Interesting Facts Of First Msg: माणूस हा सामाजिक प्राणी आहे. माणसाला समाजात वावरण्यासाठी संभाषणाची गरज असते. पूर्वीच्या काळी संभाषणाची विविध रुपं, माध्यमं प्रचलित होती. अश्मयुगीन काळात जेव्हा भाषेचा उगम झाला नव्हता तेव्हा खुणेने संभाषण होत असे. कालिदासाने तर आपल्या मेघदूतामध्ये पावसाच्या ढगाला यक्षाचा दूत बनवले होते असे संदर्भ आढळतात. भाषा प्रचलित झाल्यावर हळूहळू चिठ्ठी व पत्र पाठवण्याची सुरुवात झाली. यासाठी कबुतरे, हंस, निरोप्या अशी माध्यमं नेमलेली होती. मागील कित्येक वर्षात तांत्रिक प्रगतीनुसार संभाषणाची पद्धत व माध्यमंही बरीच बदलली आहेत. अलीकडे एखाद्याला मेसेज पाठवणं हे पापणी लवण्याच्या वेगाने होणारं काम झालं आहे. पण या मेसेजची खरी सुरुवात कुठून झाली हे तुम्हाला ठाऊक आहे का? जगात पहिला मेसेज कधी, कुणी व मुख्य म्हणजे काय पाठवला होता यामागे एक रंजक कथा आहे.

जगातील सर्वात पहिला SMS..

३ डिसेंबर १९९२ ला म्हणजेच तब्बल ३० वर्षांपूर्वी जगातील पहिला मेसेज पाठवण्यात आला होता. हा संदेश व्होडाफोनच्या एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवला होता. नील पॅपवर्थ या व्यक्तीने आपल्या कंपनीच्या संचालकाला म्हणजेच रिचर्ड जार्विस यांना पहिला मेसेज केला होता. ऑर्बिटल 901 हँडसेटवर हा मेसेज पाठवण्यात आला होता. या पहिल्या टेक्स्ट मेसेजमध्ये एकूण १४ कॅरेक्टर्स होती. २०१७ मध्ये नील पापवर्थ यांनी हा किस्सा सांगताना मॅसेज ही कल्पना इतकी प्रसिद्ध होईल याची कल्पनाही नव्हती असे म्हंटले होते. पापवर्थ यांनी सांगितले की या मेसेजमध्ये मेरी ख्रिसमस असे लिहिलेले होते.

methanol liquor poison
विश्लेषण : लाओसमध्ये ‘मिथेनॉल’मिश्रित मद्याचे ७ परदेशी पर्यटक बळी… मिथेनॉल मद्यामध्ये सर्रास का मिसळले जाते? ते घातक कसे?
Russia Ukraine war
विश्लेषण : रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्र का डागले?…
Air pollution air quality delhi burning of agricultural waste Uttar Pradesh, Punjab Haryana states
विश्लेषण : दिल्लीतील भीषण प्रदूषणास बाजूच्या राज्यांतील शेती कशी कारणीभूत? कृषी कचरा जाळण्याची गरज तेथील शेतकऱ्यांना भासते?
Hitler Volkswagen Porsche
Volkswagen: अ‍ॅडॉल्फ हिटलरने स्वप्नपूर्तीसाठी ‘फोक्सवॅगन’ गाडीला आकार का दिला?
Kim Yong Bok, the secretive North Korean general leading troops in the Russia-Ukraine war
किम जोंग उनचे सैन्य रशियाच्या मदतीला; याचा काय परिणाम होणार? कोण आहेत सैन्याचे नेतृत्व करणारे जनरल किम योंग बोक?
am cynaide serial killer killed 14 friends
१४ मित्रांना विष देऊन हत्या केल्याप्रकरणी महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे ॲम सायनाइड?
Sukhbir Singh Badal resignation
विश्लेषण: अकाली दलावर संकटाचे ‘बादल’; देशातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष अडचणीत का आला?
sugarcane harvester
महाराष्ट्रात ऊसतोडणीचे वेगाने यांत्रिकीकरण… मजुरांऐवजी यंत्रांना प्राधान्य का? मजुरांचा तुटवडा का जाणवतो?
india big fat wedding economy
लग्न सोहळ्यांमुळे होणार सहा लाख कोटींची उलाढाल; भारतीय अर्थव्यवस्थेला कशी मिळणार चालना?

पेजर म्हणजे काय?

व्होडाफोनच्या माहितीनुसार, १९९२ नंतर १९९५ पर्यंत तीन वर्षाच्या काळात दरमहा सरासरी केवळ 0.4 टक्के लोक मेसेजिंगचा वापर करू लागले होते. या दरम्यान १९९३ मध्ये नोकियाने बीप सह SMS नोटिफिकेशन रिंग हे फीचर आणले होते. १९९७ – ९८ या दरम्यान मेसेजिंगमध्ये पेजरच्या रूपात एक मोठी प्रगती झाली होती. त्या काळात मोटोरोलाचे पेजर प्रसिद्ध होते. पेजरच्या फ्रिक्वेन्सीनुसार एक नंबर दिला जात होता ज्यावर अगदी मोजक्या शब्दात महत्त्वाचा मेसेज पाठवण्याची सोय होती. मात्र हे नवं तंत्रज्ञान फार वर्षभरही तग धरू शकलं नाही. ते जेवढ्या वेगात आलं तेवढ्याच वेगात लयही पावले.

मेसेज पॅकची सुरुवात…

१९९९ पर्यंत मोबाईल हा मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला व परिणामी मोबाईल मेसेज हे नवे संभाषणाचे माध्यम ठरले. सुरुवातीला मोबाईल मेसेजचे दर हे ५ रुपये प्रति मॅसेज इतके महाग होते. मात्र पुढे विविध नेटवर्क प्रदात्या कंपन्यांकडून मेसेजिंग पॅक लाँच करण्यात आले व १००- २०० मेसेजचा पॅक असे रिचार्ज सुद्धा प्रसिद्ध झाले.

हे ही वाचा<< विश्लेषण: ६ दिवसात १० लाख युजर्स, एलॉन मस्कने केलं कौतुक, गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT कसं करतं काम?

Whatsapp पेक्षा ट्विटरला पसंती

मोबाईल पाठोपाठ या काळात इंटरनेटचा वापर वाढू लागला होता. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट लिहून संभाषण सुरु झाले होते. यात २००९ मध्ये पुन्हा एक वेगळी क्रांती घडली आणि ती म्हणजे Whatsapp! व्हाट्सऍपच्या माध्यमातून मेसेजिंग हे चॅटिंग मध्ये रूपांतरित होऊ लागले होते. यात फरक असा की महाग दर असल्याने मेसेजिंग हे अगदी आवश्यक कारण असल्यासच केले जात होते मात्र इंटरनेटच्या माध्यमातून मेसेजचे प्रमाण वाढू लागले. तांत्रिक प्रगतीनुसार एक मॅसेज एकाहून अधिक जणांना फॉरवर्ड केला जाऊ लागला. यातूनच ऑनलाईन संभाषणासाठी ग्रुप तयार होऊ लागले.

कॉलिंगला पर्याय ठरणार SMS?

सुरुवातीला कॉल करण्यासाठी मेसेज केले जात होते तर आता 4G, 5G च्या काळात इंटरनेट स्वस्त झाल्याने SMS हे कॉलिंगला सुद्धा पर्याय ठरत आहे. यात एक विशेष बाब म्हणजे सुरुवातीला पत्रातून भले मोठे संदेश पाठवले जात होते, मध्यंतरी SMS म्हणजेच शॉर्ट मॅसेज ही पद्धत सुरु झाली. फेसबुक व ट्विटर सुद्धा शब्दमर्यादेमुळे छोटे मॅसेज लिहिले जात होते. पण आता व्हॉटसऍपमुळे पुन्हा सविस्तर व विस्तृत पत्र स्वरूपातील मॅसेज लिहिणे शक्य झाले आहे.