आंध्रप्रदेशातील प्रकाशम येथे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना सुमारे ४१ हजार वर्षे जुन्या शहामृगाच्या घरट्याचा शोध लागला. या शोधामुळे भारतीय उपखंडातील मोठ्या आकाराच्या प्राण्यांमधील वैविध्य (मेगाफौना) नामशेष होण्याबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते. त्याविषयी जाणून घेणे, नक्कीच माहितीपूर्ण ठरावे.

हा शोध कोणी लावला?

देवरा अनिल कुमार हे एमएस युनिव्हर्सिटी, वडोदरा येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांच्यासह पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या एका पथकाने प्रकाशम येथे सर्वेक्षण करत असताना जगातील सर्वात जुने शहामृगाचे घरटे शोधून काढले. या घरट्याची रुंदी ९-१० फूट आहे. या घरट्यात एकेकाळी ९-११ अंडी होती, असे असले तरी घरट्याच्या रचनेवरून या घरट्यात ३०-४० अंडी ठेवण्याची क्षमता होती, असे संशोधकांना लक्षात आले. संशोधकांनी या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनास आणून दिली, ती म्हणजे या घरट्याच्या शोधामुळे भारतातून मोठ्या आकाराच्या प्राण्यांमधील वैविध्य (मेगाफौना) नष्ट का झाले, या विषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.

tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
Image Of Tiger.
Tiger Travel : टी-२२ च्या बछड्याचा ५०० किलोमीटर प्रवास… यवतमाळचा वाघ धाराशिव, सोलापूरात कसा आला?
Tensions rise after cattle parts found under Khed Devane bridge
खेड देवणे पुलाखाली गोवंशाचे अवयव सापडल्याने तणाव
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
Mumbai Boat Accident
Elephanta Caves: घारापुरी (एलिफंटा) लेणींना एवढे महत्त्व का? हजारो पर्यटक त्यांना रोज भेट का देतात?

अधिक वाचा: प्राचीन इजिप्शियन लोकांनी मेंदूच्या कर्करोगावर शोधला होता उपचार; नवीन संशोधन नेमके काय सांगते?

मेगाफौना म्हणजे काय?

मेगाफौना म्हणजे नेमके काय याबद्दल वैज्ञानिकांमध्ये मतैक्य नाही. तरीही हा शब्द सामान्यतः ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्राण्यांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. हा शब्द प्रथम इंग्लिश निसर्गशास्त्रज्ञ आणि संशोधक अल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी त्यांच्या जिओग्राफिकल डिस्ट्रिब्युशन ऑफ ॲनिमल्स, १८७६ या पुस्तकात वापरला होता. मेगाफौनाचे त्यांच्या आहाराच्या प्रकारानुसार मेगाहर्बीव्हरस (वनस्पती खाणारे), मेगाकार्निव्हरस (मांस खाणारे) आणि मेगाफॉन्निव्हरस (जे वनस्पती आणि मांस दोन्ही खातात) असे वर्गीकरण केले जाऊ शकते. शहामृग हे मेगाकार्निव्हरस आहेत, प्रौढ शहामृगाचे वजन ९० ते १४० किलो असते, तर उंची सात ते नऊ फूट असते.

आंध्रप्रदेशातील हा शोध आपल्याला प्रागैतिहासिक मेगाफौनाबद्दल काय सांगतो?

आंध्रप्रदेशातील शोध ४१ हजार वर्षांपूर्वी दक्षिण भारतात शहामृगांचे अस्तित्व असल्याचे सिद्ध करतो. त्यामुळे भारतातून मेगाफौना का नष्ट झाला यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांना मोठीच मदत होणार आहे. भारतीय उपखंडातील शहामृगाच्या प्रजातींच्या पहिल्या अवशेषांची नोंदणी रिचर्ड लायडेक्कर यांनी १८८४ साली केली. सध्याच्या पाकिस्तानातील अप्पर शिवालिक टेकड्यांमध्ये ढोक पठाण निक्षेपांमध्ये हे अवशेष सापडले होते. रिचर्ड यांनी या नामशेष झालेल्या प्रजातींची ओळख स्ट्रुथियो एशियाटिकस किंवा आशियाई शहामृग म्हणून केली आणि पुढे हे अवशेष (१८७१) रिचर्ड मिल्ने-एडवर्ड्स म्हणून ओळखले जाऊ लागले. पुरातत्त्वशास्त्रज्ञ एस. ए. साळी यांनी १९८९ मध्ये महाराष्ट्रातील पाटणे येथील अप्पर पॅलेओलिथिक-ओपन-एअर कॅम्पिंग स्थळावर शहामृगाच्या अंड्याचे मणी आणि कोरलेले तुकडे (अंदाजे ५०,००० ते ४०,००० वर्षांपूर्वीचे) शोधल्याची नोंद केली.

२०१७ साली हैदराबादमधील सेंटर फॉर सेल्युलर अॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) येथील संशोधकांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील जीवाश्मरुपी सापडलेल्या अंड्यांच्या कवचाच्या संकलनाचे मूल्यांकन केले. या मूल्यांकनातून २५ हजार वर्षांपूर्वी भारतात शहामृगांचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले. संशोधकांनी भारतातील शहामृगाच्या अस्तित्त्वाचे श्रेय गोंडवाना लॅण्डच्या महाद्विपीय प्रवाहामुळे झालेल्या जैव- भौगोलिक खंड विभाजनाला दिले. त्यामुळेच सात खंड निर्माण झाल्याचे आपल्याला माहीत आहे.

अधिक वाचा: केनिया सरकार करणार १० लाख भारतीय कावळ्यांचा संहार; काय आहे नेमकं प्रकरण?

२०२० साली येल युनिव्हर्सिटी आणि स्मिथसोनियन्स नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री मधील संशोधकांचा समावेश असलेल्या एका संशोधनात भारतातील २५ ठिकाणांवरील जीवाश्मांचा डेटाबेस संकलित करण्यात आला. ‘भारतीय उपखंडातील लेट क्वाटरनरी एक्सटीन्क्शन्स’ या शीर्षकाच्या संशोधनात मानवाच्या आगमनाच्या अनुषंगाने येथील मोठ्या प्राण्यांच्या नाशाची सुरुवात सुमारे ३० हजार वर्षांपूर्वी झाल्याचे म्हटले आहे. हे संशोधन सह- उत्क्रांती गृहितकला देखील समर्थन देते. या गृहीतकानुसार हे मोठे प्राणी नष्ट होण्यासाठी मानवच कारणीभूत ठरला. होमिनिन – मानव आणि त्यांचे नातेवाईक यांच्या सह-उत्क्रांतीमुळे ही परिस्थिती उद्भवली असावी ,असे हे संशोधन सांगते. भौगोलिक पृथक्करण आणि अजैविक घटकांमुळे हे मोठे प्राणी जलद गतीने नामशेष झाले असावेत, असे त्या संशोधनात म्हटले आहे.

सध्या आंध्रप्रदेशमध्ये ४१ हजार वर्षे जुने शहामृगाचे घरटे सापडले असले तरी भारतातून मेगाफौना का नष्ट झाला हे समजून घेण्यासाठी आणखी योग्य त्या पुराव्यांची गरज असल्याचे अभ्यासक सांगतात.

Story img Loader