिकाल चोल याला दिले जाते. तामिळनाडूच्या इतिहासात ज्या राजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या राजांमध्ये करिकाल चोलचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागतो. त्याला प्राचीन तामिळनाडूवर राज्य करणाऱ्या महान सम्राटांपैकी एक मानले जाते.

धरणाची निर्मिती का करण्यात आली?

दुसऱ्या शतकाच्या आसपास दूरदर्शी चोल राजा करिकाल याने कल्लानाई धरणाची निर्मिती कावेरी नदीच्या मुबलक पाण्याचा कृषी समृद्धीसाठी उपयोग करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्देशाने करण्याचा निर्णय घेतला. कल्लानाई या नावाची व्युत्पत्ती आलम आणि अनाई या दोन तमिळ शब्दांपासून झाली आहे, ज्याचा अनुवाद अनुक्रमे “दगड” आणि “धरण” असा होतो. मोर्टारसारख्या आधुनिक बांधकाम साहित्याच्या साहाय्याशिवाय तयार केलेली ही वास्तूरचना चोलांच्या अत्याधुनिक अभियांत्रिकी क्षमतांचा पुरावा म्हणून उभी आहे. जीवन देणारे कावेरीचे पाणी सुपीक गाळाच्या प्रदेशात वळवणे हा या धरणाचा प्राथमिक उद्देश होता, ज्यामुळे कोरडवाहू जमिनीचे हिरवळीच्या शेतात रूपांतर करणारे विस्तृत सिंचन नेटवर्क सुलभ झाले. चोलांचे सूक्ष्म नियोजन आणि धरणाच्या अंमलबजावणीने कृषी उत्पन्न वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्यामुळे या प्रदेशाच्या आर्थिक समृद्धीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.

अधिक वाचा: विश्लेषण: Cultural Genocide – एखाद्या संस्कृतीच्या इतिहासातील पाऊलखुणा पुसून टाकणं शक्य असतं का? 

कावेरी नदीला वारंवार पूर येत असल्याने  स्थानिक गावांना धोका निर्माण होत असे. ही समस्या ज्या वेळेस करिकाल चोलाला समजली त्यावेळी त्याने एक मोठे धरण बांधण्याचा निर्णय घेतला. प्रतिसेकंद दोन लाख घनफूट पाणी वाहणाऱ्या कावेरीवर हे धरण चक्क २१०० वर्षांपूर्वी बांधण्यात आले. हा प्राचीन तमिळ लोकांच्या तांत्रिक ज्ञानाचा नमुनाच आहे. धोरण बांधण्याकरता मोठमोठ्या खडकांचा वापर करण्यात आला. नदीच्या तळाशी मोठे खडक बसवण्यात आले. नदीच्या पाण्याच्या धुपीकरणामुळे हे खडक तळाशी असलेल्या मातीत घट्ट रुतले. धरणाचा पाया हा खडकांचे थरावर थर उभारून बांधण्यात आला. दगड एकमेकांना चिटकून रहावे म्हणून चिकणमातीचे मिश्रण वापरण्यात आले होते.  

कल्लानाई धरण हा तमिळ वास्तुकलेचा चमत्कारच!

कल्लानाई धरणाचे भौतिक परिमाण विस्मयकारक आहेत, धरणाचा विस्तार अंदाजे ३२९ मीटर (१,०८० फूट) लांबी आणि २० मीटर (६६ फूट) रुंदीचे आहे. धरणामध्ये कुडामुरुती, पेरियार आणि विरनाम असे तीन वेगळे विभाग आहेत. हे विभाग प्रत्येक पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करण्यासाठी विशिष्ट कार्य करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. नदीच्या प्रवाह शक्तीला तोंड देण्यासाठी दगडी ब्लॉक्स एकमेकांना जोडण्याच्या अचूकतेवर अवलंबून असलेल्या बांधकामात मोर्टारची अनुपस्थिती लक्षणीय आहे. कल्लानाई धरण ही केवळ एक भक्कम संरचना म्हणून उभं राहिलेलं नाही तर शतकानुशतके त्याची देखभाल आणि नूतनीकरणाच्या प्रक्रियेत नंतरच्या राजवटींनी दिलेल्या योगदानाचेही ते साक्षीदार आहे. आजही, ते पिकांच्या लागवडीसाठी सातत्यपूर्ण पाणीपुरवठा सुनिश्चित करून, प्रदेशाच्या कृषी लँडस्केपचा एक महत्त्वाचा घटक आहे.

ब्रिटिशांचे योगदान

१९व्या शतकात ब्रिटिशांनी या धरणाचे नूतनीकरण केले. १८०४ मध्ये, ब्रिटीशांनी कॅप्टन कॅल्डवेल या लष्करी अभियंत्याला कावेरी नदीची तपासणी आणि डेल्टा क्षेत्रातील सिंचन सुधारण्यासाठी नियुक्त केले होते. सिंचनासाठी अपुरे पाणी शिल्लक राहिल्याने बरेचसे पाणी कोल्लीडॅमकडे वळवण्यात आल्याचे त्यांनी शोधून काढले. याचे निराकरण करण्यासाठी, कॅल्डवेलने धरण उंच करण्याचे सुचवले आणि त्यांनी धरणाचे दगड ६९ सेंटीमीटर (२७ इंच) वाढवले, ज्यामुळे धरणाची क्षमता वाढली. १८२४ साली सर आर्थर कॉटन यांनी कावेरीची प्रमुख उपनदी कोलेरून ओलांडून बांधलेला लोअर ॲनाइकट ही कल्लानाई धरणाची प्रतिकृती बनलेली रचना असल्याचे म्हटले जाते.

अधिक वाचा: विश्लेषण : भारतात आयात होत होता… अमेरिकन बर्फ! का, कशासाठी?

चोल राजवंशाची दूरदृष्टी दर्शवणारा जिवंत पुरावा

या धरणाच्या उपयुक्ततावादी महत्त्वाच्या पलीकडे, कल्लानाई धरणाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. ही केवळ कार्यशील जल व्यवस्थापन प्रणाली नाही तर चोल राजवंशाची दूरदृष्टी दर्शवणारा जिवंत पुरावाच आहे. ऐतिहासिक आणि स्थापत्य शास्त्रीय महत्त्वामुळे या स्थळाला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. कल्लनाई धरण हे करिकालाच्या काळात बांधण्यात आले तरी त्यानंतरच्या शासकांनी, शतकानुशतके, या धरणाची देखभाल केली, त्यात भर घातली. असे असले तरी निःसंशयपणे हे जगातील सर्वात जुने धरण आहे. आणि आजूबाजूच्या जमिनीच्या सुपीकतेवर त्याचा प्रभाव इतका मोठा होता की, करिकालाचे नाव या प्रदेशाच्या इतिहासात कोरले गेले होते, ते कधीही विसरता येणार नाही.

आज, कल्लानाई धरण हे प्राचीन अभियांत्रिकी तेजाचे स्मारक म्हणून उंच उभे आहे, जे समाजाच्या सामूहिक फायद्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्याच्या चोल राजवंशाच्या दृष्टीचे प्रकटीकरण आहे. एकूणच हा केवळ एक ऐतिहासिक स्थापत्याचा नमुना नाही तर  तर भूतकाळाला वर्तमानाशी जोडणारा जिवंत पूलही आहे. हे धरण खरोखरच जगातील प्राचीन चमत्कारांपैकी एक आहे.

Story img Loader