लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याचे शुक्रवारी लाहोरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे ‘पीटीआय’च्या वृत्तात म्हटले आहे. एलईटीचा संस्थापक हाफिज सईदचा मेहुणा मक्की हा २००८ मध्ये मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक होता, ज्यात १७५ लोक मारले गेले आणि ३०० हून अधिक जण जखमी झाले. २०२३ मध्ये युनायटेड नेशन्सने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते आणि प्रवासबंदी व शस्त्रास्त्र प्रतिबंध लादण्यात आले होते. कोण होता अब्दुल रहमान मक्की? जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हाफिज सईदचा मेहुणा

मक्की हा हाफिज सईदची सावली मानला जायचा. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर यूएन सुरक्षा परिषदेने त्याला दहशतवादी घोषित केले होते. तो यूएनच्या सतत नजरकैदेत होता. पश्तून टोपी ही त्याची ओळख होती. तो कायम ही टोपी परिधान करायचा. २०१९ मध्ये त्याला ३६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्वलंत वक्ता असलेला मक्की हा इस्लामाबादमधील फेब्रुवारीच्या काश्मीर एकता दिनाच्या रॅलीमध्येही उपस्थित असायचा. मुंबई हल्ल्याच्या दोन वर्षांनंतर फेब्रुवारी २०१० मध्ये अशाच एका रॅलीत, मक्कीने काश्मीर पाकिस्तानला न दिल्याबद्दल भारतात रक्ताच्या नद्या वाहतील आणि बळजबरीने ते ताब्यात घेण्याची धमकी दिली होती. त्या वर्षाच्या उत्तरार्धात त्यानी असेच भाषण केले होते. हाफिज सईदप्रमाणे तोदेखील हाफिज ही पदवी वापरायचा.

हेही वाचा : लाखो पुस्तक विक्रेते अडचणीत; पोस्ट खात्याकडून ‘बुक पॅकेट’ सेवा बंद, कारण काय? याचा काय परिणाम होणार?

भारताला धमक्या

भारतातील हिंसाचाराची धमकी देणाऱ्या त्याच्या भाषणांमुळे त्याचे नाव नोव्हेंबर २०१० मध्ये दहशतवाद्यांच्या यूएस ट्रेझरी विभागाच्या यादीत सामील करण्यात आले. यूएस ट्रेझरी विभागाने सांगितले होते की, मक्कीने एलईटीसाठी निधी उभारण्यास मदत केली. त्यात एलईटी प्रशिक्षण शिबिरासाठी अंदाजे २,४८,००० डॉलर्स आणि एलईटी-संलग्न मदरसाला अंदाजे १,६५,००० डॉलर्स उभारण्यात मदत केली होती.” त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना बक्षीस स्वरूपात दोन दशलक्ष डॉलर्स देण्याचीदेखील घोषणा करण्यात आली होती. असे असले तरी तो कधीही लपला नाही. तो लाहोर आणि इस्लामाबादमधील कोर्टरूममध्ये सईदचे वकील, जेयूडीचे कार्यकर्ते आणि सुनावणीच्या दिवशी इतर प्रशंसकांसह गेला आणि कामकाजात बसला होता. त्याने आणि सईदने २०१४ मध्ये लाहोर उच्च न्यायालयात संयुक्तपणे याचिका केली होती; ज्यात सईदबद्दल माहिती देण्यासाठी अमेरिकेने घोषित केलेल्या १० दशलक्ष डॉलर्सच्या बक्षिसाला आव्हान दिले होते. त्या वेळी सईद पूर्णवेळ राजकारणी होण्याची तयारी करत होता.

मक्की हा हाफिज सईदची सावली मानला जायचा. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर यूएन सुरक्षा परिषदेने त्याला दहशतवादी घोषित केले होते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

नोव्हेंबर २०२१ मध्ये लाहोर उच्च न्यायालयाने अल अनफाल नावाच्या चॅरिटी या एलईटी फ्रंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून दहशतवादी निधी पुरवल्याच्या आरोपातून निर्दोष सुटलेल्या सहा जणांपैकी मक्की याचा समावेश होता. पाकिस्तानमधील पंजाब पोलिसांच्या काउंटर टेररिझम विभागाने मक्की आणि सईदसह जेयूडीच्या अनेक सदस्यांविरुद्ध ४० हून अधिक खटले दाखल केले होते आणि कनिष्ठ न्यायालयाने मक्कीला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. सईदला अनेक प्रकरणांमध्ये एकूण ३६ वर्षांची शिक्षा झाली होती. तो लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात बंद होता.

२०२३ मध्ये जागतिक दहशतवादी घोषित

दहशतवादी वित्तपुरवठा आणि मनी लाँडरिंग रोखण्यासाठी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या दबावाखाली पाकिस्तानमध्ये २०१७ मध्ये एलईटी/जेयूडी विरुद्ध कारवाई सुरू झाली. यापूर्वीही अनेकवेळा सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले होते आणि त्याच वर्षी त्याची सुटका करण्यात आली होती. पुढच्या वर्षी पाकिस्तानने स्वतःच्या १९९७ च्या दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत जेयूडीला प्रतिबंधित केले. परंतु, ‘एफएटीएफ’ने त्या वर्षी पाकिस्तानला ग्रे लिस्ट केले आणि आणखी कारवाई करण्यास सांगितले. एलईटी/जेयूडी आणि जैश-ए-मोहम्मद, तसेच त्यांच्याशी संबंधित मशिदी आणि धर्मादाय संस्थांवर कारवाई केली गेली. अनेक धर्मादाय संस्थांवर बंदी घालण्यात आली. शेकडो जणांना अटक करण्यात आली.

हेही वाचा : तिबेटमधील चीनच्या महाकाय धरणामुळे वाढली भारताची चिंता; कारण काय?

पाकिस्तानने जुलै २०१९ मध्ये सईदला पुन्हा एकदा अटक केली. ‘डॉन’च्या वृत्तानुसार, त्याच्या अटकेपूर्वी लाहोर, गुजरांवाला, मुलतान, फैसलाबाद आणि अब्दुल रहमान मक्कीसह त्याच्या आणि जमात-उद-दवाच्या इतर नेत्यांविरुद्ध २३ एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या. मक्कीला मे २०१९ मध्ये द्वेषपूर्ण भाषणासाठी अटक करण्यात आली होती. जून २०२२ मध्ये चीनने शेवटच्या क्षणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल-कायदा प्रतिबंध समिती अंतर्गत मक्कीला सूचीबद्ध करण्याचा भारत आणि अमेरिकेचा संयुक्त प्रस्ताव थांबवला. २०२२ मध्ये ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून काढून टाकले आणि मक्कीला अखेर २०२३ मध्ये जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले.