What is Holiday Heart Syndrome: पार्टी प्रेमींसाठीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे ३१ डिसेंबर. ही हक्काची पार्टी आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. सरत्या वर्षाला अलविदा म्हणताना काही जण बाहेरगावी जाऊन मज्जा करण्याचा पर्याय निवडतात तर काहींना मित्रांसह घरातच पार्ट्या करायला आवडतं. कधीतरी याच पार्ट्यांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक धूम्रपान, मद्यपान, जंक फूड खाणं होतं. याचा प्रभाव इतका गंभीर होऊ शकतो की, अचानक एखादा धडधाकट माणूसही छातीत दुखतंय, मळमळतंय अशा तक्रारी घेऊन जागच्या जागी बसतो. आता हा माणूस काही अगदी कमकुवत असेल असंही नाही पण जागेवरून उठतानाही चक्कर येऊ लागते. पार्टीला लागणारे हे गालबोट टाळण्यासाठी आपण याचे कारण समजून घ्यायला हवे. आणि ते कारण आहे हॉलिडे हार्ट सिंड्रोम!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणजे काय?

हॉलिडे हार्ट सिंड्रोम ही अधिक मद्यपानामुळे उद्भवलेली परिस्थिती आहे. यात रुग्णाला हृदयविकाराचा काहीही त्रास नसूनही अचानक मद्यपान केल्यावर छातीत कळ येणे, हृदयपाशी दुखणे असे त्रास जाणवू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, अल्कोहोल प्यायल्यानंतर, अट्रिया (हृदयाच्या वरच्या भागात) 200-250 बीट्स/मिनिटाच्या वेगाने धडधड जाणवू लागते आणि वेंट्रिकल्स (हृदयाच्या खालच्या बाजूस) 150+ / मिनिट. धडधड होऊ लागते. यामुळे हृदय शरीराला आवश्यक तितके पम्पिंग करू शकत नाही.

KMC हॉस्पिटलच्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मोठ्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा अनेकांचे मद्यपानाचे प्रमाण वाढते. तेव्हा अशा रुग्णांची संख्या सुमारे 3-5% वरून वाढून 8-10% पर्यंत जाऊ शकते. फिलिप एटिंगर यांनी 1975 मध्ये सांगितले की, हॉलिडे हार्ट सिंड्रोम जास्त प्रमाणात मद्यपान करणार्‍या व्यक्तींमध्ये आढळते. एकापाठोपाठ 5-6 पेग एकत्र घेणे हे याचे मुख्य कारण असते.

दारूमुळे हृदयावर नेमका काय परिणाम होतो?

  1. दारू हृदयाच्या ठोक्याचा कालावधी कमी करून हृदयाच्या स्नायूंना उत्तेजित करते.
  2. दारू कॅटेकोलामाइन्स (तणाव संप्रेरक) पातळी वाढवते ज्यामुळे हृदयाची धडधड वेगाने आणि अनियमितपणे होऊ लागते.
  3. सिम्पेथेटिक नर्वस सिस्टीमला उत्तेजित करणार्‍या रक्तातील फ्री फॅटी ऍसिडची पातळी वाढवणे, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना चालना मिळते.
  4. अधिक प्रमाणात दारूचे सेवन केल्याने हृदयाच्या गतीवर हानिकारक प्रभाव पडतो.
    .

हॉलिडे हार्ट सिंड्रोमची लक्षणे

  • हृदय धडधडणे.
  • कमी ऊर्जा व प्रचंड थकवा.
  • चक्कर येणे
  • धाप लागणे.
  • छातीत दुखणे किंवा अस्वस्थता.

हॉलिडे हार्ट सिंड्रोम जाणवल्यास काय करावे?

हॉलिडे हार्ट सिंड्रोमचे मुख्य कारण आहे जर आपल्याला अगदी सौम्य कळा जाणवत असतील तर आपण मद्यपान त्वरित थांबवावे. अनेक रुग्णाला २४ तासांच्या आत आराम मिळू शकतो. पण आपल्याला हृदयात तीव्र कळा जाणवत असतील तर वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. अशावेळी डॉक्टर आपल्याला ईसीजी काढण्यास सांगू शकतात. रक्त तपासणी आणि इकोकार्डियोग्राम काढायला सांगितले जाऊ शकते. लक्षणांची तीव्रता, वेंट्रिक्युलर रेट आणि रुग्णाची हेमोडायनामिक स्थिती यावर अवलंबून डॉक्टर निर्णय घेतील.

हे ही वाचा<< विश्लेषण: ताप आल्यावर लगेच गोळी का खाऊ नये? रक्तचाचणी कधी करावी?

हॉलिडे हार्ट सिंड्रोम कसा टाळायचा?

  • हॉलिडे हार्ट सिंड्रोम टाळण्यासाठी मद्यपानावर नियंत्रण ठेवा
  • दारू पिण्याआधी व पिताना स्वतःला हायड्रेटेड ठेवा
  • जास्त खारट पदार्थ, कॅफिन आणि साखरेचे सेवन टाळा
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 31 december alcohol party can cause holiday heart syndrome early signs of heart failure and instant first aid svs