बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा नेहमी त्याच्या लक्षवेधी कपड्यांसाठी ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून रणवीर हा सातत्याने चर्चेत आहे. रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी न्यूड फोटोशूट केले आहे. ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी रणवीरने हे फोटोशूट केले आहे. त्याच्या या फोटोशूटमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्याचे हे फोटो पाहून अनेकजण त्याला ट्रोल करत आहे. तर काही जण त्याचे समर्थन करताना दिसत आहे. या सर्व प्रकरणानंतर रणवीर सिंगच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
पण फक्त रणवीर सिंग नव्हे तर अनेक कलाकारांनी यापूर्वी न्यूड फोटोशूट केले आहे. त्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. पण यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहे. जर अशाप्रकारे कोणत्या कलाकाराने न्यूड फोटोशूट केले आणि त्याबद्दल तक्रार दाखल केली तर मग त्याचे पुढे काय होते? भारतीय कायद्यात याबद्दल शिक्षेच्या काय तरतुदी आहेत? या संबंधित व्यक्तीला कोणत्या कायद्यांतर्गत शिक्षा केली जाते? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
नेमकं प्रकरण काय?
रणवीर सिंग हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. रणवीरने शनिवारी २३ जुलै रोजी सोशल मीडियावर एका फोटोशूटचे फोटो शेअर केले. या फोटोतील काही फोटोत रणवीरच्या अंगावर एकही वस्त्र नसल्याचे दिसले. तर काही फोटोंमध्ये रणवीरने केवळ अंर्तवर्स्त्र परिधान केले होते. या नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसला. यात त्याने बोल्ड पोजही दिल्या होत्या. रणवीर सिंगने केलेले हे न्यूड फोटोशूट ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी केले होते. त्याच्या या फोटोवरुन अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर काहींनी त्याचे समर्थनही केले.
यानंतर रणवीर सिंगच्या विरोधात दोन ठिकाणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. चेंबूर परिसरातील एका सामाजिक संस्थेने आणि ठाण्यातील एक वकील वेदिका चौबे यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. यात एका तक्रारदाराने भारतीय संस्कृतीची पंरपरा लक्षात घेता अशा छायाचित्रामुळे महिलांसह सर्वाच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप केला आह़े. तर दुसऱ्या तक्रारदाराने म्हटले की, रणवीर हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे चित्रपट पाहून तरुण पिढी प्रोत्साहित होते. पण त्याने पोस्ट केलेले हे फोटो फार अश्लील आहेत आणि केवळ पैशाच्या लालसेपोटी त्यांनी हे केल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी. दरम्यान या दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी रणवीर सिंहविरोधात अश्लीलता पसरवल्या प्रकरणी कलमांखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रणवीर सिंगविरोधात भादंवि कलम २९२, २९३, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला़ आहे. रणवीरवर ज्या कलमांतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यात नक्की काय तरतुदी आहेत? यात किती शिक्षा होऊ शकते? याबद्दल जाणून घेऊया.
- कलम २९४
“कोणत्याही अश्लील कृतींमुळे इतरांना त्रास होत असेल. तर, भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ अंतर्गत हा फौजदारी गुन्हा आहे. भारतातील अश्लीलतेविरोधातील कायद्यात असे म्हटले आहे की जर कोणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केले तर तो गुन्हा मानला जातो. भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ मध्ये असे म्हटले आहे की अश्लील कृत्य करणे, अश्लील गाणी गाणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द उच्चारणे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होईल हा गुन्हा आहे. या प्रकरणी आरोपीला तीन महिन्यांचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते.
- कलम २९२
अश्लील पुस्तके, पत्रिका, चित्रे, पेटींग, रेखाचित्रे विकणे, प्रसारित करणे हा गुन्हा आहे. पण हे कलम लोकांच्या हितासाठी तयार करण्यात आलेले विज्ञान, साहित्य, कला किंवा काही शिकण्यासाठी एखादे पुस्तक तयार केले असेल अशा परिस्थितीत हा कायदा लागू होत नाही. या कलमांतर्गत आरोपीला पहिल्यांदा दोषी ठरविल्यास त्याला दोन वर्षांपर्यंत कारावास आणि २ हजार रुपये दंड होऊ शकतो. तर दुसऱ्या वर्षी दोषी ठरवल्यास पाच वर्षांचा कारावास आणि ५ हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
- कलम ५०९
स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार करणे, हावभाव किंवा कृती करणे हा कायद्यांतर्गत गुन्हा आहे. जर आरोप सिद्ध झाल्यास ३ वर्षापर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो.
- आयटी कायदा कलम ६७ (ए)
सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे अश्लील साहित्य पोस्ट करणे हे आयटी कायद्याच्या कलम ६७ (ए) नुसार गुन्हा आहे. यात आरोपीला ५ वर्षांपर्यंतचा कारावास किंवा १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.
रणवीर सिंगवरील आरोपांवर ज्येष्ठ वकील नीती प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, “रणवीर सिंगला त्याचे हे फोटो प्रसिद्ध करायचे नव्हते. हे मीडियाने केले आहे आणि जर रणवीरने स्वतः हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असेल तर तो गुन्हा ठरत नाही. कारण ते फोटो पाहण्यासाठी त्याने कोणावरही जबरदस्ती केलेली नाही. जर कोणाला कलेचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्याने खजुराहो मंदिरात जावे.” तर ज्येष्ठ वकील अमित देसाई म्हणतात, “कपडे परिधान न करता फोटो पोस्ट करणे हे अश्लीलता कायद्याच्या कक्षेत येऊ नये. नग्नता ही अश्लील नाही आणि IPC च्या कलम २९२ अंतर्गत त्याने कोणत्याही वाईट हेतून ते प्रकाशित केलेले आहे, असे दिसत नाही. त्यात कोणाचंही मन दुखावले जावे असा त्याचा हेतू नव्हता.”
दरम्यान यापूर्वीही सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्यांवर आणि मॉडेलवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याआधीही अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्यांवर असे आरोप झाले असून बहुतांश प्रकरणांमध्ये त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यात पूजा भट्ट, विद्या बालन, ट्विंकल खन्ना, मल्लिका शेरावत, शिल्पा शेट्टी, रीमा सेन, मधू सप्रे आणि मिलिंद सोमन यांच्या नावाचा समावेश आहे.