स्त्री किंवा पुरुष हीच लैंगिक ओळख असते, असा अनेकांचा आजही समज आहे. मात्र, आता तृतीयपंथीनाही समाजात एक ओळख मिळू लागली आहे. मुख्य म्हणजे जसजसा काळ बदलत आहे, तसतसा लोकांचा लैंगिक कलही बदलताना दिसून येत आहे. आज समाजात स्त्री-पुरुष व्यतिरिक्त LGBTQ+ समाजालाही मान्यता मिळत आहेत. ‘L’ म्हणजे लेस्बियन, ‘G’ म्हणजे गे, ‘B’ म्हणजे बायसेक्शुअल, T म्हणजे ट्रान्सजेंडर आणि ‘Q’ म्हणजे क्वीर असा याचा अर्थ होतो. मात्र, आता इंटरनेटवर अॅब्रोसेक्शुअलिटीच्या चर्चेने जोर धरला आहे. काय आहे अॅब्रोसेक्शुअलिटी? या नवीन लैंगिक प्रकाराची इंटरनेटवर इतकी चर्चा का होत आहे? जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ब्रिटनमधील ३० वर्षीय एमा फ्लिंट या महिलेला २०२० मध्ये पहिल्यांदा आपण अॅब्रोसेक्शुअल असल्याचे कळले. तिने एका वृत्तपत्रात तिचा अनुभव सांगितला. ती म्हणाली LGBTQ+ समुदायास सहकार्य करणार्या अमेरिकेतील निर्मात्या, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या झो स्टोलर यांनी लिहिलेल्या एका पोस्टमधून अॅब्रोसेक्शुअल या शब्दाचा शोध लागला आणि आपण अॅब्रोसेक्शुअल असल्याची गहन जाणीव झाली. अनेक अॅब्रोसेक्शुअल व्यक्तींनी फ्लिंटची पोस्ट शेअर केली. आता इंटरनेटवर या नवीन लैंगिक ओळखीविषयी चर्चा करण्यात येत आहे आणि अॅब्रोसेक्शुअलिटी हा ट्रेंड सुरू आहे.
हेही वाचा : चष्म्याचा नंबर घालवणारा जादुई आयड्रॉप? काय आहे ‘PresVu Eye Drop’?
अॅब्रोसेक्शुअलिटी म्हणजे काय?
अॅब्रोसेक्शुअलिटी हा लैंगिक ओळखीचाच एक प्रकार आहे. हा प्रकार तुलनेने नवीन असून अनेक लोकांना याविषयी माहीत नाही. अॅब्रोसेक्शुअलिटीमध्ये व्यक्तीच्या लैंगिक आकर्षणाचे प्रमाण आयुष्यभर कमी-जास्त होत असते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास अॅब्रोसेक्शुअल व्यक्तींसाठी वेगवेगळ्या लिंगांबद्दलचे त्यांचे लैंगिक आकर्षण कालांतराने बदलू शकते. कधीकधी त्यांना एका लिंगाबद्दल आकर्षण वाटू शकते, तर इतर वेळी त्यांचे त्याच लिंगाविषयीचे आकर्षण कमी होते किंवा कायमस्वरूपी संपते. हे बदल वेगवेगळ्या काळात घडू शकतात. काही व्यक्तींमध्ये दररोज हे बदल दिसून येतात, तर काहींमध्ये साप्ताहिक किंवा काही महिन्यांनी हे बदल दिसून येतात. अॅब्रोसेक्शुअल लोकांना एकापेक्षा जास्त लिंगांबद्दल आकर्षण वाटू शकते, परंतु किती दिवस त्यांना एका व्यक्तीविषयी आकर्षण वाटेल, हे सांगणे कठीण आहे.
लैंगिकतेला बऱ्याचदा भिन्नलिंगी, समलैंगिक, उभयलिंगी किंवा अलैंगिक यांसारखे लेबल देण्यात आले आहेत. परंतु, अॅब्रोसेक्शुअलिटी ही एक वेगळीच लैंगिक ओळख आहे. अॅब्रोसेक्शुअल व्यक्तींचा समावेश वरील कोणत्याही लैंगिक प्रकारात येत नाही. कारण अॅब्रोसेक्शुअल व्यक्तीला एक दिवस स्त्री आवडू शकते, तर दुसर्या दिवशी त्यांना पुरुष आवडू लागतो. इतकेच नव्हे तर यात सर्व प्रकारच्या लैंगिक गटाबद्दल आकर्षण वाटू शकते. समजा तुम्ही पुरुष असाल आणि तुम्हाला एखादी स्त्री आवडत असेल तर काही काळानंतर स्त्रीविषयीची भावना कमी होऊन तुम्हाला पुरुषही आवडू शकतात. अॅब्रोसेक्शुअलिटीवर ‘टिकटॉक’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “हा अक्षरशः मी आहे आणि मला पूर्वी वाटले की कदाचित मी एकटाच असा आहे.”
जनरेशन झेड आणि अॅब्रोसेक्शुअलिटी
अॅब्रोसेक्शुअल व्यक्ती वेगवेगळ्या वयोगटांमध्ये आढळून येतात. परंतु, सामान्यतः तरुण पिढ्यांमध्ये, विशेषतः जनरेशन झेड (१९९७-२०१२) मध्ये याचे प्रमाण अधिक आहे. या वयोगटात ही अभिव्यती उघडपणे मान्य करणार्यांचे प्रमाण जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. ही एक अशी पिढी आहे, ज्याने लैंगिकता आणि लिंग ओळखीबद्दलच्या सर्व चर्चा, वादविवाद पाहिले आहेत. या वयोगटातील व्यक्तींमध्ये विविध लैंगिक ओळख खुलेपणाने स्वीकारण्याची जागृती वाढत आहे, त्यामुळे त्यांच्यातील हे प्रमाण जास्त असल्याचे मानले जात आहे. मिलेनियल्सचा (१९८१ ते १९९६) देखील यात काही प्रमाणात समावेश असल्याचे आढळून येते.
हेही वाचा : बेपीकोलंबो मोहिमेमुळे उलगडणार सूर्यमालेतील ‘या’ ग्रहाचे रहस्य; काय आहे या मोहिमेचं महत्त्व?
‘अॅब्रोसेक्शुअल’ समोरील आव्हाने
ॲब्रोसेक्शुअल्सना अनेकदा डेटिंग आणि नातेसंबंधांमध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. कारण त्यांचे आकर्षण सतत बदलत असते. काहींना दीर्घकालीन नातेसंबंधात अडकून पडणे कठीण वाटू शकते. त्यांना भीती वाटते की, त्यांच्या आकर्षणात बदल झाल्यामुळे त्यांच्या जोडीदाराशी असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. आकर्षणाच्या चढ उताराच्या या स्वरूपामुळे लोक गोंधळात पडू शकतात. मित्र-मैत्रीण, कुटुंबीय, जोडीदार या नात्यांमध्ये यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.