Pew Research Center Survey: Influence of Religious Affiliation on Priorities: प्यू रिसर्च सेंटरने जगभरातील ३५ देशांमधील राष्ट्रीय नेत्यांच्या धार्मिक परंपरांबद्दल लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. या अभ्यासात नेमके काय आढळून आले, याचा घेतलेला हा आढावा.
प्यू रिसर्च सेंटरने केलेले सर्वेक्षण- संशोधन याच आठवड्यात प्रकाशित झाले. जगभरातील ३५ देशांमधील राष्ट्रीय नेत्यांच्या धार्मिक परंपरांबद्दल आणि त्याच्याशी संलग्न नागरिकांच्या मानसिकतेविषयी यात अभ्यास करण्यात आला. या संशोधनात ५३ हजारांहून अधिक प्रतिसादकर्त्यांचा समावेश होता. हा प्रतिसाद दूरध्वनीवरून होणाऱ्या मुलाखतीद्वारे नोंदवण्यात आला होता.
१. धार्मिक श्रद्धा असलेल्या लोकांसाठी उभे राहणारे नेते
८१% भारतीयांनी सांगितले की, देशातील नेत्यांनी त्यांच्याच धार्मिक श्रद्धा आणि परंपरा असलेल्या लोकांसाठी उभे राहणे फार/ काहीसे महत्त्वाचे आहे. भारताशिवाय इंडोनेशिया (९०%), बांगलादेश (८९%), फिलीपिन्स (८८%) आणि मलेशिया (८२%) यादेशांमध्येही हे सर्वेक्षण करण्यात आलेले. नेत्यांनी आपल्याच धर्माच्या लोकांच्या पाठीशी उभे रहावे असं सांगणाऱ्या देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत फ्रान्स हा शेवटच्या क्रमांकावर आहे. फक्त २५ टक्के फ्रेंच नागरिकांनी हे कारण महत्त्वाचं असल्याचं मत नोंदवलं आहे. या मताचा या प्राधान्यासाठी ३५ देशांचा मध्य ६३% होता.
२. दृढ धार्मिक श्रद्धा असलेले नेते, जरी ते तुमच्यापेक्षा वेगळ्या धर्माचे असले तरीही…
७९% भारतीयांनी सांगितले की, देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या स्वत:च्या धर्मापेक्षा भिन्न धर्म असला तरी, देशातील नागरिकांच्या धार्मिक श्रद्धा राखणे फार/ काहीसे महत्त्वाचे आहे. या बाबतीत इंडोनेशिया (८६%), फिलीपिन्स (८६%) आणि केनिया (८०%) नंतर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. केवळ ६% स्वीडिश नागरिकांनी सांगितले की, त्यांच्या देशाच्या नेत्यासाठी मजबूत धार्मिक विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. त्यामुळे हा देश या मताच्या बाबतीत शेवटच्या क्रमांकावर येतो. या प्राधान्यासाठी ३५ देशाचा मध्यक ४५% होता.
३. तुमच्या सारख्याच धार्मिक श्रद्धा असलेले नेते
८१% भारतीयांनी सांगितले की, देशाच्या नेत्यासाठी नागरिकांसारख्याच धार्मिक श्रद्धा असणे खूप/ काहीसे महत्त्वाचे आहे. याबाबतीत बांग्लादेश (९१%), इंडोनेशिया (९०%) आणि फिलीपिन्स (८६%) नंतर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. केवळ १२% स्वीडिश नागरिकांनी सांगितले की, त्यांच्या देशाच्या नेत्याची त्यांच्यासारखीच धार्मिक श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. या प्राधान्यासाठी ३५ देशांचा मध्य ४२% होता.
४. प्रतिसादकर्त्यांच्या धार्मिकतेवरील प्राधान्यांवर कसा परिणाम होतो?
सर्वसाधारणपणे, जे लोक म्हणतात की, त्यांच्या जीवनात धर्म महत्त्वाचा आहे, त्यांच्या देशाच्या नेत्याने त्यांच्या धार्मिक श्रद्धा असलेल्या लोकांसाठी उभे राहणे महत्त्वाचे आहे असे म्हणण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ, ८४% भारतीय लोकांनी धर्माला त्यांच्या जीवनात खूप महत्त्व आहे असे म्हटले आहे. याशिवाय त्यांना असाच नेता हवा आहे, जो त्यांच्या धार्मिक परंपरांचा असेल, तर ६७% भारतीयांनी सांगितले की धर्म त्यांच्यासाठी कमी महत्त्वाचा आहे. हा विरोधाभास ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत सर्वात धक्कादायक आहे. ८७% धार्मिक ऑस्ट्रेलियन लोकांना असा नेता हवा होता जो त्यांच्या धार्मिक श्रद्धा असलेल्या लोकांसाठी उभा राहील, त्या तुलनेत ४०% ऑस्ट्रेलियन लोक म्हणाले की, धर्म त्यांच्या जीवनात तितकासा महत्वाचा नाही.
५. प्रतिसादकर्त्यांची धार्मिक संलग्नता प्राधान्यांवर कसा प्रभाव टाकते
जागतिक स्तरावर, धार्मिक संलग्नतेवर आधारित प्रतिसाद भिन्न आहेत. भारतात हिंदू आणि मुस्लिम मिळून लोकसंख्येच्या ९०% पेक्षा जास्त आहेत. यांच्यातील फरक नगण्य होता. ७८% मुस्लिमांच्या तुलनेत ८२% हिंदूंना असा नेता हवा होता जो त्यांच्या धार्मिक श्रद्धा असलेल्या लोकांसाठी उभा राहील.