Hitler dreamt of a ‘people’s car’: पोर्शच्या १९३० च्या दशकातील डिझाइनने ‘लोकांचे वाहन’ (सामान्य माणसाची कार) किंवा फोक्सवॅगनची संकल्पना तयार केली, या वाहनाने लाखो लोकांना भुरळ घातली. ही कार टिकाऊ, किफायतशीर आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखली गेली. फेब्रुवारी १९३८ साली बर्लिन ऑटो शोमध्ये हिटलरने या कारचा प्रोटोटाइप सादर केला होता. फोक्सवॅगनच्या ८७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जर्मनीच्या ऑटोमोटिव्ह वारशाचा मुख्य आधार असलेल्या या कंपनीने तीन स्थानिक कारखाने बंद करण्याचा विचार आता केला आहे. पर्यायाने हजारो कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. १९३७ साली वॉल्फ्सबर्ग येथे स्थापन झालेली फोक्सवॅगन कंपनी केवळ जर्मनीच्या युद्धोत्तर आर्थिक पुनरुत्थानासाठीच महत्त्वाची ठरली नाही, तर या कंपनीने जागतिक ऑटोमोटिव्ह क्षेत्रात आपले स्थानही मजबूत केले आहे. सध्या आशियाई प्रतिस्पर्ध्यांशी वाढती स्पर्धा आणि कमी होत चाललेल्या नफ्याच्या प्रमाणामुळे ही कंपनी कठीण परिस्थितीचा सामना करत आहे, त्यामुळेच या प्रतिष्ठित गाडीचा निर्माता या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा