Ancient Egyptian doctor: कैरोच्या (Cairo) दक्षिणेस मिन्या (Minya) भागात अलीकडेच झालेल्या एका पुरातत्त्वीय उत्खननामुळे इजिप्तच्या इतिहासात आणखी एक अद्भुत प्रकरण जोडले गेले आहे. इजिप्तशियन आणि स्पॅनिश चमूने संयुक्तरित्या केलेल्या उत्खननात काही दफनं उघडकीस आली आहेत. या दफनांमध्ये सोन्याच्या जिभा आढळून आल्या आहेत. इतकंच नाही तर या दफनांमध्ये पवित्र ताईत आणि इतर गोष्टीही सापडल्या आहेत. याशिवाय याच चमूला इजिप्तमधील सक्कारा येथे फॅरोवर स्वतः उपचार करणाऱ्या डॉक्टरची ४,१०० वर्षे जुनी कबर सापडली आहे. या कबरीचा संबंध टेटिनेबेफू (Tetinebefou) नावाच्या एका डॉक्टरशी आहे, असे शोध लावणाऱ्या स्विस-फ्रेंच पथकाने त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. जरी दफनांमधीलतील वस्तूंची लूट झालेली असली तरी, पुरातत्त्वशास्त्रज्ञांना या स्थळावरील भिंतीवरील चित्रे आणि हायरोग्लिफिक शिलालेखांचा अभ्यास करता आला. या शिलालेखांमध्ये डॉक्टरच्या पदाचा उल्लेख आहे आणि त्याच्या वैद्यकीय उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचे चित्रण केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा