निवडणुकीच्या सर्व राजकीय घडामोडींमध्ये, अग्निकुल कॉसमॉस या खासगी अंतराळ कंपनीने गेल्या आठवड्यात आपल्या स्वदेशी बनावटीच्या रॉकेटचे पहिले यशस्वी प्रक्षेपण केले आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रात इतिहास घडवला. ही घटना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अंतराळ क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या कामगिरीबद्दल कंपनीचे अभिनंदन केले. अग्निबाण रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण भारतासाठी किती महत्त्वाचे? या रॉकेटमध्ये खास काय? याबद्दल जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय अंतराळ स्टार्टअप कंपनी
भारतीय खासगी कंपनीने भारतीय भूमीवरून रॉकेट उडविण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. नोव्हेंबर २०२२ मध्ये स्कायरूट एरोस्पेस या स्टार्ट-अप कंपनीने अग्निकुलप्रमाणेच एक रॉकेट यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले; ज्याला त्यांनी ‘विक्रम’ असे नाव दिले. भारतात अवकाश संशोधनाचे महत्त्व रुजविणारे विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटला विक्रम हे नाव देण्यात आले.
हेही वाचा : राजधानी दिल्लीत पाण्याची वानवा; आप सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव
भारतीय अंतराळ स्टार्टअप कंपनी अग्निकुलचे अग्निबाण हे जगातील पहिले ३-डी प्रिंटेड इंजिनाद्वारे समर्थित रॉकेट आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात देशातील एकमेव खासगी लॉंचपॅड वापरून हे रॉकेट लॉंच केले गेले. अग्निकुल व स्कायरूट या दोन्ही कंपन्या वर्षभरात त्यांच्या रॉकेटवरून व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
लघु उपग्रह प्रक्षेपण मार्केट
गुरुवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेल्या या रॉकेटमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे रॉकेट ३० ते ३०० किलो वजनाचे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेपर्यंत वाहून नेण्यास सक्षम असेल. स्कायरूट कंपनीच्या विक्रम रॉकेटमध्येदेखील समान क्षमता आहे. स्कायरूट व अग्निकुल या दोन्ही कंपन्या आपत्ती व्यवस्थापन, हवामान बदल, पृथ्वी आणि महासागर निरीक्षण करणार्या अब्जावधी डॉलर्सच्या लघु उपग्रह प्रक्षेपण मार्केटवर लक्ष्य केंद्रित करत आहेत. हे उपग्रह सहसा अवकाश संशोधन किंवा वैज्ञानिक प्रयोगांसाठी नसतात.
ही मागणी पूर्ण करण्यासाठी इस्रोदेखील स्वतः एसएसएलव्ही किंवा स्मॉल सॅटेलाइट लॉंच व्हेइकल नावाचे नवीन रॉकेट विकसित करीत आहे. एसएसएलव्ही रॉकेटच्या दोन प्रक्षेपणांत ते एकदाच यशस्वी ठरले. इतर रॉकेटच्या तुलनेत क्षमतेने हे रॉकेट अधिक शक्तीशाली आहे; ज्यामध्ये ५०० किलोपर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता आहे.
अग्निबाण रॉकेट
अग्निबाण रॉकेटमधील वेगळेपण म्हणजे याचे सेमी-क्रायोजेनिक इंजिन पूर्णपणे ३-डी प्रिंटेड आहे. इंजिनामध्ये कोणतेही घटक किंवा हलणारे भाग नाहीत. या इंजिनामध्ये वेल्डिंग आणि फ्युजिंगही नाहीत. स्पेस हार्डवेअरमध्ये ३-डी प्रिंटिंगचा वापर करणे ही काही नवीन कल्पना नाही. परंतु, ३-डी प्रिंटेड असलेले संपूर्ण इंजिन अद्याप कोणीही वापरलेले नाही. त्यामुळे या कंपनीने रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. ३-डी प्रिंटिंग कार्यक्षमता वाढवू शकते, खर्च कमी करू शकते आणि त्यामुळे चुकीच्या घटना घडण्याची शक्यता कमी होऊ शकते. या इंजिनामध्ये वायरिंग, वेल्डिंग आदी गोष्टी नसल्यामुळे त्रुटी कमी आढळतात. अग्निबाणमध्ये असणार्या इंजिनाचे नाव अग्निलेट आहे.
खासगी मालकीच्या लाँच पॅडवरून पहिल्यांदाच कोणते रॉकेट लाँच करण्यात आले आहे. आतापर्यंत सर्व अंतराळ प्रक्षेपणे श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या दोन प्रक्षेपण पॅडपैकी एकावरून केले गेली. अंतराळ प्रक्षेपणांच्या संख्येत तीव्र वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, इस्रो तमिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील कुलसेकरपट्टिनम येथे दुसरे अंतराळ बंदर विकसित करीत आहे. हे बंदर मुख्यत्वे एसएसएलव्ही प्रक्षेपणासाठी वापरले जाईल. अग्निकुल या कंपनीने इस्रोच्या मदतीने श्रीहरिकोटा रेंजमध्ये स्वतःचे लॉंच पॅड तयार केले आहे. पुढे ‘अग्निकुल’कडून दरवर्षी ३५ ते ४० अग्निबाण रॉकेटचे प्रक्षेपण केले जाईल, अशी शक्यता आहे.
हेही वाचा : Exit Poll 2024 : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ‘४०० पार’ लक्ष्याच्या किती जवळ? एक्झिट पोलचा अंदाज काय?
अंतराळ क्षेत्रात वाढत्या खासगी कंपन्या
अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे ‘अग्निकुल’, ‘स्कायरूट’ यांसारख्या कंपन्यांना हे यश मिळाले आहे; जे भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठीदेखील महत्त्वाचे आहे. परंतु, या दोनच कंपन्या नाहीत, तर गेल्या काही वर्षांत डझनभर अंतराळ कंपन्या उदयास आल्या आहेत. या कंपन्या उपग्रह, स्पेस-आधारित अॅप्लिकेशन्स, हार्डवेअर, कम्युनिकेशन्स, डेटा सेंटर्स यांसारख्या स्पेस मार्केटच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक कंपन्यांनी आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. या खासगी कंपन्यांना सरकारही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. पंतप्रधान मोदी यांनी वैयक्तिकरीत्या अवकाश उद्योजकांच्या निवडक गटाशी अनेक बैठका घेतल्या आहेत.