दोन वर्षांपूर्वी १५ जूनच्या रात्री लडाखमधील गलवान भागात भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाला होता, यामध्ये भारताच्या २० सैनिकांना वीरमरण आले होते. त्यामुळे दोन्ही देशातील संंबंध ताणले गेले होते. आता दोन वर्षात दोन्ही देशांमधील संबंध तेव्हाच्या तुलनेत काहीसे सामान्य पातळीवर येत आहे. चीनसमोर भारत आता कणखरपणे उभा असल्याचे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या संबंध कसे आहेत ?
गलवानमध्ये संघर्ष होण्यापूर्वी म्हणजे एप्रिल २०२० च्या आधी जी परिस्थिती गलवानमध्ये होती तशी परिस्थिती आणण्यात १०० टक्के यश हे अजुनही भारताला आलेलं नाही. असं असलं तरी दोन्ही देशांमधील व्यापार हा नवा उच्चांक गाठतांना बघायला मिळत आहे. २०२१ मध्ये भारत आणि चीनमधील उलाढाल ही १२५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचली आहे. यामध्ये भारताची आयात ही ९७.५ अब्ज डॉलर्सच्या घरात होती तर निर्यातीने पहिल्यांदाच २० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे गलवान संघर्षांनतर अनेक बाबतीत चीनच्या भारतामधील गुंतवणुकीला अटकाव करण्यात आला होता, चीनच्या अॅपपासून अनेक गोष्टींवर भारताने बंदी घातली होती.
राजकीय संबंध हे पुर्णपणे प्रस्थापित झाले नसले तरी काही प्रमाणात संबाद सुरु आहे. मार्च महिन्यात चीनचे परराष्ट्र मंत्री हे दिल्लीत आले होते. सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे शांघाय कॉर्पोरेशनने आयोजित एका चर्चेत सहभागी झाले होते. बुधवारी चीनने आयोजित केलेल्या ‘ब्रिक्स’च्या सुरक्षा विषयक बैठकीतही ते सहभागी झाले होते. लवकरच चीन आयोजित ‘ब्रिक्स’ परिषदेत पंतप्रधान मोदी हे आभासी पद्धतीने सहभागी होणार आहेत. तर याच आठवड्यात चीनमध्ये जाण्यासाठी भारतीयांसाठी असलेले व्हिसाचे निर्बंध हे पूर्णपणे उठवण्यात आले आहेत. यामुळे चीनमधील भारतीय अधिकाऱ्यांचे कुंटुंबच काय आता देशातील विद्यार्थीही चीनमध्ये जाऊ शकणार आहेत.
सीमेवरील लष्करी परिस्थिती
पंतप्रधान मोदी यांनी संसदेत आश्वासन दिले होते की चीनने भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले नाही. असं असलं तरी गेल्या दोन वर्षात भारत-चीनमध्ये लष्करी चर्चेच्या १५ फेऱ्या झाल्या आहेत आणि वादग्रस्त भागाबद्दल अजुनही तोडगा निघू शकलेला नाही याचा अर्थ काही वेगळाच होतो. गलवानचे खोरं, पँगाँग लेक आणि पॉईंट १७ अ या ठिकाणी सैन्य माघारीचा मुद्द्यावर अजुनही तोडगा निघू शकलेला नाही. एकीकडे हा प्रश्न प्रलंबित असतांना Depsang plains, Hot Springs आणि Demchock भागात भारतीय सैन्याला गस्त घालण्यास अटकाव करण्याचे चीनचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. अशी परिस्थिती असतांना आता लवकरच १६ वी चर्चेची फेरी होणार असल्याचं परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे.
सैन्य माघारी, लडाख सीमेवरील दोन्ही बाजूंचे सैन्य कमी करणे यामध्ये सुद्धा काहीही प्रगती झालेली नाही. उलट चीन आणखी आक्रमकपणे सैन्य संख्या वाढवत आहे, सैन्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा बळकट करत आहे. अमेरिकेचे पॅसिफिक भागाचे लष्कर प्रमुख General Charles Flynn यांनी भारत भेटी दरम्यान लडाखमधील चीनच्या हालचालीबद्दल भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे.
चीन ताबा रेषेजवळ गावे वसवत असून लष्करी वाहतुकीसाठी विविध पायाभूत सुविधांचे जाळे युद्धपातळीवर तयार करत आहे. पँगाँग लेकवर नवीन पूल बांधत असल्याने मोठ्या प्रमाणात लष्करी युद्धसाहित्य हे सीमेवर अवघ्या काही तासात तैनात करणे चीनला शक्य होणार आहे. याला प्रत्त्युत्तर म्हणून भारतानेही पायाभूत सुविधांचे जाळे लडाखमध्ये उभे केले आहे, करत आहे.
गलवानमध्ये नक्की काय झाले होते ?
दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात ताबा रेषा ओलांडत भारताच्या हद्दीत चीनच्या सैन्याने तंबू ठोकत मुक्काम केला होता. त्यांनतर मात्र याआधी सीमेबाबत ठरवलेल्या नियमाप्रमाणे चीनने माघार घेण्याचे मान्य केले. मात्र चीनने हे पाऊल उचलेले नाही आणि १५ जूनच्या रात्री एकही गोळी झाडली गेली नसली तरी दोन्ही सैन्यांमध्ये एक रक्तरंजित संघर्ष उडाला.
त्यावेळी बिहार रेजिंमेटचे अधिकारी कर्नल सुरेश बाबू हे सहकाऱ्यांसह चीनच्या सैन्याला जाब विचारण्यासाठी पोहचले, मात्र त्या सर्वांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूकडच्या सहाशे पेक्षा जास्त सैनिकांमध्ये चार ते पाच तास संघर्ष सुरु होता. आधी ठरल्याप्रमाणे अशा वादाच्या काळात शस्त्र वापरू नये असे ठरवण्यात आले होते. असं असलं तरी सर्व नियम पायदळी तुडवत चीनने खिळे लावलेल्या विशिष्ट काठ्यांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला. याचवेळी १० अधिकारी आणि जवान यांना चीनने ताब्यातही घेतलं होतं. अनेक तासांच्या चर्चेनंतर अखेर त्यांची सुटका करण्यात आली. या संघर्षात नेमके किती सैन्य ठार झाले हे चीनचे सांगितले नाही. १० महिन्यानंतर ४ सैनिक ठार झाल्याचे चीनतर्फे सांगण्यात आले. तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील एका संकेतस्थळाने केलेल्या दाव्यानुसार ३८ चीनचे सैनिक हे १५ जून २०२० च्या संघर्षात ठार झाले.