२०१७ पासून गाझामध्ये हमासचे नेतृत्व करणारा दहशतवादी नेता याह्या सिनवार इस्रायली हल्ल्यात मारला गेला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) रफाह येथे केलेल्या हल्ल्यात याह्या सिनवार मारला गेला असल्याचे इस्रायलने गुरुवारी सांगितले. इस्रायलच्या ड्रोन व्हिडीओमध्ये हल्ल्यानंतर याह्या सिनवार दिसत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, आता याह्या सिनवारच्या हत्येनंतर हमासचे नेतृत्व कोण करणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जो कोणी पुढील कमान हाती घेईल, त्याचा हमासच्या भविष्यावर आणि चालू असलेल्या संघर्षावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडेल हे निश्चित.

इराणमध्ये त्याचा पूर्ववर्ती इस्माईल हानीयेह याच्या हत्येनंतर सिनवार याने जुलैमध्ये हमासचा एकंदर नेता म्हणून पदभार स्वीकारला होता. इस्रायलच्या विरोधात सतत आक्रमकता वाढवण्यात त्याचा मोठा वाटा होता. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यांमागेही त्याचे नेतृत्व होते; ज्यात १,२०० हून अधिक लोक मारले गेले आणि हमासकडे एकूण १०० जणांना ओलिस ठेवण्यात आले. ओलिसांच्या भवितव्याशी संबंधित निर्णयांसह, इस्रायलशी सुरू असलेले युद्ध पुढे नक्की कोणते स्वरूप घेईल, हे पुढील नेतृत्वावर अवलंबून असणार आहे. हमासच्या नेतृत्वासाठी सर्वोच्च दावेदारांमध्ये कोणाच्या नावांचा समावेश आहे, त्याविषयी जाणून घेऊ.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
इराणमध्ये त्याचा पूर्ववर्ती इस्माईल हानीयेह याच्या हत्येनंतर सिनवार याने जुलैमध्ये हमासचा एकंदर नेता म्हणून पदभार स्वीकारला होता. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : भारताला ९४ वर्षांमध्ये विज्ञानाचं एकही नोबेल पदक का मिळू शकलं नाही?

हमासच्या नेतृत्वासाठी सर्वोच्च दावेदार कोण?

मोहम्मद सिनवार

याह्याचा धाकटा भाऊ मोहम्मद सिनवार हा आघाडीचा उमेदवार आहे, जो हमासच्या लष्करी शाखेतील वरिष्ठ कमांडरपैकी एक आहे. याह्याचा धाकटा भाऊ असल्याने त्याला मजबूत वारसदार म्हणून पाहिले जाऊ शकते. मोहम्मद कायम लोकांच्या नजरेतून बाहेर राहिला आहे, परंतु गटाच्या योजनांमध्ये त्याचा कायम मुख्य सहभाग राहिल्याचे सांगितले जाते. तो अनेक हत्येच्या प्रयत्नांतून वाचला आहे. मुख्य म्हणजे तो इस्रायली सैन्याच्या लक्ष्यावर आहे. मोहम्मद सिनवार याचे कौटुंबिक संबंध आणि हमासमधील त्याच्या प्रतिष्ठेमुळे तो योग्य दावेदार मानला जातो. तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, त्याच्या नियुक्तीने हमास आक्रमक कारवाई करेल, ओलिसांना फाशी देईल आणि याह्याच्या मृत्यूचा बदला घेण्याची योजनाही आखू शकेल.

खलील अल-हय्या

इस्रायलशी अप्रत्यक्ष युद्धविराम चर्चेत हमासचे सर्वोच्च वार्ताकार म्हणून काम केलेले खलील अल-हय्या याला आणखी एक संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते. अल-हय्या हा याह्या सिनवारचा डेप्युटी होता आणि त्याने राजनैतिक प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. काही तज्ज्ञ असे सुचवतात की, जर अल-हय्या नेतृत्वावर आला तर मुत्सद्देगिरीकडे बदल होऊ शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला, अल-हय्याने सूचित केले की, इस्रायलने गाझा आणि वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी राज्य सोडल्यास हमास शस्त्र त्याग करण्याचा विचार करू शकेल. परंतु, मुत्सद्देगिरीकडे जाणारा हा मार्ग अनिश्चित आहे, कारण ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यामागील अनेक लष्करी नेते आधीच मारले गेले आहेत.

इस्रायलशी अप्रत्यक्ष युद्धविराम चर्चेत हमासचे सर्वोच्च वार्ताकार म्हणून काम केलेले खलील अल-हय्या याला आणखी एक संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते. (छायाचित्र-एपी)

खालेद मेशाल

या शर्यतीतील आणखी एक नाव म्हणजे खालेद मेशाल; ज्याने यापूर्वी २००४ ते २०१७ या काळात हमासचे नेतृत्व केले होते. मेशाल आता कतारमध्ये आहे. काही लोकांना त्याला हमासचे नेतृत्व म्हणून पाहण्याची इच्छा आहे, विशेषत: त्याच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे. पूर्वी वाढलेल्या हिंसाचारात मेशालचा हात होता आणि त्याने इस्त्रायलींविरुद्ध आत्मघाती बॉम्बस्फोट हल्लेही घडवून आणले आहेत. असेही मानले जाते की, खालेद मेशाल हमासची धुरा हाती घेण्याची शक्यता फार कमी आहे, कारण त्याने सीरियाचे अध्यक्ष अल-असद यांच्या विरोधातील बंडखोरीला पाठिंबा दिला होता.

या शर्यतीतील आणखी एक नाव म्हणजे खालेद मेशाल; ज्याने यापूर्वी २००४ ते २०१७ या काळात हमासचे नेतृत्व केले होते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हुसम बद्रन

हुसम बद्रन हा आणखी एक संभाव्य उत्तराधिकारी आहे. हमासचे प्रमुख प्रवक्ता म्हणून बद्रन हा अजूनही हयात असलेल्या काही सार्वजनिक व्यक्तींपैकी एक आहे. परंतु, तो हमासचे नेतृत्व करण्याची शक्यता फार कमी आहे.

हमासमधील इतर प्रमुख व्यक्ती कोण आहेत?

मोहम्मद शबाना

मोहम्मद शबाना याला अबू अनस शबाना म्हणूनही ओळखले जाते. हा रफाहमधील हमासच्या लष्करी ऑपरेशनचा प्रमुख आहे. हमासमधील बोगद्याचे जाळे तयार करण्यात त्याचा प्रमुख सहभाग राहिला आहे. हे बोगदे इस्रायली हल्ल्यांमध्ये हमाससाठी महत्त्वाचे ठरत आले आहेत. २०१४ पासून रफाह बटालियनवर त्याचे नेतृत्व राहिले आहे. त्या नेतृत्वामुळे हमासच्या लष्करी पायाभूत सुविधांमध्ये त्याचे महत्त्व वाढले आहे.

मारवान इसा

मारवान इसा हमासमधील आणखी एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. तो युद्धापूर्वी याह्या सिनवारचा डेप्युटी होता. मार्च २०२३ मध्ये इस्रायलने इसाला ठार मारल्याचे सांगितले जाते. परंतु, हमासने अद्याप त्याच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही. इसासह याह्या सिनवार आणि जुलै २०२३ मध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात मारला गेलेला मोहम्मद देईफ यांनी हमासची धोरणात्मक लष्करी परिषद स्थापन केली. त्याच्या संभाव्य मृत्यूमुळे हमासमधील अनुभवी नेत्यांची संख्या कमी झाली आहे.

हेही वाचा : Massive Door In Antartica: अंटार्क्टिकामध्ये सापडलेल्या रहस्यमयी दरवाजामागील सत्य काय?

रावी मुश्ताहा

हमासचा आणखी एक दिग्गज नेता रावी मुश्ताहा हा याह्या सिनवारचा विश्वासू आणि सहयोगी होता. १९८० च्या दशकात हमासच्या सुरक्षा यंत्रणेची स्थापना करण्यात त्याचे महत्त्वपूर्ण योगदान होते. परंतु, अनेक वृत्तांमधून अशी माहिती समोर आली की, संघर्षाच्या आधी गाझा येथे झालेल्या हल्ल्यात तो मारला गेला असावा. हमासच्या अनेक सर्वोच्च लष्करी नेत्यांचा एकतर मृत्यू झाला आहे किंवा अक्षम झाले आहेत. पुढील नेत्याची निवड एकूणच हिंसाचाराचे चक्र सुरू राहील की नाही हे ठरवू शकेल. सिनवारच्या मृत्यूच्या वृत्तानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी म्हटले आहे की, या विकासामुळे ओलिसांच्या परत येण्याची आशा वाढली आहे आणि गाझामधील युद्धाचा अंत झाला आहे.