बुधवार, दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली. दोन व्यक्तींनी अभ्यागतांच्या गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहामध्ये उडी मारली, इतकेच नाही तर  घोषणाबाजी करून पिवळा धूर सोडणारा बॉम्ब फोडला. या प्रकारात या दोघांशिवाय इतर दोन व्यक्तींचाही समावेश होता. परंतु त्यांचा नक्की हेतू काय होता हे अद्याप उघड झालेले नाही. अनेकांकडून हे कृत्य “स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या भगतसिंग यांच्याकडून प्रेरित होते”, असे सांगितले जात आहे. मणिपूरपासून ते शेतकऱ्यांच्या समस्यांपर्यंत विविध मुद्द्यांचा निषेध करणे हा या गटाचा स्पष्ट उद्देश होता असेही सांगण्यात येत आहे. अशाच स्वरूपाची साम्य दर्शविणारी घटना ९४ वर्षांपूर्वी इतिहासात घडली होती. क्रांतिकारक भगतसिंग यांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीच्या सभागृहामध्ये दोन बॉम्ब फेकले होते, ज्याला आज आपण अधिकृतपणे भारतीय संसद म्हणून ओळखतो. या घटनेमुळे ब्रिटीश साम्राज्याला जबर धक्का बसला होता. त्यांच्या बरोबर हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे (HSRA) कॉम्रेड बटुकेश्वर दत्त होते, त्यांनी क्रांतिकारक पत्रिकाही चेंबरमध्ये फेकल्या आणि देशभक्तीपर घोषणा दिल्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात वीर आणि धाडसी कृत्ये अशा प्रकारे पार पडली होती. 

अधिक वाचा: Sharad Pawar त्यामुळेच कर्करोगही हादरवू शकला नाही- असं शरद पवार का म्हणतात?

maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
vile parle vidhan sabha election 2024
विर्लेपार्ले विधानसभा मतदार संघ: झोपड्यांचे पुनर्वसन, विमानतळ फनेल झोनसह अनेक समस्या ‘जैसे थे’, समस्यांकडे लक्ष देण्याची मतदारांची मागणी
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?

१९२९ मध्ये ‘भारतीय संसद’

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे इतिहासकार डॉ. पी. सीतारामय्या यांनी त्यांच्या  पुस्तकात, १९२९ च्या सुरुवातीच्या कालखंडात भारतातील परिस्थिती कशा स्वरूपाची होती यावर भाष्य केले आहे. १९१९ च्या मॉन्टेग- चेम्सफोर्ड सुधारणांमुळे भारतीयांनी मागितलेली स्वायत्तता देण्यास नकार देण्यात आला. भारतीय नागरिक कायदेमंडळात बसले तरी, त्यांना फारसे अधिकार नव्हते. भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांना नेमके हेच वाटत होते की कोणीही इंग्रजांशी सद्भावनेने ‘वाटाघाटी’ करू शकत नाही. “गेल्या दहा वर्षांच्या अपमानास्पद इतिहासाची पुनरावृत्ती न करता… आणि या तथाकथित भारतीय संसदेच्या सभागृहातून भारतीय राष्ट्रावर झालेल्या अपमानाचा उल्लेख न करता, आम्ही हे निदर्शनास आणू इच्छितो की, लोक आणखी काही सुधारणांची अपेक्षा करत असताना… सरकार आमच्यावर सार्वजनिक सुरक्षा आणि व्यापार विवाद विधेयक लादत आहे (Public Safety and the Trade Disputes Bill),” असे भगतसिंग यांनी सभागृहात फेकलेल्या HSRA पत्रकात म्हटले होते.

क्रांतिकारकांना ‘बहिऱ्यांना ऐकवायचे’ होते.

चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारी संघटना एचएसआरएने त्यावेळेस  भारतीय संसदेच्या लबाडीविरुद्ध कठोर संदेश देण्याचा निर्णय घेतला.

बहिऱ्यांना ऐकायला मोठा आवाज लागतो. या घोषवाक्याच्या बरोबर भगतसिंग आणि दत्त यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले होते. एचएसआरएचे  पॅम्प्लेट फेकण्यामागे कोणालाही मारणे किंवा दुखापत करणे ही कल्पना यात नव्हती – मूळ कळीचा मुद्दा ब्रिटीश साम्राज्यात घुमेल यासाठीच हा खटाटोप होता. अत्यंत प्रक्षोभक परिस्थितीत, हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने निर्णय घेतला होता आणि आपल्या सैन्याला ही विशिष्ट कारवाई करण्याचे आदेश दिले होते, जेणेकरून परकीय नोकरशाही शोषकांना आळा बसावा, त्यांचे  नग्न स्वरुप लोकांच्या नजरेसमोर यावे,” असा त्या पत्रकाचा मथितार्थ होता. 

दुर्दैवी दिवस: ८ एप्रिल १९२९

त्या भयंकर दिवशी, व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन सार्वजनिक सुरक्षा आणि व्यापार विवाद विधेयके लागू करण्यासाठी घोषणा करणार होते, विधानसभेतील बहुसंख्य सदस्यांनी त्याला विरोध केला होता आणि दोन्ही विधेयके आधी नाकारली गेली होती. सभागृहातील क्रांतिकारकांच्या कारवाया सुनियोजित होत्या. पोलिस अहवालात असे म्हटले आहे की सिंग आणि दत्त या दोघांनी दोन दिवसांपूर्वी “प्राथमिक टेहळणी” केली होती. त्या दिवशी, ते खाकी शर्ट आणि चड्डी घातलेले होते आणि सभागृहाच्या चेंबरकडे पाहणाऱ्या अभ्यागतांच्या गॅलरीत बसले होते. दोन बॉम्ब होम मेंबर जेम्स क्रेरार यांच्या पाठीमागे फेकण्यात आले. त्यामुळे गदारोळ झाला असे कायदे अभ्यासक ए जी नुरानी यांनी द ट्रायल ऑफ भगतसिंग (१९९६) मध्ये लिहिले. दोन बॉम्ब फेकल्यानंतर भगत सिंग यांनी पिस्तुलातून दोन विनाकारण गोळ्या झाडल्या, तर दत्त यांनी HSRA च्या पत्रकांचा वर्षाव केला. दोघांनी “इन्कलाब झिंदाबाद” आणि “ब्रिटिश साम्राज्यवादाचा पराभव करा” अशा घोषणा दिल्या. ठरल्याप्रमाणे, दत्त आणि सिंग या दोघांनीही पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, त्यामुळे ते सहज पकडले गेले.

अधिक वाचा: Balasaheb Thackeray: कमळाबाईला कसं पटवायचं, ती माझी जबाबदारी … असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना का म्हणाले होते?

शिक्षा: तुरुंगातील आयुष्य

त्यांच्या कृतीवर टीका झाल्यानंतर, भगतसिंग आणि दत्त यांनी प्रतिक्रिया दिली: “आम्ही मानवी जीवन शब्दांच्या पलीकडे पवित्र मानतो. आम्ही नृशंस आक्रोशाचे अपराधी नाही … किंवा आम्ही ‘वेडे’ ही नाही… बळजबरी आक्रमकपणे लागू केली जाते तेव्हा ती ‘हिंसा’ असते आणि म्हणूनच नैतिकदृष्ट्या अन्यायकारक असते, परंतु जेव्हा ती नैतिकदृष्ट्या योग्य कारणासाठी वापरली जाते त्यावेळेस त्याला नैतिक महत्त्व असते”. या घटनेनंतर महिनाभरानंतर खटला सुरू झाला. त्याच वर्षी १२ जून रोजी दोन्ही क्रांतिकारकांना जन्मठेपेची शिक्षा झाली. भगतसिंग यांना नंतर १९२८ मध्ये लाहोरमध्ये ब्रिटीश पोलीस अधिकारी जॉन सॉंडर्स यांच्या हत्येशी संबंधित आरोपांना सामोरे जावे लागले – ज्यामुळे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली. २३ मार्च १९३१ रोजी लाहोर सेंट्रल जेलमध्ये त्यांना फाशी देण्यात आली. काल झालेल्या संसदेतील निषेधात्मक हल्ल्यानंतर शहीद भगतसिंग यांच्याशी संबंधित घटनांना उजाळा मिळाला. मात्र या घटनेची तुलना स्वातंत्रपूर्व काळातील दत्त आणि भगतसिंग यांच्याशी होऊ शकत नाही, असेही मत समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहे.