राजधानी मॉस्कोमध्ये १६ डिसेंबरच्या पहाटे-पहाटे रशियाचे वरिष्ठ लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल इगोर किरिलॉव यांची हत्या झाली. ज्याला ‘टेक्स्ट बुक किलिंग’ म्हणता येईल, इतक्या नियोजनबद्ध रितीने स्फोट घडविण्यात आला. या हत्येमुळे युक्रेनची गुप्तचर संघटना ‘स्लूझ्बा बेझस्की युक्रेनी’ची (एसबीयू) सध्या जगभरात चर्चा होत आहे. एसबीयूने केलेल्या काही कारवाया इस्रायलच्या ‘मोसाद’लाही मागे सारणाऱ्या ठरू शकतात.

मॉस्कोमध्ये नेमके काय घडले?

१६ डिसेंबरची पहाट… बर्फाच्या रजईत गुरफटून गाठ झोपलेली मॉस्कोमधील ‘रिझान्स्की अव्हेन्यू’ ही उच्चभ्रू वस्ती ६.१२ वाजता जोरदार धमाक्याने खडबडून जागी झाली. लोकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा फुटलेल्या काचा, विटांचे तुकडे, तुटलेला दरवाजा, बर्फावर रक्ताचे थारोळे आणि त्यात पडलेले दोन मृतदेह असे भयानक दृष्य बघायला मिळाले. तपास यंत्रणांनी घटनास्थळाचा ताबा घेतल्यानंतर या हल्ल्यात ठार झालेल्यांची ओळख पटली आणि या स्फोटाचे हादरे क्रेमलिनपर्यंत जाणवले. युक्रेनविरोधी युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे लेफ्ट. जन. किरिलॉव आणि त्यांचा एक सहकारी यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेच्या एक-दोन तास आधी एका स्कूटरवर स्फोटके लादून ती किरिलॉव यांच्या घराबाहेर ठेवण्यात आली होती. ते बाहेर येताच रेडिओ किंवा मोबाईलच्या मदतीने अचूक वेळ साधून त्याचा स्फोट घडविण्यात आला होता. विशेष म्हणजे किरिलॉव यांना युक्रेनमध्ये त्यांच्या अनुपस्थितीत शिक्षा ठोठावल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची हत्या झाली होती.

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?

हे ही वाचा… विश्लेषण : अपेक्षेप्रमाणे अमेरिकेत व्याजदरात कपात, तरी शेअर बाजार, रुपया पडण्याचे काय?

युक्रेनने शिक्षा ठोठावलेले किरिलॉव कोण?

किरिलॉव हे रशियन लष्कराच्या आण्विक, जैविक आणि रासायनिक संरक्षण दलाचे प्रमुख होते. एका अर्थी ज्यांचा रणांगणावरील वापर ‘युद्ध अपराध’ ठरेल अशी अस्त्रे किरिलॉव यांच्या भात्यात होती आणि त्यांनी युक्रेनमध्ये या आयुधांचा वापर केल्याचा संशय आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या मते आपल्या भूमीवर ४ हजार ८०० वेळा बंदी असलेल्या रासायनिक अस्त्रांचा वापर केला गेला असून त्यामुळे किमान २ हजार जवानांना विषबाधा झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमधील चाचण्यांच्या आधारे हा दावा करण्यात आल्यानंतर किरिलॉव यांच्यावर युक्रेनमध्ये खटला भरला गेला आणि त्यांना दोषी मानून शिक्षा ठोठावण्यात आली. ब्रिटननेही किरिलॉव यांच्यावर रासायनिक अस्त्रांच्या वापराचा ठपका ठेवला होता. मात्र युक्रेनमधील निवाड्याच्या दुसऱ्याच दिवशी किरिलॉव यांची हत्या होणे म्हणजे ‘एसबीयू’ची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचे द्योतक मानले जात आहे.

हत्येचा कट अमलात कसा आणला?

रशियातील तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटके लादलेली एक स्कूटर पहाटे चारच्या सुमारास ‘स्रेडा’ या निवासी इमारतीबाहेर पार्क करण्यात आली असावी. किरिलॉव आपल्या मदतनीसासह या स्कूटरजवळ येताच दूरस्थ पद्धतीने रेडिओ किंवा मोबाईलचा वापर करून स्फोट घडविण्यात आला. या हत्येसाठी स्फोटाचे अचूक ‘टायमिंग’ अत्यंत महत्त्वाचे होते, हे स्पष्टच आहे. याचाच अर्थ स्फोट घडविणारी व्यक्ती कुठूनतरी किरिलॉव यांना बघत होती. यासाठी तीन गृहितके मांडली जात आहेत. एकतर जवळच्या एखाद्या इमारतीमधून लक्ष ठेवले गेले असावे किंवा दूरवर मोटार पार्क करून दुर्बिणीच्या सहाय्याने देखरेख सुरू असावी, असा अंदाज आहे. तिसरी शक्यता म्हणजे ‘एसबीयू’ने रशियाच्या यंत्रणेत शिरकाव करून परिसरातील सीसीटीव्ही हॅक केले असावेत. यापैकी काहीही असले, तरी युक्रेनच्या सीमेपासून १ हजार किलोमीटरपेक्षा दूर एवढी बिनतोड कारवाई करून ‘एसबीयू’ने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, हे मात्र निश्चित. पुतिन यांच्या राजवटीवर नाराज असलेल्या स्थानिकांची मोठी मदत युक्रेनच्या गुप्तहेरांना होत असल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे.

‘एसबीयू’चे रशियातील जाळे किती मोठे?

२०२२मध्ये पुतिन यांनी युक्रेनमध्ये सैन्य घुसविल्यानंतर एसबीयूने रशियाच्या भूमीत अनेक हत्या घडवून आणल्या आहेत. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये पुतिन यांचे निकटवर्ती आणि कडवे राष्ट्रवादी नेता अलेक्झांडर डुगिन याची मुलगी दारया हिच्या मोटारीत स्फोट घडविण्यात आला. एप्रिल २०२३मध्ये युद्धवादी ब्लॉगर व्लादलेन तातारस्की सेंट पिटर्सबर्गमधील एका कॅफेत झालेल्या स्फोटात मारला गेला. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये रशियात पळून गेलेले युक्रेनचे माजी खासदार इलिया किवा यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. युद्धाला पाठिंबा देणारे किंवा गद्दार यांच्या हत्या घडविल्यामुळे सततच्या आक्रमणांना तोंड देणाऱ्या युक्रेनच्या जनतेचे मनोबल वाढविण्यासाठी मदत होत असली, तरी काळानुरून ‘एसबीयू’ने आपले धोरण बदलल्याचे सांगितले जात आहे. आता आपल्या देशवासियांच्या हत्येला जबाबदार असलेले रशियाचे लष्करी अधिकारी, उच्चपदस्थ तंत्रज्ञ यांना थेट लक्ष्य करण्याची रणनीती युक्रेनच्या गुप्तचर संघटनेने आखली आहे. किरिलॉव यांची हत्या ही याची सुरुवात असल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा… कैलास मानसरोवर यात्रा अन् सीमा व्यापार पुन्हा सुरू; भारत-चीन संघर्ष मिटणार? ‘या’ सहा मुद्द्यांवर झाले एकमत

ही संघटना ‘मोसाद’पेक्षा घातक आहे का?

गुप्तचर संघटना म्हटले की सर्वांत आधी डोळ्यासमोर येते ती इस्रायलची ‘मोसाद’. अनेक देशांमध्ये जाऊन इस्रायलच्या शत्रूंना संपविण्याच्या मोसादच्या कहाण्या सर्वश्रूत आहेत. यावर अनेक चित्रपटही तयार झाले आहेत. अमेरिकेची ‘सीआयए’देखील अशा कारवायांसाठी प्रसिद्ध आहे. भारताची ‘रिसर्च अँड ॲनालिसिस विंग’ किंवा ‘रॉ’ ही गुप्तचर संघटना कॅनडा-अमेरिकेने केलेल्या आरोपांमुळे सध्या चर्चेत आहे. मात्र फारशी कुणाला माहिती नसलेली ‘एसबीयू’ या सर्वांपेक्षा अधिक धोकादायक कारवाया करीत आहे. युद्ध सुरू असताना शत्रुराष्ट्रातील यंत्रणाही अधिक सावध असताना थेट क्रेमलिनच्या आसपास मोठ्या लष्करी अधिकाऱ्याची नियोजनबद्ध रितीने हत्या करणे सोपी गोष्ट नाही. रशियात ‘एसबीयू’ची पाळेमुळे रशियात कितीतरी खोलवर रुजली असल्याचे स्पष्ट आहे.

amol.paranjpe@expressindia.com

Story img Loader