Discovery of Ancient Roman Road Under Old Kent Road in Britain: सुमारे २००० वर्षांनंतर, ब्रिटनमधील सर्वात महत्त्वाच्या रोमन रस्त्यांपैकी रस्त्याचा एक भाग लंडनमधील प्रसिद्ध ‘ओल्ड केंट रोड’ खाली पुरातत्त्वज्ञांना सापडला आहे.पुरातत्त्वज्ञांनी शोधलेला प्राचीन रोमन रस्त्याचा हा भाग ‘वॉटलिंग स्ट्रीट’ म्हणून ओळखला जातो. इ.स. ४३ मध्ये रोमनांनी ‘वॉटलिंग स्ट्रीट’ हा रस्ता तयार केला गेला, जो वेस्ट मिडलँड्सपासून डोव्हरपर्यंत २७६ मैल (४४४ किमी) पसरलेला होता.

वॉटलिंग स्ट्रीट

वॉटलिंग स्ट्रीट हा ब्रिटनमधील सर्वात प्राचीन आणि महत्त्वपूर्ण रोमन रस्त्यांपैकी एक आहे, ज्याला रोमन ब्रिटनच्या वाहतुकीचा मुख्य आधार मानले जात होते. रोमन साम्राज्याच्या काळात याची बांधणी झाली आणि हा रस्ता दक्षिण-पूर्व ब्रिटनला पश्चिम भागाशी जोडत होता.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
police Pune, police at night, Pune, police news,
पुणे : रात्रीत पोलीस असतातच कोठे ? गंभीर घटनांची जबाबदारी घेणार का?
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही

अधिक वाचा: डेन्मार्कमध्ये उत्खननात सापडले ‘वायकिंग्ज’चे ५० सांगाडे; इतिहासावर आणखी प्रकाश पडण्याची आशा! 

इतिहास आणि मार्ग The History of Watling Street

वॉटलिंग स्ट्रीट इ.स. ४३ मध्ये रोमन साम्राज्याच्या आक्रमणानंतर बांधण्यात आला. हा रस्ता डोव्हरच्या बंदरातून सुरू होऊन, ब्रिटनमधील रोमन प्रांतांतील प्रमुख शहरांना जोडत होता. यामध्ये वेरुलॅमियम (आजचे सेंट ऑल्बन्स), विरोकॉनीयम (आजचे व्रॉक्सेटर), आणि डेव्हा (आजचे चेस्टर) ही महत्त्वाची ठिकाणे होती.
रस्त्याची एकूण लांबी सुमारे २७६ मैल होती. रोमन सैन्याची हालचाल, व्यापार आणि प्रशासकीय कामकाजासाठी हा रस्ता उपयोगी ठरला होता. सम्राट हॅड्रियन सारख्या नेत्यांनीही या रस्त्याचा उपयोग केला, इ.स. १२२ मध्ये त्यांनी हॅड्रियन वॉलच्या बांधणीचे आदेश दिले.

A paving stone on Kilburn High Road in London commemorates the route of Watling Street. (The date is incorrect.)
लंडनमधील किलबर्न हाय रोडवरील फरसबंदीचा दगड वॉटलिंग स्ट्रीटच्या मार्गाचे स्मरण करून देतो. (तारीख चुकीची आहे.)-फोटो: विकिपीडिया

हा रस्ता कसा सापडला?

सामान्यतः प्राचीन रोमन रस्ते सरळ असले, तरी राजधानीतून जाणाऱ्या वॉटलिंग स्ट्रीटच्या मार्गाचे पुरावे शोधणे पुरातत्त्वज्ञांसाठी खूप कठीण ठरले होते. हा शोध साउथवर्क बरोच्या हीट नेटवर्कच्या विस्ताराच्या कामादरम्यान लागला, जिथे ५.८ मीटर (१९ फूट) रुंद आणि १.४ मीटर (५ फूट) उंच असा रस्त्याचा भाग सापडला. RPS कन्सल्टिंग लिमिटेडच्या पुरातत्त्व संचालिका ‘गिलियन किंग’ यांनी सांगितले की, या रस्त्याचा शोध “लंडनसाठी रोमन रस्त्यांचा नकाशा पुन्हा आखण्याचे” काम करतो. किंग म्हणाल्या, “हा शोध लंडनमधील पुरातत्त्वीय संशोधनासाठी एक महत्त्वाचा शोध आहे.”

रोमन रस्त्यांची वैशिष्ट्ये: Engineering and Features of Roman Roads

रोमन रस्ते त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्यासाठी आणि टिकाऊपणासाठी ओळखले जात. हे रस्ते सरळ आणि कार्यक्षम डिझाइन केले गेले होते, जे महत्त्वाच्या शहरांना, बंदरांना आणि सैनिकी तळांना जोडत असत. रस्त्यांची बांधणी अनेक थरांमध्ये केली जाई, ज्यात मोठे दगड, खडी, वाळू आणि पक्के पॅव्हिंग स्टोन्स यांचा समावेश असे. रस्त्यावर पाणी साचू नये याची खबरदारी घेतली जाई आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे तयार केली जात. प्रमुख रस्ते पुरेसे रुंद होते. शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये रस्ते जोडणारे साईड पथ आणि क्रॉसवॉकही होते. रोमन रस्त्यांवर माईलस्टोन्स (मैलांच्या खुणा) लावण्यात आले होते, ज्यावर अंतर आणि बांधकाम करणाऱ्या सम्राटाचे नाव असायचे. हे रस्ते केवळ वाहतुकीसाठी नव्हे, तर सैनिकी हालचाली आणि व्यापारी दळणवळणासाठीही महत्त्वाचे होते, त्यामुळे रोमन साम्राज्य विस्तारले आणि टिकलेही, त्यात या रस्त्यांचा मोठा हातभार होता.

अधिक वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुपती बालाजीचे घेतले होते दर्शन; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?

वॉटलिंग स्ट्रीट बद्दल Importance of Watling Street in Roman Britain

इ.स. ४३ मध्ये, रोमन आक्रमणानंतर लगेचच वॉटलिंग स्ट्रीट बांधला गेला आणि तो रोमन ब्रिटनमधील एक महत्त्वाचा मुख्य रस्ता ठरला. हा रस्ता डोव्हरच्या महत्त्वाच्या बंदरापासून सुरू होऊन वेरुलॅमियम (आधुनिक सेंट ऑल्बन्स) मार्गे उत्तर-पश्चिम दिशेने विरोकॉनीयम या रोमन शहर आणि डेव्हा या किल्ल्यापर्यंत पोहोचत असे. हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा होता आणि इ.स. १२२ मध्ये हॅड्रियन सारख्या सम्राटांनी वापरला, तेव्हा त्यांनी इंग्लंड आणि स्कॉटलंड यांना विभक्त करणाऱ्या हॅड्रियन वॉलच्या बांधकामाचे निर्देश दिले. रोमन साम्राज्य कोसळल्यानंतर, अँग्लो-सॅक्सन लोकांनी व्रॉक्सेटरचे नाव वॅटलिंगॅकॅस्टर ठेवले, जे कालपरत्त्वे वॉटलिंग असे झाले. वॉटलिंग स्ट्रीटच्या मजबूत बांधकामामुळे तो मध्ययुगीन वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग झाला आणि नंतर हळूहळू आधुनिक रस्त्यांच्या जाळ्याचा एक भाग बनला.

Story img Loader