आधुनिक युगातील सर्वांत भीषण औद्योगिक दुर्घटना असे वर्णन करण्यात आलेल्या भोपाळ वायूगळती दुर्घटनेस ३ डिसेंबर रोजी ४० वर्षे पूर्ण झाली. या दुर्घटनेस सुरुवाातीस ३ हजारांहून अधिक नागरिक वायूगळतीतून उद्भवलेल्या विषबाधेमुळे मृत्युमुखी पडले. कित्येक हजारांना आजही त्या विषारी वायूमुळे अनेक विकार आजन्म जडले. वायूगळतीच्या पश्चातपरिणामांमुळे मृतांची संख्या ६ हजारांच्या वर गेल्याचे म्हणणे गतवर्षी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडले. 

नेमके काय घडले?

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या वेशीवर असलेल्या युनियन कार्बाइड कारखान्यातील एका टाकीतून २ डिसेंबर १९८४ आणि ३ डिसेंबर १९८४ दरम्यान रात्रीपासून मध्यरात्रीपर्यंत मिथाइल आयसोसायनेट या वायूची गळती सुरू झाली. युनियन कार्बाइड ही खते निर्मिती करणारी कंपनी होती. तिची मालकी युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन या अमेरिकी कंपनीकडे होती. एका इंजिनिअरकडून साफसफाईदरम्यान चुकून जलीभूत मिथाइल आयसोसायनेटच्या टाकीत पाण्याचा प्रवाह सोडला गेला. त्याबरोबर त्वरित तीव्र स्वरूपाची रासायनिक प्रक्रिया झाली आणि विषारी वायूचे ढगच त्या टाकीचे झाकण तोडून आसमंतात पसरू लागले.

india rejects food shipments from china sri lanka bangladesh japan and turkey over safety concerns
चीन, जपान, तुर्कीये, श्रीलंका, बांगलादेशी खाद्यवस्तूंना भारतीय मानकांचा दणका! परदेशातील खाद्यवस्तू भारत का नाकारतोय?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Rabi sowing in the country is on 428 lakh hectares
देशातील रब्बी पेरण्या ४२८ लाख हेक्टरवर; जाणून घ्या, देशभरातील पीकनिहाय पेरणी क्षेत्र
South Korea could become the first country to disappear from Earth
‘हा’ देश होणार पृथ्वीवरून गायब? कारण काय?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?

हेही वाचा >>> अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’मधील स्त्री वेशातील लूक आहे प्राचीन प्रथेचा भाग; काय आहे गंगामा जतारा उत्सव?

मृत्यूचे तांडव…

काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव युनियन कार्बाइडमधील कर्मचाऱ्यांना झाली. त्यांचे डोळे जळू लागले आणि श्वास घेण्यातही त्रास होत होता. कंपनीतील आणीबाणीचा सायरन वाजवला गेला. तो ऐकून आजूबाजूच्या परिसरातील मंडळी खाडकन जागी झाली. पण तोपर्यंत वायूचे तांडव सुरू झाले होते. आजूबाजूच्या परिसरातील घरांमध्ये वायू शिरला. कित्येक झोपेत होते. त्यांना श्वास घेण्यास विलक्षण त्रास होऊ लागला. जे झोपेतून उठले, त्यांच्या डोळ्यांत तीव्र जळजळ होऊ लागली. ओल्या फडक्याने चेहरा झाकणे, जमिनीवर लोळण घेणे असे प्राथमिक उपाय करण्याचे भान फारच थोड्यांना राहिले. इतर बहुतेक पळापळ करू लागले आणि रस्त्यावर प्राण सोडू लागले. रुग्णालयांमध्ये गेलेल्यांवर नेमके उपचार काय करायचे, हे तेथील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना समजेनासे झाले. सर्वसामान्यांप्रमाणेच डॉक्टरही गतप्राण होऊ लागले. याशिवाय शेकड्याने पालीव जनावरेही रस्त्यात प्राण सोडू लागली. कोणाचा पायपोस कोणासा लागेनासा झाला. ३ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत वायूचा प्रभाव कमी झाला. पण तोपर्यंत एकाच टाकीतून जवळपास ६० टन मिथाइल आयसोसायनेटची गळती झाली होती.

हेही वाचा >>> राज्यात आता दुचाकी चालकाप्रमाणेच सहप्रवाशासही हेल्मेटसक्ती…अंमलबजावणी कधीपासून? निर्णयामागे कारण काय?

दगावले किती?

युनियन कार्बाइड आणि केंद्र सरकार १९८९मध्ये यांच्यात न्यायालयाबाहेर झालेल्या तडजोडीनुसार, ३८०० नागरिक या दुर्घटनेत दगावले यावर दोन्ही पक्ष राजी झाले आणि त्यानुसार भरपाईचे वाटप झाले. पण भोपाळ नगर निगम किंवा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मते विविध रुग्णालयांतील मृतदेहांचा हिशेब केल्यानंतर आकडा १५ हजारांवर पोहोचला होता. पुढे २०१०मध्ये केंद्र सरकारने १९८९मधील तडजोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात निवारक याचिका (क्युरेटिव्ह पिटिशन) दाखल केली. यात मृतांचा नेमका आकडा ५२९५ असल्याचे नमूद करण्यात आले. भोपाळ वायूबळींसाठी नेमलेल्या कल्याण आयुक्तांनी १५ डिसेंबर २०२२ रोजी दाखल केलेल्या अहवालात हा आकडा ५४७९ दाखवण्यात आला. वायूच्या संपर्कात आल्यामुळे कर्करोग आणि किडनी विकारग्रस्तांची संख्या अनुक्रमे १६७३९ आणि ६७११ असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

भरपाई किती?

दुर्घटनेनंतर पाच वर्षांनी केंद्र सरकार आणि युनियन कार्बाइड यांच्यात न्यायालयाबाहेरील तडजोडीत एकूण ४७ कोटी डॉलरची भरपाई युनियन कार्बाइडकडून मिळण्याचे ठरले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मृतांच्या नातेवाइकांस प्रत्येकी १ लाख ते ३ लाख रुपये, अंशतः अथवा पूर्णतः अपंगत्व आलेल्यांस प्रत्येकी ५० हजार ते ५ लाख रुपये, तात्पुरत्या दुखापतीसाठी प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपये देण्याचे ठरले. २०१०मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवारक याचिका दाखल करून, त्यावेळी युनियन कार्बाइडची मालकी मिळवलेल्या डाऊ केमिकल्सकडून अधिक भरपाईची मागणी केली. मूळ भरपाईच्या वेळी बळींच्या मोजदादीत त्रुटी राहिल्याचे सरकारचे म्हणणे होते. परंतु गेल्या वर्षी म्हणजे १४ मार्च २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही निवारक याचिका फेटाळून लावली.

न्यायाची प्रतीक्षाच?

भोपाळ वायूबळींच्या बाजूने लढणाऱ्या संघटना, पीडितांच्या संघटना आणि ज्येष्ठ वकिलांच्या म्हणण्यानुसार, इतक्या वर्षांत जवळपास २५ हजारांचे बळी घेणाऱ्या आणि लाखाहूंन अधिकांना कायमचे पंगू करणाऱ्या या दुर्घटनेनंतरही आजतागायत एकाही दोषी व्यक्तीला अटक होऊ शकलेली नाही. जमीन आणि पाण्याचे प्रदूषण केल्याबद्दल कंपनीविरुद्ध साधा ठपकाही ठेवला गेला नाही.

दोषी मालकही परागंदा…

युनियन कार्बाइड दुर्घटनेनंतर कंपनीचा मालक वॉरन अँडरसन अमेरिकेला पळून गेला. तो भारतात परत आलाच नाही. वास्तविक मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांनी त्याला अटक करवली होती. पण अमेरिकी सरकारच्या दबावाखाली भारत सरकारने त्यास जामीन मंजूर करायला लावला. तो अमेरिकेत जाण्यासाठी, खटल्यात गरज पडेल त्यावेळी अँडरसनला भारतात यावे लागेल अशी अट घालण्यात आली. पण अँडरसन नंतर परतलाच नाही. त्याच्या विरुद्ध दोन वेळा वॉरंट जारी करण्यात आले, पण त्याने दाद दिली नाही. अखेर २०१४मध्ये त्याचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला.