Israel-Hamas War इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ)ला हमासने ठार मारलेल्या सहा ओलिसांचे मृतदेह सापडल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. तेल अवीव, जेरुसलेम आणि इतर शहरांमध्ये निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात ओलिसांच्या सुटकेसाठी करार करण्यात अपयशी ठरल्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यादरम्यान हमासने या नागरिकांचे अपहरण केले होते. अमेरिका आणि इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये मृतावस्थेत सापडलेल्या सहा लोकांपैकी काहींना युद्धविराम करारानुसार सोडले जाण्याची अपेक्षा होती, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. हमासने ठार मारलेले सहा ओलिस कोण होते? ओलिसांच्या हत्येनंतर नागरिक संतप्त का झाले? युद्धविरामाची मागणी का केली जात आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

मारले गेलेले सहा ओलिस कोण होते?

७ ऑक्टोबर रोजी हमासने पकडलेल्या सहा ओलिसांच्या मृत्यूची इस्रायलने रविवारी पुष्टी केली. सुमारे २५१ ओलिसांपैकी ९७ ओलिस गाझामध्ये बंदिवान आहेत. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, ३३ ओलिसांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी इस्रायली सैन्याने ज्या सहा ओलिसांचे मृतदेह बाहेर काढले होते, त्यापैकी पाच जणांचे संगीत महोत्सवातून अपहरण करण्यात आले होते आणि सहाव्या व्यक्तीचे अपहरण जवळच्या किबुट्झमधून करण्यात आले होते. हर्ष गोल्डबर्ग-पोलिन (२३), एडन येरुशल्मी (२४), ओरी डॅनिनो (२५), अल्मोग सरुसी (२६), अलेक्झांडर लोबानोव (३२) आणि कार्मेल गॅट (३९) अशी हत्या करण्यात आलेल्या ओलिसांची नावे आहेत.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Bashar al-Assad
Bashar al-Assad: सीरियाचा नेता की क्रूर राजवटीचा चेहरा? बशर अल-असद कोण आहे?
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
Syria, Abu Mohammad Al Jolani, dictatorship Syria,
विश्लेषण : जिहादीचा बनला प्रशासक… कोण आहे सीरियाचा नवा शासक अबू मोहम्मद अल जोलानी?
७ ऑक्टोबर रोजी हमासने पकडलेल्या सहा ओलिसांच्या मृत्यूची इस्रायलने रविवारी पुष्टी केली. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : जाहिरातींशी संबंधित नियम १७० हटविण्याच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले; नेमके कारण काय?

हर्ष गोल्डबर्ग-पॉलिन हा एक इस्रायल-अमेरिकन होता. अमेरिकेतील डेमोक्रेटिक कन्वेंशनमध्ये त्याच्या आई-वडिलांनी, त्याच्या परतीविषयी एक भावनिक भाषण केले जोते. ७ ऑक्टोबरला दक्षिण इस्रायलमध्ये नोव्हा संगीत महोत्सवात हमासने हल्ला केला, तेव्हा हर्ष गोल्डबर्ग-पॉलिनदेखील याच महोत्सवात होता. हत्या करण्यात आलेली दुसरी ओलिस इडन येरुशल्मी नोव्हा महोत्सवात बारटेंडर म्हणून काम करत होती, तेव्हाच तिचे अपहरण करण्यात आले. तिसरा ओलिस, २५ वर्षांचा ओरी डॅनिनो हा एक सैनिक होता, जो नोव्हा उत्सवात सहभागी झाला होता. त्याच्यासह त्याचे मित्र ओमेर शेमटोव्ह, माया आणि इटाय रेगेव्ह यांचेदेखील अपहरण करण्यात आले.

चौथा ओलिस, अल्मोग सरुसी हा मूळचा मध्य इस्रायलमधील रानाना येथील संगीत निर्माता होता. तो त्याची होणारी बायको शहार गिंडीबरोबर या उत्सवात आला होता. या जोडप्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गिंडीला गोळी लागली आणि ती गंभीर जखमी झाली. तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे अपहरण झाले. पाचवा ओलिस, रशियन-इस्त्रायली अलेक्झांडर लोबानोव्ह नोव्हा महोत्सवात प्रमुख बारटेंडर होता. दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने त्याने लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. सहावी ओलिस कार्मेल गॅट ही एक थेरपिस्ट होती, जी नुकतीच भारताच्या सहलीनंतर इस्रायलला परतली होती. तिला बीरी किबुत्झ येथील तिच्या पालकांच्या घरातून ओढून नेण्यात आले आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांसह तिचे अपहरण करण्यात आले.

७ ऑक्टोबरला दक्षिण इस्रायलमध्ये नोव्हा संगीत महोत्सवात हमासने हल्ला केला होता. (छायाचित्र-एपी)

ओलिसांच्या हत्येचे कारण काय?

इस्रायली सैन्याला दक्षिण गाझामधील रफाह शहरातील भूमिगत बोगद्यामध्ये सहा ओलिसांचे मृतदेह सापडले. सुरक्षा दले त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या काही वेळापूर्वीच हमासने ओलिसांची निर्घृणपणे हत्या केली, असा दावा करण्यात आला आहे. “काही तासांपूर्वी, आम्ही कुटुंबीयांना माहिती दिली की त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह आयडीएफ सैन्याने रफाहमधील भूमिगत बोगद्यात ठेवले आहेत. आमच्या प्राथमिक मूल्यांकनानुसार, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच हमासच्या दहशतवाद्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली होती”, असे आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी म्हणाले.

इस्रायली आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, शवविच्छेदनाच्या ४८ ते ७२ तास आधी म्हणजेच गुरुवार आणि शुक्रवार सकाळच्या दरम्यान ओलिसांची हत्या करण्यात आली. त्यांनी सांगितले की, फॉरेन्सिक तपासणीत असे आढळून आले आहे की, सर्व सहा ओलिसांना जवळून अनेक वेळा गोळ्या घातल्या गेल्या आहेत, असे ‘द टाईम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तात देण्यात आले आहे. ‘चॅनेल १२’मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा अधिकाऱ्यांना भीती होती की, गेल्या आठवड्यात बोगद्यातून सुटका केलेले ओलिस इतर ओलिसांचा ठावठिकाणा सांगतील आणि यामुळेच हमासने सहा जणांची हत्या केली. डॅनियल हगारी म्हणाले की, सहा ओलिसांचे मृतदेह रफाह येथील एका बोगद्यात सापडले होते. याच बोगद्यातून आम्ही काही दिवसांपूर्वी फरहान अल-कादीची सुटका केली होती.”

रविवारी संपूर्ण इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. (छायाचित्र-एपी)

मृत्यूबद्दल इस्रायली नागरिकांचा संताप

रविवारी संपूर्ण इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. नेतान्याहू यांनी हमासबरोबर ओलिस यांना सोडवण्यासाठी पुरेसा प्रयत्न केला नाही, असा आंदोलकांचा आरोप आहे. दरम्यान, इस्रायलच्या सर्वात शक्तिशाली कामगार संघटना ‘हिस्ताद्रुत’ने सोमवारी देशव्यापी सामान्य संपाची हाक दिली आहे. “संपूर्ण इस्रायली अर्थव्यवस्था बंद होईल,” असे म्हणत त्यांनी ओलिस कराराची मागणी केली आहे. इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच यांनी देशाच्या ॲटर्नी जनरलला संप रोखण्यासाठी तातडीने आदेश जारी करण्याची विनंती केली आहे; तर दुसरीकडे हमासला युद्धविराम करार नको आहे, असे सांगून नेतान्याहू यांनी सहा ओलिसांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. “जो कोणी ओलिसांची हत्या करतो, त्याला करार नको आहे,” असे ते म्हणाले.

हेही वाचा : ‘हा’ देश प्राण्यांच्या जीवावर उठला; ७०० हून अधिक प्राणी मारण्याचे सरकारने दिले आदेश, कारण काय?

हमासने यावर काय प्रतिक्रिया दिली?

हमासचे वरिष्ठ अधिकारी खलील अल-हय्या यांनी सहा इस्रायली ओलिसांच्या मृत्यूसाठी नेतान्याहू यांना जबाबदार धरले आहे. अल-हय्या यांनी ‘अल जझीरा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या मृत ओलिसांना आणि इतरांना ते जिवंत असतानाच प्रत्यक्ष देवाणघेवाण कराराद्वारे सोडले गेले असते. नेतान्याहू आणि त्यांचे अतिरेकी सरकार हे त्यांच्या हत्येस कारणीभूत आहे, असे ते म्हणाले. गाझामधील डझनभर ओलिस इस्रायली हल्ल्यात मारले गेले होते, असा दावाही त्यांनी केला.

Story img Loader