कलम ३०२ हे खुनासाठी, तर कलम ४२० हे फसवणुकीसाठी प्रसिद्ध आहे. ४२० ही संख्या फसवणुकीसंदर्भात एवढी प्रसिद्ध दगाबाज व्यक्तींना ‘४२०’ म्हटले जाते. परंतु, भारतीय न्याय संहिता विधेयक, २०२३, हे १६० वर्षांहून अधिक जुने भारतीय दंड संहिता (IPC) रद्द करेल आणि त्यात यथोचित बदल करून पुन्हा निर्माण करेल. या पुनर्रचनेमध्ये सामान्यतः प्रसिद्ध असणाऱ्या कलमांसाठी नवीन क्रमांक दिलेले असतील. त्यानुसार कलम ४२० आणि ३०२ ही अनुक्रमे फसवणुकीची आणि खुनाची कलमे असणार नाहीत. तसेच अजूनही काही कलमे बदलण्यात आली आहेत. त्यांची माहिती आणि बदलेले क्रमांक जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
भारतीय दंड संहिता ही १६० वर्षांहून जुनी आहे, त्यातील अनेक कलमे ही सामान्य लोकांनाही माहित आहेत. परंतु, भारतीय न्याय संहिता विधेयक २०२३ मुळे यामध्ये बदल करण्यात येतील. उदाहरणार्थ, खुनासाठी कलम ३०२, फसवणुकीसाठी ४२० किंवा बलात्कारासाठी ३७६ ही कलमे प्रसिद्ध आहेत. भारतीय न्याय संहिता विधेयक या अंतर्गत आता भारतीय दंड संहितेमध्ये वेगळ्या पद्धतीने क्रमांक दिले जातील. कोणत्या कलमांमध्ये बदल केले जातील, हे जाणून घेऊया…

कलम ४२०

भादंवि ४२० नुसार फसवणूक आणि अप्रामाणिक वर्तन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. जो कोणी फसवणूक करतो आणि अप्रामाणिकपणे फसवणुकीस व्यक्तीला प्रवृत्त करतो,कोणतीही मालमत्ता वितरीत करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वितरण किंवा अन्य कामांमध्ये फसवणूक केल्यास, अप्रामाणिक वर्तन केल्यास कारावासाची शिक्षा होऊ शकते. ती जास्तीत जास्त ७ वर्षांपर्यंत वाढू शकते. तसेच दंडही होऊ शकतो.
प्रस्तावित भारतीय न्याय संहिता विधेयक २०२३ नुसार कलम ४२० हा फसवणुकीचा गुन्हा नसून, तो कलम ३१६ अंतर्गत समाविष्ट आहे.
कलम ३१६ (१) नुसार, फसवणूक करणे, फसवणुकीचे वर्तन करणे, अप्रामाणिक वागणे, फसवणूक करण्यास प्रवृत्त करणे यांचा समावेश आहे. कलम ३१६ २, ३, ४ नुसार फसवणुकीची शिक्षा दंडासह तीन वर्षे, पाच वर्षे किंवा सात वर्षांपर्यंत वाढू शकते.

Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक

हेही वाचा : विश्लेषण : माहीत नसलेल्या गोष्टींसाठी X का वापरले जाते ? काय आहे ‘एक्स’ चा अर्थ ?


कलम १२४ ए

कलम १२४ ए हे देशद्रोहासाठी प्रसिद्ध आहे. कलम १२४ ए नुसार, जो कोणी शब्दांद्वारे, बोलून किंवा लिखित किंवा चिन्हे, किंवा दृश्यमान प्रतिनिधित्वाद्वारे, किंवा अन्यथा, द्वेष किंवा तिरस्कार आणण्याचा प्रयत्न करतो, किंवा उत्तेजित करतो किंवा असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास आजीवन कारावास, दंड आणि तीन वर्षे कारावास होऊ शकतो. भारतीय न्याय संहिता विधेयकानुसार कलम १२४ हे चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध करण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. प्रस्तावित संहितेत राजद्रोह हा शब्द अस्तित्वात नाही. भादंविमध्ये ‘देशद्रोह’ म्हणून वर्णन केलेल्या स्वरूपाचे गुन्हे प्रस्तावित संहितेच्या कलम १५० मध्ये भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी कृत्ये म्हणून समाविष्ट केले आहेत.

हेही वाचा : ‘युनेस्को’ने शाळांमध्ये मोबाईलवर बंदी आणली, पण घरात काय ? मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांनी विचार केला का ?
प्रस्तावित संहितेच्या कलम 150 मध्ये असे म्हटले आहे: “जो कोणी, हेतुपुरस्सर किंवा जाणूनबुजून, शब्दांद्वारे, एकतर बोलून किंवा लिखित, किंवा चिन्हे, किंवा दृश्यमान प्रतिनिधित्वाद्वारे, किंवा इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे किंवा आर्थिक अर्थाचा वापर करून, किंवा अन्यथा, उत्तेजित करतो किंवा प्रयत्न करतो. उत्तेजित करणे, अलिप्तता किंवा सशस्त्र बंडखोरी किंवा विध्वंसक क्रियाकलाप, किंवा फुटीरतावादी क्रियाकलापांच्या भावनांना उत्तेजन देणे किंवा भारताचे सार्वभौमत्व किंवा एकता आणि अखंडता धोक्यात आणणे; किंवा असे कोणतेही कृत्य केले किंवा करण्यास प्रवृत्त केले तर त्याला जन्मठेपेची किंवा सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो दंडालाही पात्र असेल.

हेही वाचा : स्वातंत्र्य दिन २०२३ : तुम्हाला खरेच शिक्षणाचे स्वातंत्र्य आहे का ? स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षण पद्धती


कलम ३०२

भादंवि कलम ३०२ हे हत्या, खुनासाठी वापरले जाते. जो कोणी खून करेल त्याला मृत्युदंड किंवा आजीवन कारावासाची शिक्षा दिली जाईल, आणि दंड देखील भरावा लागेल. भारतीय न्याय संहिता विधेयकानुसार संहितेमधील कलम 302 मध्ये ‘स्नॅचिंग’ या गुन्ह्याचे वर्णन केले आहे. कलम ३०२(१) नुसार, चोरी करणे म्हणजे चोरी करण्‍यासाठी, गुन्हेगाराने अचानक किंवा त्वरीत किंवा बळजबरीने कोणत्याही व्यक्तीकडून किंवा त्याच्या ताब्यातून कोणतीही जंगम मालमत्ता जप्त केली किंवा सुरक्षित केली किंवा किंवा हिसकावून घेणे.
प्रस्तावित संहितेमध्ये, कलम ९९ अंतर्गत खुनाचा अंतर्भाव केला आहे. कलम १०१ मध्ये हत्येसाठी शिक्षेची तरतूद आहे. कलम १०१ (१) नुसार, जो कोणी खून करेल त्याला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल आणि तो दंडालाही पात्र असेल. प्रस्तावित कलम १०१(२) नुसार, “जेव्हा पाच किंवा अधिक व्यक्तींचा समूह वंश, जात किंवा समुदाय, लिंग, जन्मस्थान, भाषा, वैयक्तिक श्रद्धा किंवा इतर कोणत्याही कारणास्तव खून करतो, अशा गटाच्या सदस्यास मृत्युदंड किंवा आजीवन कारावास किंवा सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होईल आणि तो दंडासही पात्र असेल.

कलम ३०७


भारतीय दंड विधानानुसार कलम ३०७, हत्येच्या प्रयत्नासाठी ओळखले जाते. जो कोणी व्यक्ती हेतूने किंवा ज्ञात-अज्ञातपणे कोणतेही कृत्य करतो, त्यात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला, तर तो दोषी ठरवण्यात येतो. या दोषी व्यक्तीस दहा वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. खुनाचा प्रयत्न केल्यास दंड आणि कारावास होऊ शकतो. भारतीय न्याय संहिता विधेयकामध्ये कलम ३०७ हे दरोड्याच्या गुन्ह्यासाठी ओळखले जाते. हत्येचा प्रयत्न प्रस्तावित संहिता कलम १०७ अंतर्गत समाविष्ट आहे.

कलम ३७५ आणि ३७६

कलम ३७५ आणि ३७६ बलात्काराच्या गुन्ह्याशी संदर्भित आहे. कलम ३७५ मध्ये बलात्काराची व्याख्या केलेली आहे. बलात्कार म्हणजे वैवाहिक बलात्काराचा अपवाद आहे. एखाद्या नवऱ्याने आपल्या १८ वर्षावरील पत्नीशी ठेवलेले लैंगिक संबंध हा बलात्कार होऊ शकत नाही. कलम ३७६ नुसार बलात्काराची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे. सात वर्षे जन्मठेप या शिक्षेअंतर्गत होऊ शकते. घटनेच्या तीव्रतेवर वेगवेगळ्या शिक्षा आहेत. भादंवि कलम ३७५ आणि ३७६ अध्याय XVI अंतर्गत लैंगिक गुन्हे या उपशीर्षकाखाली मानवी शरीरावर परिणाम करणारे अपराध नोंदवलेले आहेत.
भारतीय न्याय संहिता विधेयकानुसार संहितेत कलम ३७६ नाही.प्रस्तावित संहिता कलम ६३ अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्याची व्याख्या करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानानुसार बलात्काराचा गुन्हा ठरणाऱ्या सक्तीच्या लैंगिक संबंधांच्या सात अटी प्रस्तावित संहितेत कायम ठेवण्यात आल्या आहेत.वैवाहिक बलात्काराचा अपवाददेखील कायम ठेवण्यात आला आहे. पतीने अठरा वर्षावरील आपल्या पत्नीसह ठेवलेले लैंगिक संबंध हा गुन्हा होत नाही.


वरील कलमांप्रमाणे, कलम १२० गुन्हेगारी कट रचण्यासंदर्भात आहे. भारतीय न्याय संहितेमध्ये कलम १२० हे सहेतूक दुखापत किंवा दुखापत करण्यास चिथवणे, चिथावणीवरून गंभीर दुखापत करणे या संदर्भात आहे. कलम ६१ (१) नुसार द्वारे गुन्हेगारी कटाचा अंतर्भाव केलेला आहे. प्रस्तावित संहिता कलम ६१(२) मध्ये गुन्हेगारी कट रचण्याची शिक्षा दिली आहे.
कलम ५०५ हे शत्रुत्व निर्माण करणारी किंवा प्रोत्साहन देणारी विधाने आणि त्याकरिता शिक्षा यासाठी सर्वज्ञात आहे. प्रस्तावित न्याय संहिता विधेयकामध्ये कलम ५०५ नाही. प्रस्तावित संहितामधील कलम १९४ मध्ये धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सद्भावना राखण्यासाठी प्रतिकूल कृत्ये करणे, या गुन्ह्याचे वर्णन केले आहे.
कलम १५३ ए हे विविध गटांमधील वैर वाढवणे आणि त्यासंदर्भातील गुन्ह्यांसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय न्याय संहिता विधेयकामध्ये कलम १५३ आणि १५४ मध्ये युद्ध किंवा अवमूल्यन करून घेतलेली मालमत्ता मिळवणे, या गुन्ह्याचे वर्णन केले आहे. प्रस्तावित संहितेमध्ये शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्याचा गुन्हा कलम १९४ अंतर्गत येतो.
भारतीय दंड विधान कलम ४९९ हे बदनामी, अब्रुनुकसानीच्या नावाखालील कलम आहे. कलम ५०० यासंदर्भात शिक्षा सुनावते. भारतीय न्याय संहिता विधेयक २०२३ नुसार प्रस्तावित नवीन संहितेत कलम ४९९ नाही. मानहानीचा गुन्हा नवीन संहिता कलम ३५४ (१) अंतर्गत समाविष्ट आहे.