PM Narendra Modi Launches 5G Services: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5G प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित प्रदर्शनात मोदींनी देशभरातील निवडक १३ शहरांमध्ये 5G लाँच केले. प्राप्त माहितीनुसार, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ओडिशामधील गावात 5G ची लाईव्ह चाचणी पार पडली. तसेच आजच्या उद्घाटन कार्यक्रमात स्वतः मुकेश अंबानी व आकाश अंबानी यांनी मोदींना 5G संदर्भात माहिती देत प्रत्यक्ष अनुभ घडवून दिला. 5G मुळे देशातील इंटरनेट वापरकर्त्यांना कमी वेळात व कमी दरात १० पट वेगवान नेटवर्क वापरता येणार आहे. मात्र सामान्य नागरिकांच्या मनात अजूनही 5G च्या वापरासंदर्भात काही प्रश्न आहेत, चला तर तुमच्या या प्रश्नांवर उत्तरे पाहुयात..

या शहरांना प्रथम 5G वापरता येणार..

दूरसंचार विभागच्या माहितीनुसार, भारतात 5G लाँच केल्यानंतर, भारतातील १३ शहरांमध्ये उपलब्ध होईल. २०२२ मध्ये, अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई सारखी शहरे ५जी सेवा प्राप्त करणारी पहिली शहरे असतील. महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या दोन शहरात 5G लाँच नंतर अगदी खेड्यापाड्यांनाही नेटवर्कमध्ये जोडण्याचे काम केले जाईल अशी माहिती दूरसंचार मनातरी आश्विन वैष्णव यांनी दिली आहे.

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात

5G च्या वापरासाठी नवीन मोबाईल घ्यावा लागेल?

सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक फोनमध्ये 5G सेवा कार्यक्षम असतील मात्र गेल्या काही वर्षांत लॉन्च झालेल्या फोनमध्ये खर्च वाचवण्यासाठी आणि किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी 5G सुविधा देण्यात येत नव्हती. Xiaomi चा Redmi Note 11 Pro फोन (किंमत ₹18,999 पासून सुरु) तसेच सर्वात Nokia C21 Plus (₹10,299 पुढे) हे फोन जर आपण घेणार असाल तर त्यात 5G सेवा काम करणार नाहीत.

तुमच्या स्मार्टफोनमध्ये खरोखरच 5G आहे की नाही हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांचा सर्वात मोठा डेटाबेस असणारी साईट Gsmarena वर आपण मोबाईल नेटवर्क क्षमता पाहू शकता. यासाठी तुमचे स्मार्टफोन मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये शोधून नेटवर्क अंतर्गत, 5G बँड नमूद आहेत की नाही ते पहा.

तुमच्या फोनमध्ये 5G आहे का?

तुमचा स्मार्टफोन 5G ला सपोर्ट करतो की नाही हे जाणून घेण्यासाठी मोबाईलच्या सेटिंग्ज तपासा. अँड्रॉइड मध्ये सेटिंग्ज >> नेटवर्क आणि इंटरनेट >> मोबाइल नेटवर्क >> या क्रमाने उपलब्ध नेटवर्कचे तपशील तपासून घेता येतील. यात 5G चा समावेश असल्याची खात्री करून घ्या.

5G साठी नवीन सिमकार्ड घ्यावे लागेल?

भारतातील प्रसिद्ध मोबाईल अभियंता अर्शदीप सिंग निप्पी यांनी सांगितले की 4G सिमवर 5G सेवा दिली जाऊ शकते. ऑपरेटर OTA अपडेटद्वारे तुमचे सध्याचे सिमकार्ड 5G सक्षम करून घेता येईल. मोबाईल नंबरवर 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी सिमकार्ड अपडेट करून झाल्यावर आपल्याला 5G चा इंटरनेट प्लॅन घ्यावा लागेल कारण अगोदरच सुरु असलेल्या रिचार्ज पॅकमध्ये 5G वापरता येणार नाही.

5G तंत्रज्ञानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला २०२३ ते २०४० दरम्यान ३६. ४ ट्रिलियन (४५५ अब्ज डॉलरचा) फायदा होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. २०३० पर्यंत भारतातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी एक तृतीयांश वाटा हा 5G चा असेल. उत्पादन क्षेत्रात , किरकोळ (१२ टक्के) आणि कृषी (११ टक्के) यांना 5G तंत्रज्ञानाचा फायदा होईल असे अंदाज आहेत.

Story img Loader