Neolithic farmer’s house 8,000 years old: शेतकरी हा कुठल्याही समाजाचा पायाच असतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. कालखंड कुठलाही असो अन्न ही न बदलणारी गरज आहे. म्हणूनच शेतकरी हा अन्नदाता ठरतो. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यावर त्याने शेती कशी केली असावी हा नेहमीच औत्सुकत्याचा विषय ठरलेला आहे. किंबहुना प्रत्येक देश याच सत्याच्या मुळाशी जाण्याचा नेहमीच प्रत्यत्न करतो. आशिया खंडातील हवामान तसेच येथील कृषिप्रधान संस्कृती आपल्याला भूतकाळाविषयी बरंच काही सांगून जाते. परंतु ज्या वेळी आपण युरोपियन देशांचा विचार करतो त्यावेळी मात्र चित्र बदलते. तेथील शुष्क वातावरण आणि भटके जीवन हे आपल्या नजरेसमोर येते. शिवाय मध्ययुगीन कालखंडाच्या उत्तरार्धात त्यांच्या वसाहतवादी धोरणांमुळे युरोपीय म्हणजे आशियायी देशांना लुटणारे लुटारूच अशीच त्यांची प्रतिमा तयार झाली होती. परंतु त्या प्रांतातील स्थिर शेतीचा इतिहास हा चक्क ८००० वर्षे जुना असल्याचे पुरातत्त्व अभ्यासकांनी आता सिद्ध केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अधिक वाचा: History of Ikat: इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये भारतीय कापड; काय सांगते इकतची प्राचीन परंपरा?

स्थिर जीवनशैलीच्या प्रारंभाचे पुरावे ८,००० वर्षांपूर्वीचे

ऑस्ट्रियन अकॅडमी ऑफ सायन्सेस (ÖAW) यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रो-सर्बियन पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या टीमने Svinjarička Čuka-सविंजारीका चूका येथे सुमारे ८,००० वर्षांपूर्वी बांधलेल्या आयताकृती घराचे अवशेष शोधले आहेत. या नवीन शोधांमुळे आधी मांडलेल्या स्थिर जीवनशैलीच्या विकासाबद्दलच्या विद्यमान मॉडेलमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचे मत ÖAWच्या संचालक बारबरा होरेज यांनी मांडले आहे. या घराचे बांधकाम लाकडाच्या मदतीने करण्यात आले होते. या नव्या अवशेषांमुळे प्राचीन कृषी संस्कृतीच्या बांधकाम तंत्र आणि जीवनशैलीबद्दल महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. या वास्तूची काही प्रमाणात पडझड झालेली आहे, तसेच आगीमुळेही घराचे नुकसान झालेले आहे. या पडझडीमुळे घराचे मजले एकमेकांवर कोसळले आहेत आणि घरातल्या वस्तू..भांडी ..अंगण त्याखाली झाकोळले गेले होते असे वर्णन संशोधक बारबरा होरेज केले आहे. या घरातील अन्न-धान्याचा साठा करण्याचे कोठार विशेष होते असाही उल्लेख त्यांनी केला.

नवीन संशोधन पूर्वीच्या गृहितकांना आव्हान देणारे

बारबरा होरेज यांच्या मते, हा शोध आधीच्या प्रस्थापित गृहितकांना आव्हान देणारा आहे. पूर्वी असे मानले जात होते की, पहिल्या युरोपीय वसाहती भटक्या किंवा हंगामी स्थिर (तात्पुरत्या) अशा होत्या. पूर्वी झालेल्या उत्खननात मोठ्या प्रमाणात आढळलेल्या खड्ड्यांना तात्पुरत्या झोपड्यांचे अवशेष मानले जात होते. होरेज यांच्या मते, लहान भटके गट किंवा फक्त हंगामी स्थिर गटांऐवजी बाल्कनमधील निओलिथिक समाजाने धान्य व अन्न साठवण्यासाठी सुविधा असलेली स्थिर घरे बांधली होती. सविंजारीका चूका येथील उत्खनन २०१८ पासून सुरू आहे. या आधी त्यांनी प्रारंभिक व मध्य पाषाण युगातील अनेक वस्तींच्या टप्प्यांचा शोध लावला आहे. ज्यांचा संबंध स्टार्चेवो संस्कृतीशी होता.

अधिक वाचा: Snake Species Named After Leonardo DiCaprio: टायटॅनिकच्या हिरोचं नाव भारतीय सापाला; काय आहे या दोघांमध्ये संबंध? 

बाल्कनमधील निओलिथिक समुदायाचे मूळ

ही संस्कृती बाल्कनमधील सर्वात प्राचीन निओलिथिक समुदायांचे प्रतिनिधित्व करते आणि अनातोलियातून युरोपमध्ये शेतीचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सध्याचे उत्खनन काही नवीन प्रश्नही उपस्थित करते : या गटांचा भौगोलिक-सांस्कृतिक उगम काय आहे?, आणि स्थानिक शिकार करणाऱ्या समाजांशी त्यांचा परस्परसंवाद काय होता?, हे प्रश्न अजूनही उत्तराच्या प्रतिक्षेत आहेत. त्यावर आता पुढील शोध घेतला जात आहे, असे होरेज यांनी सांगितले. या शोधांचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी संशोधक सूक्ष्म- पुरातत्त्वीय पद्धतींचा वापर करत आहेत, जसे की गाळाचा अभ्यास, वनस्पती आणि प्राणी अवशेषांचा अभ्यास, तसेच मातीचे रासायनिक विश्लेषण आदींचा यात समावेश आहे. सूक्ष्म-पुरातत्त्वीय विश्लेषणातून या प्राचीन घरांच्या वापराविषयी किंवा मानव आणि प्राण्यांच्या सहजीवनाविषयी नवीन माहिती मिळण्यास मदत झाली आहे. ही संस्कृती सुमारे ८,००० वर्षांपूर्वी युरोपमध्ये निओलिथिक काळात विकसित झाली, असे पुरातत्त्वशास्त्रज्ञ सांगतात.