हमासच्या म्होरक्यांच्या शोधात इस्रायलने राफा शहराची मोर्चेबंदी मोठ्या प्रमाणात केली होती. येथील हजारो जनता हालात खितपत पडलेली असतानाही इस्रायलच्या हल्ल्यांची तीव्रता कमी होत नव्हती. हमासचे म्होरके पकडल्याशिवाय आणि त्यांच्या ताब्यातील ओलिसांची सुटका झाल्याशिवाय कारवाई  थांबणार नाही ही इस्रायलची भूमिका आहे. मात्र रविवारी हमासने अनेक महिन्यांमध्ये प्रथमच इस्रायलची राजधानी तेल अवीववर रॉकेट्सचा मारा करून या संघर्षास नव्या वळणावर नेले आहे. त्यातून संघर्ष अधिक भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

झाले काय?

इस्रायलची राजधानी तेल अवीव शहरात रविवारी दुपारी क्षेपणास्त्र हल्ल्यांचा इशारा देणारे भोंगे वाजू लागले. गाझाच्या राफा शहरातून तेल अवीवच्या दिशेने आठ रॉकेट्स डागण्यात आल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. या हल्ल्यामध्ये दोन महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हमासचे सशस्त्र दल कासम ब्रिगेड्सने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. राफामधील इस्रायली अत्याचारांविरोधात हे कृत्य केल्याचे कासम ब्रिगेड्सने म्हटले आहे. 

Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

हेही वाचा >>>मोदी सरकारची १० वर्षे; भारतीय अर्थव्यवस्थेनं नेमकं काय कमावलं अन् गमावलं?

इस्रायलने प्रत्युत्तर दिले काय?

हल्ल्यांची तीव्रता फार नव्हती. पण जानेवारीनंतर प्रथमच इस्रायलच्या दिशेने रॉकेटहल्ला झाला आहे. शिवाय यावेळी तेल अवीवसारखे राजधानीचे शहर लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे हमास अजूनही प्रहाराची क्षमता बाळगून असल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्रायलने रविवारी रात्री उशिरापर्यंत प्रत्युत्तराची भाषा केली नव्हती. मात्र राफातील कारवाई या निमित्ताने जारीच ठेवण्याच्या इस्रायली इराद्यांना बळकटी मिळणार आहे. 

राफात सध्या काय स्थिती?

राफा शहरामध्ये सध्या ८ लाख पॅलेस्टिनी पळून आले असल्याचा अंदाज आहे. इजिप्त सीमेवरून शहरात येणारा मदतीचा ओघ खंडित करण्यास इस्रायलने सुरुवात केली आहे. याबद्दल अमेरिका, अनेक युरोपिय राष्ट्रे, संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी इस्रायलवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय न्याय लवादाने (आयसीजे) शुक्रवारीच इस्रायलला राफातील कारवाई थांबवण्याचा इशारा दिला होता. पण इस्रायल तसे करण्याची शक्यता कमी आहे. 

हेही वाचा >>>यंदा भारतीयांनी गाजवला कान फिल्म फेस्टिवल; चित्रपटसृष्टीत याला इतके महत्त्व का? याची सुरुवात कशी झाली?

इस्रायलला काय हवे आहे?

७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांच्या सूत्रधारांना पकडणे आणि त्यांच्यावर खटला चालवणे हे इस्रायलचे मुख्य उद्दिष्ट आहे. याशिवाय ओलिस नेलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका हे आणखी एक उद्दिष्ट आहे. जोवर हमासचे म्होरके सापडत नाहीत आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा मोडून पडत नाही, तोवर हल्ले थांबणार नाहीत असे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी अनेक वेळा निक्षून सांगितले आहे. गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांनी हमासच्या नेत्यांना दडवून ठेवणे थांबवावे, कारवाई लगेच थांबवतो असेही इस्रायलने म्हटले आहे. 

हमासची मागणी काय?

हमासला शस्त्रविराम हवा आहे. ओलिसांची आम्ही सुटका करतो, पण त्या बदल्यात इस्रायली तुरुंगातील आमच्या साथीदारांची सुटकाही झाली पाहिजे, असे हमासचे म्हणणे आहे. हमास आणि इस्रायल यांच्यात गेल्या काही महिन्यांमध्ये इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीने शस्त्रविरामाबाबत वाटाघाटी झाल्या. ओलिसांना त्वरित सोडावे, अन्यथा शस्त्रविराम असंभव असल्याची इस्रायलची भूमिका आहे. पण तसे केल्यास आपल्याला त्वरित संपवले जाईल, अशी भीती हमासच्या नेत्यांना वाटते. यासाठीच अधिकाधिक काळ ओलिसांना ताब्यात ठेवून वाटाघाटींमध्ये आपल्याला हव्या त्या मागण्या करून घ्यायच्या अशी हमासची व्यूहरचना आहे. मात्र या साठमारीत सर्वसामान्य पॅलेस्टिनींची फरपट होत आहे. 

हमासला शस्त्रे पुरवते कोण?

रविवारच्या हल्ल्यानंतर हमासची प्रहारक्षमता शाबूत असल्याचे सिद्ध झाले. हमासने डागलेली बहुतेक रॉकेट्स इस्रायलच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने नष्ट केली. हमासप्रमाणेच इस्रायलच्या उत्तरेकडील लेबनॉनमधून हेझबोला बंडखोरांकडूनही वरचेवर रॉकेट हल्ले होत असतात. इस्रायलच्या मते हमास आणि हेझबोलाला शस्त्रपुरवठा इराणकडून होतो. यामुळेच इराणला इस्रायल शत्रू क्रमांक एक मानतो. हमास, हेझबोला आणि हुथी या तीन ‘एच’ना इराणकडून निधी आणि शस्त्रपुरवठा होतो असे पाश्चिमात्य आणि इस्रायली विश्लेषक मानतात. सन २०२०मधील अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या एका अहवालानुसार, पॅलेस्टिनी बंडखोर गटांना इराणकडून वर्षाकाठी १० कोटी डॉलरची मदत दिली जाते. तर २०२३मध्ये इस्रायली सुरक्षा विभागाने मांडलेल्या अहवालात, हमासला इराणकडून होणारी वार्षिक मदत ३५ कोटी डॉलरपर्यंत वाढल्याचे म्हटले आहे. 

कासम ब्रिगेड्स काय आहे?

गतवर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये झालेले हल्ले कासम ब्रिगेड्स या हमासच्या सशस्त्र दलाने घडवून आणले. १९९२पासून या दलाची उभारणी करण्यात आली आहे. १९८७मध्ये गाझा पट्टीत हमासचा उदय झाला. तिचे अस्तित्व आक्रमक मार्गांनी पॅलेस्टिनींच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी उभे राहिले. कासम ब्रिगेड्स हे हमासचे सशस्त्र दल आहे. ब्रिटिशांविरुद्ध सीरिया आणि पॅलेस्टाइनमध्ये लढा देणारा सीरियन क्रांतिकारक इझ्झेदिन अल कासम याच्या नावाने हे दल स्थापण्यात आले. १९३५मध्ये कासम मारला गेला, पण त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन पॅलेस्टाइनमध्ये १९३५-३६ या काळात अरब चळवळ उभी राहिली. सीआयए या अमेरिकी गुप्तहेर संघटनेच्या मते, कासम ब्रिगेड्सकडे २० ते २५ हजारांची प्रशिक्षित फौज आहे. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे आणि उत्तम प्रतीची रॉकेट्स असल्याचे सांगितले जाते. इराणकडून त्यांना प्रशिक्षण मिळते, तसेच निधी आणि शस्त्रपुरवठाही होतो. इराण हमासला निधी पुरवतो पण कासम ब्रिगेड्सला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतो.