सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ नाही. पण येथे वाघाचे अस्तित्व राहिले आहे. ते कायमस्वरुपी असावे यासाठी आता राज्याच्या वनखात्याने पावले उचलली आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाने त्यावर शिक्कामोर्तब केले असून लवकरच या व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांना व्याघ्रदर्शन होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आठ वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात सोडण्याची परवानगी वनखात्याने मागितल्यानंतर नुकतेच प्राधीकरणाने ही परवानगी दिली आहे. या प्रकल्पासाठी प्राधीकरणाकडून १०.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

सह्याद्रीत यापूर्वी वाघांचे अस्तित्व होते का? 

भारतीय वन्यजीव संस्थेने काही वर्षांपूर्वी सह्याद्रीत विष्ठेच्या ४४ नमुन्यांचे विश्लेषण केले होते. त्यातील सात नमुने हे वाघांचे होते. मात्र, हे सातही वाघ स्थलांतरित होते. याशिवाय कॅमेरा ट्रॅपमध्येही येथे वाघाचे छायाचित्र आले आहे. २०१४च्या गणनेत सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत. मात्र, येथे वाघ कधीच स्थिरावला नाही.

tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
forest fire cases
राज्यात तब्बल १६ हजारांहून अधिकवेळा जंगलाला आग
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
Chandrapur forest area loksatta news
माजी वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जंगल घटले
Tipeshwar Wildlife Sanctuary yavatmal
टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचा विक्रमच! आधी ३२०० किलोमीटर, आता ५०० किलोमीटर
Image Of Tiger.
Tiger Travel : टी-२२ च्या बछड्याचा ५०० किलोमीटर प्रवास… यवतमाळचा वाघ धाराशिव, सोलापूरात कसा आला?

हेही वाचा – विश्लेषण : ससून अमली पदार्थ प्रकरण काय आहे? तस्कर ललित पाटीलचे नेमके काय झाले?

वाघ का स्थिरावत नाही?

विदर्भातील पाच व्याघ्रप्रकल्पांच्या तुलनेत या व्याघ्रप्रकल्पासमोर नैसर्गिक आव्हानांसोबतच व्यवस्थापनाचे मोठे आव्हान आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ सामावून घेण्याची क्षमता असतानाही येथे वाघ स्थिरावू शकले नाहीत. कोयना आणि चांदोली या दोन अभयारण्यांचा समावेश सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आहे. या व्याघ्रप्रकल्पात वाघ स्थिरावण्याऐवजी येतात आणि जातात. साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत याठिकाणी वाघांच्या हालचाली दिसून येतात. नैसर्गिक संरचना आणि अपुरे मनुष्यबळ हेदेखील वाघ न स्थिरावण्यामागील एक कारण आहे.

आव्हाने काय?

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात येणारे वाघ हे विदर्भातील म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. या दोन्ही प्रदेशातील भौगोलिक रचनेत (लँडस्केप) मोठी तफावत आहे. विदर्भातील लँडस्केप सपाट आहे आणि सह्याद्रीचा परिसर डोंगराळ म्हणजेच उंचसखल आहे. त्यामुळे सपाट प्रदेशातील वाघ या डोंगराळ प्रदेशात किती स्थिरावतील, याबाबत शंका आहे. याठिकाणी बंदीपूर, पेरियार, बद्रा याठिकाणचे वाघ स्थिरावण्याची शक्यता अधिक आहे.

तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी का?

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ स्थिरावण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. वाघाचा अधिवास आणि वाढीसाठी पोषक वातावरण तसेच खाद्यान्न याकडे लक्ष दिले जात आहे. मुळात या भागात वाघ स्थिरावत नाही कारण तृणभक्षक प्राण्यांची संख्या कमी आहे. ही संख्या कमी असण्यामागचे कारण म्हणजे या परिसरात गवताळ प्रदेश तुकड्यांमध्ये विखुरला आहे. सांबर, भेकर, चितळ हे वाघाचे खाद्य आहे आणि त्यासाठी येथे गवताळ क्षेत्र तयार केले जात आहे.

विशेष व्याघ्र संरक्षण दल कशासाठी?

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आव्हाने अधिक आहेत आणि आता वाघांचे पुनर्वसन होणार असल्यामुळे विशेष व्याघ्र संरक्षण दल आवश्यक आहे. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी मंजुरीदेखील दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे गेला, पण केंद्राने त्यावर कोणताही निर्णय दिला नाही. या व्याघ्रप्रकल्पात वाघ येणार असतील, पण तृणभक्षी प्राणी कमी असल्याने ते व्याघ्रप्रकल्पाबाहेर पडतील. परिणामी मानवी वस्तीत वाघ गेल्यास संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी हे दल आवश्यक आहे.

दीर्घकालीन धोरण काय?

सह्याद्रीत वाघ परत आणण्याच्या दृष्टीने भारतीय वन्यजीव संस्था, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरण आणि महाराष्ट्र वनविभागाच्यावतीने दीर्घकालीन धाेरण राबवण्यात येत आहे. व्याघ्र अधिवास आणि व्याघ्रवृद्धीच्या दृष्टीने मूल्यांकन करण्यात येत आहे. व्याघ्रप्रकल्पासभोवताल संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यामुळे अधिवासाची संलग्नता वाढवता येऊ शकते, हेही लक्षात आले आहे. तृणभक्षी प्राण्यांच्या स्थलांतरणासाठी संभाव्य क्षेत्र ओळखून झाेलंबी येथे २० चितळ आणि ३० सांबर यांच्या स्थलांतरणाचा प्रस्ताव आहे. 

हेही वाचा – विश्लेषण : मुंबईत समूह पुनर्विकास प्रकल्प मार्गी का लागत नाहीत? नेमक्या अडचणी कोणत्या?

या प्रकल्पाच्या चमूत कोण?

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता हे या प्रकल्पाचे अध्यक्ष तर प्रकल्प समन्वयक म्हणून अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पश्चिम) वन्यजीव विभाग डॉ. व्ही. क्लेमेंट बेन असणार आहेत. या प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक व डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ के. रमेश, सहअन्वेषक शास्त्रज्ञ डॉ. नावेंदू पागे, डॉ. प्रशांत महाजन असतील. 

कॉरिडॉर का महत्त्वाचा?

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या लँडस्केपमध्ये वाघ आणि इतर मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या अधिवासासाठी कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा आहे. काली व्याघ्र प्रकल्प आणि लगतच्या भागात प्रजननक्षम वाघांची संख्या असल्याने या कॉरिडॉरमध्ये उत्तरेकडे वाघांची हालचाल दिसून येते. कर्नाटकातील काली व्याघ्रप्रकल्पातील वाघ काही काळासाठी या पट्ट्यात येतात, पण ते फार काळ थांबत नाहीत. या व्याघ्रप्रकल्पालगत बॉक्साईट आणि इतर खाणी आहेत. या खाणींमुळे कॉरिडॉर खंडित होण्याची भीती आहे.

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader