बुधवार, दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली. दोन व्यक्तींनी अभ्यागतांच्या गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहामध्ये उडी मारली, इतकेच नाही तर घोषणाबाजी करून पिवळा धूर सोडणारा बॉम्ब फोडला. या प्रकारात या दोघांशिवाय इतर दोन व्यक्तींचाही समावेश होता. परंतु त्यांचा नक्की हेतू काय होता हे अद्याप उघड झालेले नाही. अनेकांकडून हे कृत्य “स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या भगतसिंग यांच्याकडून प्रेरित होते”, असे सांगितले जात आहे. मणिपूरपासून ते शेतकऱ्यांच्या समस्यांपर्यंत विविध मुद्द्यांचा निषेध करणे हा या गटाचा स्पष्ट उद्देश होता असेही सांगण्यात येत आहे. अशाच स्वरूपाची साम्य दर्शविणारी घटना ९४ वर्षांपूर्वी इतिहासात घडली होती. क्रांतिकारक भगतसिंग यांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीच्या सभागृहामध्ये दोन बॉम्ब फेकले होते, ज्याला आज आपण अधिकृतपणे भारतीय संसद म्हणून ओळखतो. या घटनेमुळे ब्रिटीश साम्राज्याला जबर धक्का बसला होता. त्यांच्या बरोबर हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे (HSRA) कॉम्रेड बटुकेश्वर दत्त होते, त्यांनी क्रांतिकारक पत्रिकाही चेंबरमध्ये फेकल्या आणि देशभक्तीपर घोषणा दिल्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात वीर आणि धाडसी कृत्ये अशा प्रकारे पार पडली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा