मुंबईनंतर नवी मुंबईच्या रूपात दुसरी मुंबई सिडकोने वसविली. आता लवकरच नवी मुंबईलगत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) तिसरी मुंबई वसविणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास एमएमआरडीए प्राधिकरणाने मंजुरी दिली असून आता राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. मुंबई पारबंदर प्रकल्प (शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतू) प्रभावित क्षेत्रात ही तिसरी मुंबई नवनगर संकल्पेनेद्वारे वसविली जाणार आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे आणि हे नवनगर कसे असणार याचा हा आढावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई पारबंदर प्रकल्प नेमका आहे काय?
एमएमआरडीएने मुंबई – नवी मुंबई अंतर कमी करण्यासाठी मुंबई पारबंदर प्रकल्प अर्थात शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतू प्रकल्प हाती घेतला आहे. हा सागरी सेतू २१.८० किमी लांबीचा असून तो वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई – नवी मुंबई अंतर २० ते २२ मिनिटांत पार करता येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली असून हा प्रकल्प आतापर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र करोना आणि इतर कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला. मात्र आता या प्रकल्पाचे ९७ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून जानेवारीत हा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
हेही वाचा : विश्लेषण : युरोपमध्ये अनेक देशांत अतिउजवी लाट निर्माण होण्याची कारणे काय?
सागरी सेतूच्या आसपास विकासाच्या संधी किती?
शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतूमुळे मुंबई – नवी मुंबई प्रवास वेगवान होणार आहे. हे अंतर २० ते २२ मिनिटांत पार करता येणार आहे. मात्र त्याच वेळी हा प्रकल्प नवी मुंबई, मुंबई महानगर प्रदेशाचा कायापालट करणारा प्रकल्प ठरणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. हा सागरी सेतू झाल्याने मुंबई आणि नवी मुंबई शहरातील अंतर कमी होणार असल्याने नवी मुंबईत कामासाठी वा वास्तव्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच वेळी सागरी सेतूच्या आसपासच्या परिसरात औद्योगिक विकासाच्या संधीही निर्माण होतील असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. त्यामुळेच एमएमआरडीएने आपल्या विकास केंद्राच्या प्रकल्पात मुंबई पारबंदर प्रकल्प प्रभावित क्षेत्रात एक विकास केंद्र प्रस्तावित केले आहे. तर आता सागरी सेतू प्रभावित क्षेत्रात नवनगर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे नवनगर संकल्पना?
सागरी सेतूमुळे नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात विकासाची संधी निर्माण होणार आहे. सागरी सेतूच्या आसपासच्या परिसराचा कायापालट करणे, तिथे अत्यावश्यक सर्व सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. येथे निर्माण होणारी विकासाची संधी लक्षात घेता एमएमआरडीएने येथे एक नवनगर अर्थात नवीन शहर निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एमएमआरडीएने क्षेत्र निश्चित केले असून या क्षेत्रासाठी एमएमआरडीएला नवनगर विकास प्राधिकरण म्हणून मान्यता द्यावी असा प्रस्ताव एमएमआरडीएने याआधीच प्राधिकरणासमोर ठेवला होता. या प्रस्तावाला प्राधिकरणाने मान्यता दिली असून आता राज्य सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर यासंबंधीची पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
हेही वाचा : विश्लेषण : कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ट्रम्प अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरणार का?
नवनगरात किती गावांचा समावेश?
शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतू जिथे संपतो, तेथील ३२३.४४ चौरस किमी क्षेत्राचा विकास एमएमआरडीए नवनगर संकल्पनेतून करणार आहे. हे नवनगर म्हणजे तिसरी मुंबई ठरणार आहे. या तिसऱ्या मुंबईत अर्थात नवनगरात उरण, पेण आणि पनवेलमधील एकूण १२४ गावांचा समावेश असणार आहे. यात सिडकोच्या नैना प्रकल्पातील काही क्षेत्राचाही समावेश असून हे क्षेत्र एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यास सिडकोने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले आहे. या तिसऱ्या मुंबईत ३२३. ४४ चौरस किमी क्षेत्रात निवासी, व्यावसायिक संकुले बांधण्यात येणार असून शाळा, रुग्णालय, मैदान यासह अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. आर्थिक,औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने आवश्यक तो विकासही येथे करण्यात येणार आहे. नवी मुंबईप्रमाणे हे नवनगर विकासित होणार आहे.
हेही वाचा : विश्लेषण: टेस्लाच्या स्वयंचलित मोटारींचा ‘रिव्हर्स गिअर’?
नवनगर प्रस्तावाची सद्यःस्थिती काय?
उरण, पेण आणि पनवेलमधील ३२३.४४ चौरस किमी क्षेत्राच्या विकासासाठी एमएमआरडीएला नवनगर विकास प्राधिकरण म्हणून मान्यता देण्याचा एमएमआरडीएचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला प्राधिकरणाने मान्यता दिली असून आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी गेला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास एमएमआरडीएकडून सल्लागाराची नियुक्त करून नवनगर नेमके केस असेल यासाठी सविस्तर बृहत आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही होणार आहे. त्यामुळे नवनगर प्रत्यक्षात साकारण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.