संजय जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या काही दिवसांमध्ये देशांतील हवाई वाहतूक क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत. ‘गो फर्स्ट एअरलाइन’ कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया सुरू आहे. त्याच वेळी ‘इंडिगो’ आणि ‘एअर इंडिया’ने आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या विमान खरेदीसाठी पावले उचलली आहेत. देशांतर्गत विमान प्रवाशांमध्ये जानेवारी ते मे या पाच महिन्यांत ३६ टक्के एवढी भरभक्कम वाढ नोंदविली गेली आहे. यामुळे हवाई वाहतूक क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी या स्थितीचे वर्णन ‘आकाश जिंकण्याची संधी’ असे केले आहे.

देशांतर्गत वाहतुकीची सद्य:स्थिती काय?

देशांतर्गत हवाई वाहतूक क्षेत्राने यंदा जानेवारी ते मे या पाच महिन्यांत मोठी भरारी घेतली. या कालावधीत देशभरात सहा कोटी ३६ लाख प्रवाशांनी विमान प्रवास केला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवाशांच्या संख्येत तब्बल ३६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गतवर्षी जानेवारी ते मे या कालावधीत देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्या चार कोटी ६७ लाख होती. त्यात यंदा एक कोटी ६९ लाख प्रवाशांची भर पडली. उडान योजनेंतर्गत हवाई मार्गाने अनेक ठिकाणे जोडली गेल्याचा हा परिणाम असल्याचे सकृद्दर्शनी दिसत आहे.

विमान खरेदीमुळे स्पर्धा वाढणार?

‘इंडिगो’ ही देशांतर्गत सेवा देणारी सर्वांत मोठ्या कंपनीने ‘एअरबस’कडून छोट्या आकाराच्या पाचशे विमानांची खरेदी करणार आहे. त्याच वेळी टाटा समूहाकडे मालकी गेलेल्या ‘एअर इंडिया’ने ‘एअरबस’ आणि ‘बोइंग’कडून ४७० विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. म्हणजेच देशातील हवाई वाहतूक कंपन्या आगामी काळात सुमारे एक हजार विमानांची खरेदी करीत आहेत. सध्या देशातील विमान कंपन्यांकडील एकूण विमानांची संख्या ७०० आहे. ही संख्या पुढील दशकभरात दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेचे हे द्योतक आहे. देशातील मध्यमवर्ग हा देशांतर्गत हवाई वाहतूक क्षेत्रातील मागणीच्या वाढीस कारणीभूत ठरत आहे. मध्यमवर्ग आता आंतरराष्ट्रीय प्रवासाकडेही मोठ्या प्रमाणात वळत आहे.

आगामी काळात प्रवाशांमध्ये किती वाढ?

देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या २०३० पर्यंत ३५ कोटींवर जाईल, असा अंदाज आहे. ही संख्या २०१९ मध्ये अवघी १४.४ कोटी होती. त्या वेळी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या ६.४ कोटी होती. ही संख्याही २०३० पर्यंत १६ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. तसेच, देशातील विमानतळांची संख्या पुढील पाच वर्षांत दोनशेवर जाईल. सध्या देशात १५० विमानतळे आहेत. सरकारकडून दुर्गम भाग हवाई मार्गाने जोडण्यावर भर दिला जात आहे. यामुळे आगामी काळात हवाई वाहतूक क्षेत्रातील वाढ कायम राहणार आहे.

विमानांच्या भाड्यांचे गणित कसे जुळणार?

‘गो फर्स्ट एअरलाइन’ ही गेल्या ११ वर्षांत बुडालेली तिसरी विमान कंपनी ठरली आहे. कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर भाड्याने विमान घेण्याचा सर्वाधिक ताण येत आहे. ‘गो फर्स्ट’च्या बाबतीतही हेच घडले आहे. ‘स्पाइसजेट’ या कंपनीसमोरही हीच समस्या आहे. विमाने भाड्याने देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या प्रसंगी देणी न फेडल्यास विमान कंपन्यांची मालमत्ता ताब्यात घेतात. भारताचा विचार करता २०१८ ते २०२२ या कालावधीत विमान कंपन्यांनी खरेदी केलेल्या विमानांपैकी ७५ टक्के विमानांची विक्री करण्यात आली. ही विक्री विमाने भाड्याने देणाऱ्या कंपन्यांना करण्यात आली. विमान कंपन्या नंतर हीच विमाने भाड्याने घेतात. विमान खरेदीत अडकलेले भांडवल मोकळे करण्याचा यामागे विमान कंपन्यांचा हेतू असतो. जागतिक पातळीवर विमाने विकून पुन्हा भाड्याने घेण्याचे प्रमाण ३५ टक्के आहे.

हवाई वाहतूक क्षेत्रात कुणाची मक्तेदारी?

चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत हवाई वाहतुकीत इंडिगो कंपनीचा सर्वाधिक ५७.३ टक्के हिस्सा आहे. इंडिगोने जानेवारी ते मे या कालावधीत तीन कोटी ६४ लाख प्रवाशांची वाहतूक केली. देशांतर्गत हवाई वाहतुकीत एअर इंडियाचा ९, विस्तारा ८.८, एअर एशिया ७.५, स्पाइसजेट ६.४, गो फर्स्ट ६, आकासा एअर ३.६, अलायन्स एअरचा १.२ टक्के हिस्सा आहे. इंडिगो आणि एअर इंडिया या हवाई वाहतूक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे या दोन कंपन्यांची वाटचाल वेगाने सुरू आहे. त्याच वेळी इतरही अनेक छोट्या कंपन्या या क्षेत्रात कार्यरत असल्या तरी गो फर्स्टच्या संकटानंतर त्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. छोट्या कंपन्यांसमोर आर्थिक अडचणी असल्याने त्या दिवाळखोरीच्याच मार्गाने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये इंडिगो, एअर इंडिया यांसारख्या बड्या कंपन्यांचीच मक्तेदारी कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.

sanjay.jadhav@expressindia.com