Hitler dreamt of a ‘people’s car’: पोर्शच्या १९३० च्या दशकातील डिझाइनने ‘लोकांचे वाहन’ (सामान्य माणसाची कार) किंवा फोक्सवॅगनची संकल्पना तयार केली, या वाहनाने लाखो लोकांना भुरळ घातली. ही कार टिकाऊ, किफायतशीर आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखली गेली. फेब्रुवारी १९३८ साली बर्लिन ऑटो शोमध्ये हिटलरने या कारचा प्रोटोटाइप सादर केला होता. फोक्सवॅगनच्या ८७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जर्मनीच्या ऑटोमोटिव्ह वारशाचा मुख्य आधार असलेल्या या कंपनीने तीन स्थानिक कारखाने बंद करण्याचा विचार आता केला आहे. पर्यायाने हजारो कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. १९३७ साली वॉल्फ्सबर्ग येथे स्थापन झालेली फोक्सवॅगन कंपनी केवळ जर्मनीच्या युद्धोत्तर आर्थिक पुनरुत्थानासाठीच महत्त्वाची ठरली नाही, तर या कंपनीने जागतिक ऑटोमोटिव्ह क्षेत्रात आपले स्थानही मजबूत केले आहे. सध्या आशियाई प्रतिस्पर्ध्यांशी वाढती स्पर्धा आणि कमी होत चाललेल्या नफ्याच्या प्रमाणामुळे ही कंपनी कठीण परिस्थितीचा सामना करत आहे, त्यामुळेच या प्रतिष्ठित गाडीचा निर्माता या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.

कार्ल बेंझ, पहिल्या पेट्रोलवर चालणाऱ्या कारमागील प्रणेते

१९ व्या शतकातील ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये यंत्रमागाच्या उदयामुळे मोठे उद्योग आकार घेत होते. या नवकल्पनांच्या वातावरणात कुशल अभियंता कार्ल बेंझ एका उद्योजकीय आणि जड उत्पादनांमध्ये भरभराट झालेल्या प्रदेशाच्या केंद्रस्थानी होते. १८८५ साली कार्ल बेंझने पेटंट- मोटरवॅगन तयार केली. त्या वेळेस त्याला कदाचित कल्पनाही नव्हती की, यामुळे इतिहासाला एक महत्त्वपूर्ण वळण मिळेल. अनेक वर्षे इंधनावर चालणाऱ्या इंजिनांवर काम केल्यानंतर, हे प्रथमच घडले की, त्यांनी अशा कारमध्ये यशस्वीपणे इंजिन बसवले, जे लोकांना स्वतंत्रपणे लोकांना वाहून नेऊ शकत होते.

new ST buses in phased manner 110 buses have been made available
एसटीच्या नवीन गाड्या मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चुरस… तोटा झाल्यास सरकारकडून…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
पुणे : ‘ती बस’ पुन्हा सुरू होणार; पण आता शुल्क लागणार
navi mumbai municipal administration once again started activities to set up charging stations at 124 places in the city
१२४ ठिकाणी नवी चार्जिंग स्थानके, इलेक्ट्रिक वाहन धोरणासाठी नवी मुंबई महापालिकेचा पुन्हा प्रयत्न
Follow the tips to look like an old car as shiny like a new car
जुनी कार नव्यासारखी चकचकीत दिसण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
What is best time to change car engine oil for maximum performance
कार घेतलीय पण ‘ही’ गोष्ट अजूनही माहित नाही! जाणून घ्या, गाडीचे ‘इंजिन ऑइल’ किती दिवसांनी बदलावे…
74 year old man died after being crushed by Thane Municipal Corporations hourglass in Santosh Nagar
महापालिकेच्या घंटागाडीने वृद्धाला फरफटत नेले, अपघातात वृद्धाचा मृत्यू
pcmc launches vision 50 strategy to shape pimpri chinchwads future by 2032
पिंपरी महापालिकेचे ‘व्हीजन @५०’ ; भविष्यातील समस्या आणि उपाययोजनांवर सहा आठवडे गटचर्चा
The Porsche 64 (pictured in 1981) was largely derived from the Beetle.
१९८१ मधील फोटो; विकिपीडिया

अधिक वाचा: Jurassic period: दहा लाख वर्षांच्या सततच्या पावसानंतर डायनासोर्सने घेतला पृथ्वीचा ताबा; शास्त्रीय संशोधन काय सांगते?

ऐतिहासिक महत्त्वाची घटना

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्या या ऐतिहासिक कामासाठी आवश्यक असलेल्या निधीची व्यवस्था त्यांची पत्नी बर्था बेंझ यांच्या हुंड्यातून झाल्याचे म्हटले जाते. स्वतः एक अग्रेसर व्यक्ती असलेल्या बर्था यांनी १८८८ साली एका धाडसी १९४ मैलांच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी मोटरवॅगन नंबर ३ चालवत, त्यांच्या मॅनहाईम येथील घरातून प्फॉर्झहाइमला त्यांच्या आईला भेटण्यासाठी प्रवास केला. हा प्रवास कार्लच्या नकळत केला गेला आणि यामुळे त्यांनी ऑटोमोबाईलच्या व्यवहार्यतेचा पुरावा दिला. त्यांच्या या प्रवासाने ऑटोमोबाईलच्या इतिहासात एका महत्त्वपूर्ण नोंदीचा जन्म झाला. यामुळे सिद्ध झाले की, बेंझ मोटरवॅगन हा केवळ एक शोध नव्हता, तर भविष्याचा शुभारंभ होता.

द पिपल्स कार

द पिपल्स कार: अ ग्लोबल हिस्टरी ऑफ द फोक्सवॅगन बीटल या पुस्तकात इतिहासकार आणि लेखक बर्नहार्ड रीगर लिहितात, “जेव्हा कार्ल बेंझ यांचे १९२९ साली वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झाले, तेव्हा एका जर्मन मोटार मासिकाने त्यांचे वर्णन ‘प्रतिभाशाली व्यक्ती’ म्हणून केले, ज्यांनी ‘सुसंस्कृत जगाला… वेळ आणि अंतर जिंकण्याचे साधन’ दिले.”

आंतरयुद्ध कालावधी (१९२०-४०)

दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात ऑटोमोबाईल उद्योगात अमेरिकेचे वर्चस्व स्पष्ट झाले होते. १९२७ पर्यंत जगातील ८० टक्के गाड्या अमेरिकन लोकांच्या मालकीच्या होत्या आणि मिशिगनमधील डेट्रॉइटने उत्पादन, डिझाइन आणि मार्केटिंगमध्ये जागतिक मानक निश्चित केले. १९२० च्या दशकात जर्मन पर्यटकांनी अमेरिकेचा आणि वाइमर रिपब्लिकच्या ऑटोमोबाईल उद्योगाचा स्पष्ट विरोधाभास पाहिला. १९२९ च्या आर्थिक मंदीनंतर जर्मनीत ६० लाख लोक बेरोजगार झाले, तेव्हा फक्त एक ‘राष्ट्रीय क्रांती’च पुनरुत्थान घडवू शकते, असे मानले गेले. अॅडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखालील नाझींनी मार्क्सवाद, उदारमतवाद आणि भांडवलशाही बदलण्याचे उद्दिष्ट ठेवले, कारण त्यांचे म्हणणे होते की, हे विचार राष्ट्रीय एकतेपेक्षा वर्गहितांना प्राधान्य देतात.

अमेरिकेशी स्पर्धा

जर्मनीला आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मजबूत करण्यासाठी, नाझींनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना सामील करून घेतले आणि औद्योगिक उत्पादनक्षमतेवर भर दिला. त्यांनी आधुनिक जीवनशैलीला प्रोत्साहन दिले. प्रतिकास्वरूप हिटलर स्वतः गाड्या आणि विमानांचा वापर करून दाखवत होता. १९३४ च्या बर्लिन ऑटो शोमध्ये, सत्तेत येऊन एका वर्षाच्या आसपास असलेल्या हिटलरने जर्मनीच्या ऑटोमोबाईल क्षेत्राचा विस्तार ब्रिटन आणि अमेरिकेसारखा होण्याचे आवाहन केले. त्यांनी ‘कार’ (फोक्सवॅगन), ‘फ्रिज’, ‘टीव्ही, आणि ‘ट्रॅक्टर’ यासारखी परवडणारी उत्पादने देण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे जर्मनीत तांत्रिक प्रगती आणि समृद्धीचा नवीन युग सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

Inside the Volkswagen plant. The bodies are dropped from an overhead line to be attached to the chassis.
फोक्सवॅगन प्लांट; विकिपीडिया

अधिक वाचा: हिटलरच्या पेन्सिलमध्ये दडलाय इतिहास! कोण होती या हुकुमशहाची प्रेयसी?

‘लोकांच्या कार’चा जन्म आणि हिटलर

१९३० च्या दशकात हिटलरने जर्मनीच्या प्रसिद्ध मोटारवेच्या बांधकामावर देखरेख ठेवली. या प्रकल्पाकडे त्याने रोजगार निर्मिती प्रकल्प म्हणून पहिले, जेणेकरून युद्धाच्या जखमांनी भरलेल्या देशात राष्ट्रीय अभिमान आणि सन्मान पुन्हा प्रस्थापित करता येईल अशी त्याला अपेक्षा होती. याच दरम्यान हिटलरने अभियंता फर्डिनांड पोर्शेला ‘जनतेची कार’ किंवा फोक्सवॅगन (जर्मन भाषेत ‘फोक्स’ म्हणजे लोक आणि ‘वॅगन’ म्हणजे गाडी) डिझाइन करण्याचे काम दिले. पोर्शेने १९३० च्या दशकात तयार केलेली ही रचना अशी होती की, ज्याने लाखो लोकांना आकर्षित केले; एक टिकाऊ, स्वस्त आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेची कार तयार केली.

आर्थिक शक्तीचे प्रतिक

फेब्रुवारी १९३८ साली बर्लिन ऑटो शोमध्ये, हिटलरने या परवडणाऱ्या कौटुंबिक वाहनाचा प्रोटोटाइप सादर करताना भाकीत केले की, “हे मॉडेल कमी उत्पन्न असलेल्या लाखो नवीन ग्राहकांसाठी ऑटोमोबाईल उपलब्ध करून देईल.” जरी दुसऱ्या महायुद्धामुळे या प्रकल्पाला विलंब झाला, तरी ही कल्पना टिकून राहिली. १९४५ नंतर, ब्रिटिश अधिकार्‍यांनीही या प्रकल्पाची क्षमता ओळखली. फोक्सवॅगन (VW) आणि त्याचे मुख्यालय, नव्याने स्थापन झालेल्या वोल्फ्सबर्ग या कार शहरात टिकून राहिले. VW बीटल हे पश्चिम जर्मनीच्या आर्थिक पुनर्प्राप्तीचे शक्तिशाली प्रतीक ठरले. फोक्सवॅगनच्या मुख्यालयात बीटलच्या मूळ डिझाइनवर लक्ष केंद्रित केले गेले, त्यातील त्रुटी दूर करून आणि बदलत्या बाजाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत सुधारणा करण्यात आल्या.

Story img Loader