50,000-year-old ancient flute: सध्या इंटरनेटवर एका प्राचीन बासरीचे फोटो व्हायरल झाले आहेत. भारतीयांसाठी बासरी या संगीतवाद्याचे महत्त्व विशेषच आहे. श्रीकृष्ण आणि बासरी हा तर आपल्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगालाच बासरीच्या सुरांचे आकर्षण आहे, असे म्हटल्यास वावगं ठरू नये. असं असलं तरी या बासरीचा शोध कसा लागला आणि या वाद्याचे प्राचीन पुरावे काय सांगतात हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

जगातील बासरीचे सर्वात जुने पुरावे हे ५० हजार वर्षे जुने आहेत. ही बासरी अस्वलाच्या हाडांपासून तयार करण्यात आली होती. १९९५ साली स्लोव्हेनियामधील सर्क्नोजवळील दिवजे बेबच्या गुहेत झालेल्या उत्खननादरम्यान या बासरीचे अवशेष सापडले. ही गुहा इड्रिजका नदी जवळ असलेल्या पठारावर आहे. ज्या गुहेत बासरीचे अवशेष सापडले आहेत, ती गुहा अस्वलांची होती. शेवटच्या हिमयुगाच्या कालखंडात मानवाने या गुहेला भेट दिल्याचे पुरावे सापडले आहेत. सुरुवातीला निअँडरथल आणि नंतरच्या कालखंडात आधुनिक मानवाने येथे भेट दिली होती. सुमारे ५० हजार वर्षांपूर्वीच्या चुलीजवळ/शेकोटीजवळ बासरीचे अवशेष सापडले आहेत. उत्खननादरम्यान ज्या थरात हे अवशेष सापडले आहेत त्या थराचा कालखंड हा पुरापाषाण युगाचा आहे. अस्वलाच्या दातांवर वापरलेल्या इलेक्ट्रॉन स्पिन रेझोनान्सच्या आधारावर या थराचा कालखंड ठरवण्यात आला. ही बासरी याआधी सापडलेल्या मानवनिर्मित बासरीपेक्षा प्राचीन आहे.

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
loksatta kutuhal interesting facts about the first dinosaur of india
कुतूहल : भारतातील पहिलावहिला डायनोसॉर
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन

अधिक वाचा: शास्त्रज्ञांना सापडला तब्बल ६००० वर्षांपूर्वीचा समुद्रात बुडालेला मानवनिर्मित पूल; का महत्त्वाचा आहे हा पूल?

निअँडरथल कोण होता?

दिवजे बेबची निअँडरथल बासरी हे जगातील सर्वात प्राचीन ज्ञात वाद्य आहे आणि आजपर्यंत निअँडरथल्समधील संगीताच्या अस्तित्वाचा ती सर्वोत्तम पुरावा असल्याच मानलं जातं. सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी होमो सेपियन्स निअँडरथॅलेन्सिसचा युरोपमध्ये विकास झाला. नंतर पश्चिम आशिया आणि मध्य पूर्वेपर्यंत त्याचा विस्तार झाला. १८५६ साली या मानवाचे जीवाश्म अवशेष प्रथम जर्मनीतील निअँडरथल येथे सापडले. म्हणूनच हा मानव निअँडरथल म्हणून ओळखला जातो. याच मानवाने दिवजे बेबच्या गुहेत सापडलेली बासरी तयार केल्याचे मानले जाते. हाडापासून तयार करण्यात आलेल्या या बासरीवर चार छिद्र आहेत. त्यामुळेच हीच मानवनिर्मित आद्य बासरी असल्याचा तर्क अभ्यासकांनी लावला. ही बासरी तरुण अस्वलाच्या मांडीच्या हाडापासून तयार करण्यात आली.

ही नक्की मानव निर्मित बासरी आहे का ? तज्ज्ञ काय सांगतात?

परंतु हाडाच्या बासरीचा सापडलेला हा तुकडा, नेमका बासरीचा आहे की, एखाद्या प्राण्याने चावल्यामुळे त्याला छिद्र पडले आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच संशोधकांमध्ये याविषयी मतभेत आहेत. ही बासरी निअँडरथलने तयार केल्याचे मत बहुतांश अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. जीवाश्मतज्ज्ञ Cajus Diedrich यांनी या बासरीच्या- हाडाच्या तुकड्याचा अभ्यास केला. तसेच त्यांनी या गुहेत सापडलेल्या प्राण्यांचाही अभ्यास केला. त्यांनी केलेलं संशोधन रॉयल सोसायटी ओपन सायन्समध्ये प्रकाशित झाले आहे. त्यांनी म्हटले आहे की, निअँडरथलच्या हाडांच्या बासरीत दगडी हत्याराच्या कुठल्याही खुणा नाहीत. तर त्यावर हिमयुगातील हायनासच्या दाताच्या खुणा आढळून आल्या आहेत. हायनासचे दात तरुण अस्वलाच्या हाडांना छिद्र पाडण्यास सक्षम होते.

नक्की प्रकरण काय आहे?

कॅनडातील व्हिक्टोरिया विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ एप्रिल नोवेल म्हणतात, “बहुतेक मानववंशशास्त्रज्ञ हे मान्य करतात की अश्मयुगाशी संबंधित दिवजे बेब ‘बासरी’ ही मांसाहारी प्राण्याने चघळलेलं हाडं आहे, ती मानवनिर्मित नाही. परंतु या हाडाच्या तुकड्याचा वारंवार बासरी म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे या तुकड्याला बासरी म्हणणं तत्त्वतः चुकीचं आहे. कथित दिवजे बेब बासरी ही निअँडरथल काळातील आहे आणि स्लोव्हेनियाचे राष्ट्रीय संग्रहालयही त्याचे वर्णन “निअँडरथल बासरी” असे करते. परंतु संशोधनात बरंच काही वेगळं आढळून आलेलं आहे. एकूणच निअँडरथल्सने ही बासरी तयार केल्याचा कोणताही पुरावा नाही.

अधिक वाचा: How vegetarian is India? भारत खरंच शाकाहारी आहे का? राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण काय सांगते?

निअँडरथल वाद्य तयार करणारे पहिले नव्हते तर कोण होते?

प्राचीन बासरी तयार करण्याचे श्रेय नैऋत्य जर्मनीच्या ऑरिग्नासियन संस्कृतीतील लोकांकडे जाते, ज्यांनी ४० हजार वर्षांपूर्वी गिधाडांची हाडे आणि मोठ्या हस्तिदंताने बासरी तयार केली होती. ही बासरी बरीचशी आधुनिक बासरी सारखी दिसते. त्या बासरीवर कारागिरी केल्याच्या खुणाही आहेत. जर्मनीतील ट्युबिंगेन विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ निकोलस कोनार्ड लिहितात की, संगीतामुळे या आधुनिक मानवांना सामाजिक बंध मजबूत करता आले, त्यामुळे त्यांना त्यांचे समाज संघटित करण्यात आणि निअँडरथल्सपेक्षा अधिक प्रभावीपणे विस्तार करण्यास मदत झाली.

पुढे काय?

निअँडरथल्सने टाळ्या वाजवून किंवा शरीरावर चापट मारून वादनाशिवाय संगीत तयार केले असावे. कदाचित त्यांनी तयार केलेल्या वाद्यांचे अवशेष नष्ट झाले असावेत. पण वाद्यवादन ते करत होते याचा कोणताही पुरावा अद्याप सापडला नाही आणि दिवजे बेब “बासरी” बद्दलचे सत्य “काही मंडळींमध्ये कायम असलेली मिथके मोडून काढण्यास मदत करेल,” असे नोवेल म्हणतात.

Story img Loader